बापूसाहेब भेगडे यांचा श्री डोळसनाथ महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराचा शुभारंभ
तळेगाव दाभाडे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उबाठा, मनसे यांचा पाठिंबा असलेले जनतेचे अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराजांना अभिषेक करून करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी बापूसाहेब भेगडे आगे बढो अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य पसरले होते.
यावेळी अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांच्यासह माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे, पंचायत समितीचे माजी सभापती निवृत्तीभाऊ शेटे, ज्येष्ठ नेते माऊली शिंदे, राजाराम शिंदे, बबनराव भेगडे, सुभाष जाधव, भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष गणेश भेगडे, चंद्रकांत शेटे, रवींद्रआप्पा भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबुराव वायकर, गुलाबराव वरघडे, गिरीश खेर, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे, शिवसेना (उबाठा) पक्षाचे तालुकाप्रमुख आशिष ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय पडवळ, मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, जिल्हा परिषद माजी सदस्य प्रशांत ढोरे, राजेश मुऱ्हे, सुनील वरघडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती अशोक काळोखे, मनोहर दिगंबर भेगडे,माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे, मावळ तालुका राजमाता जिजाऊ महिला मंच मावळ तालुका संस्थापक अध्यक्षा सारिका भेगडे, तळेगावच्या माजी नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, मायाताई भेगडे, तळेगाव दाभाडे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष भेगडे, आशिष खांडगे, माजी नगरसेवक अरुण भेगडे पाटील, प्रकाश ओसवाल, अरुण माने, माजी नगरसेविका मंगलताई जाधव, संध्याताई भेगडे, ॲड. रुपालीताई दाभाडे, माजी उपनगराध्यक्षा
वैशालीताई दाभाडे, रत्नाताई भेगडे, भवरलाल ओसवाल, बाळतात्या भेगडे, रवींद्र माने, अजय भेगडे, बाळासाहेब सातकर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपली भूमिका स्पष्ट करताना बापूसाहेब भेगडे यांनी आपले व्हिजन बोलून दाखविले. त्यांनी सांगितले, श्री क्षेत्र भंडारा डोंगरावर साकारात असलेल्या जगद्गुरू संत तुकाराम महाराज भव्य मंदिराचा आराखडा मंजूर करून त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून देणार आहे. शेतकरी बांधवांसाठी सोलरच्या माध्यमातून ऊर्जानिर्मिती करून मोफत वीज देण्याचा प्रयत्न असणार आहे. या माध्यमातून शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्नही सोडविण्यात येणार आहे. बेरोजगारांना मावळ तालुक्यातील विविध कंपन्यांमध्ये काम देऊन बेरोजगारीचा प्रश्न सोडविणार आहे. महिला सक्षम झाल्या पाहिजेत, त्यांनीही आनंदी जीवन जगले पाहिजे, या हेतूने सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन महिलांसाठी विशेष उपक्रम राबविणार आहोत. महिलांमध्ये कौशल्य प्राप्त होण्यासाठी पाच एकरमध्ये कौशल्य विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. मावळ तालुका भयमुक्त करावयाचा आहे. त्यासाठी आपण बहुमतांनी मला निवडून द्यावे, असे आवाहनही बापूसाहेब भेगडे यांनी यावेळी केले.
माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे म्हणाले, की मावळ तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्याला प्रथम प्राधान्य असणार आहे. नामांकित कंपन्यामध्ये स्थानिक युवक युवतींना सामावून घेऊन त्यांना काम मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा, मावळ तालुक्यातील मतदारांचा पाठिंबा आहे. सर्वसामान्य जनतेने ही निवडणूक हातात घेतली असल्याने बापूसाहेब भेगडे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, बापूसाहेब भेगडे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं, या घोषणांनी श्री डोळसनाथ महाराज मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.