सांगवी पोस्ट ऑफिसमध्ये ” तीस वर्षानंतर” दिवाळी साजरी
गवळण भारुडाचे सादरीकरण
सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) -+सांगवी पोस्ट ऑफिस मधील सर्व महिला एजंट दिवाळीत एकत्र झाल्या.
पोस्ट खात्यात जनतेने पैशाची बचत करावी यासाठी वर्षभर या महिला काम करतात.
दिवाळीत सांगवी पोस्टातील या महिलांनी पोस्ट कार्यालय पणत्या लावून उजळले.
भक्तीगीते, गवळण, भारुड सादरीकरण केले.
बचतीचा संदेश दिला.
यावेळी जयश्री गुमास्ते यांनी “मोत्याची चुंबळ डोईवर पाण्याचा घडा गं” ही गवळण सादर केली. दिपाली कुर्लेकर यांनी भारुड सादर केले.
यावेळी महिला एजंट यांचा सन्मान करण्यात आला. दिवाळी फराळ देण्यात आला.
सौ आश्विनी खळदकर, सुधा कोकाटे, लीना बोरोले, ज्योती शिनकर,वर्षा नागवडे, साधना जगदाळे, सुषमा चौधरी सहभागी झाल्या होत्या.
सांगवी पोस्ट ऑफिस येथील पोस्ट मास्तर शर्मिला ब्रम्हभट , गीता रानडे यांनी संयोजनात पुढाकार घेतला.
अनिल पाटील यांनी आभार मानले.
सांगवी पोस्ट विभागातील सर्व एजंट सहभागी झाले होते.