ताज्या घडामोडीपिंपरी
शहरातील कष्टकऱ्यांचा डॉ सुलक्षणा शिलवंत यांना पाठिंबा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील कष्टकरी श्रमिक कामगार वर्गाला डॉ सुलक्षणा शिलवंत या आपल्या समस्या सोडू शकतील असा आधार वाटतो आहे, असा विश्वास कामगार हिताय बांधकाम कामगार श्रमिक सेनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ मेहत्रे यांनी व्यक्त केला आहे.
कामगार हिताय बांधकाम कामगार श्रमिक सेनेने पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ सुलक्षणा शिलवंत यांना आपला जाहीर पाठिंबा दिला आहे. या संदर्भात आकुर्डी येथे श्रमिक व कष्टकऱ्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात डॉ सुलक्षणा शिलवंत धर यांना पाठिंब्याचे पत्र कष्टकरी श्रमिक सेनेच्या संस्थापक अध्यक्ष दीपक मेहत्रे यांनी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे यांच्याकडे सुपूर्द केले.
या मेळाव्यास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ म्हेत्रे व तसेच त्यांची सर्व कमिटी उपस्थित होती.
यावेळी बोलताना दीपक मित्र म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरातील कष्टकऱ्यांना कोणाचाही आधार राहिला नाही मात्र डॉ सुलक्षणा शिलवंत यांच्या रूपाने या कष्टकऱ्यांना एक आधार मिळणार असा विश्वास वाटू लागला आहे. यामुळे पिंपरी विधानसभा मतदार संघातील हजारो कष्टकरी डॉ सुलक्षणा शिलवंत यांना प्रचंड बहुमताने विजयी करतील व तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर मतदान करतील. या मेळाव्यास हजारो श्रमिक कष्टकऱ्यांनी उपस्थिती दर्शवून सुलक्षणा शिलवंत त्यांना पाठिंबा जाहीर केला.
या वेळी राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेस पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष तुषार कामठे यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष तसेच पिंपरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार सुलक्षणा शिलवंत धर या कामगारांच्या सदैव पाठीशी उभ्या राहतील.
डॉ. सुलक्षणा शीलवंत धर आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या की, कामगारांची बहीण म्हणून सदैव त्यांच्या पाठीशी राहील व विधानसभेत त्यांच्याविषयी प्रश्न मांडेल.
या मेळाव्यास विनोद गायकवाड, विशाल आप्पा कांबळे, श्रीमंत जगताप व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
आकुर्डी येथे कामगार हिताय बांधकाम कामगार श्रमिक सेनेचा मेळावा घेण्यात आला. मेळाव्यात श्रमिक सेनेने मला पाठिंबा जाहीर केला. पाठिंब्याचे पत्र शहराध्यक्ष तुषार भाऊ कामठे यांच्याकडे सोपवण्यात आले. मेळाव्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दीपक भाऊ म्हेत्रे तसेच सर्व समिती सदस्य, श्री विनोद गायकवाड, विशाल आप्पा कांबळे, श्रीमंत जगताप व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. आपण दिलेल्या पाठिंब्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. आपली बहिण म्हणून मी सदैव कामगारांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील व कामगारांच्या समस्यांविषयी विधानसभेत प्रश्न मांडेल, असं वचन देते.