चिंचवडताज्या घडामोडीपिंपरी

चिंचवड मतदार संघात सर्वाधिक तर मावळमध्ये सर्वात कमी दिव्यांग मतदार

Spread the love

 

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  जिल्ह्यात सर्वाधिक १२ हजार १०१ दिव्यांग मतदार चिंचवड विधानसभा मतदार संघात तर सर्वात कमी म्हणजेच १ हजार ६८९ दिव्यांग मतदार मावळ मतदार संघात आहेत, दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदार संघात विविध सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यात असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली आहे.

जिल्ह्यात २१ विधानसभा मतदार संघात मिळून ९० हजार १३४ दिव्यांग मतदार आहेत. यात अस्थिव्यंग, कर्णबधिर, अल्पदृष्टी आणि इतर प्रकारच्या दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. जुन्नर मतदार संघात १ हजार ९१७, आंबेगाव २ हजार ७७६, खेड- आळंदी ३ हजार ६१२, शिरुर ३ हजार ९८६, दौंड ३ हजार १८०, इंदापूर २ हजार १२, बारामती ४ हजार ९८०, पुरंदर ४ हजार ३१३, भोर ६ हजार ८०, मावळ १ हजार ६८९, चिंचवड १२ हजार १०१, पिंपरी ४ हजार २५१, भोसरी ७ हजार १४३, वडगाव शेरी ३ हजार ५३७, शिवाजीनगर २ हजार २१६, कोथरुड २ हजार ८१४, खडकवासला ३ हजार ४३९, पर्वती ३ हजार ४४०, हडपसर ७ हजार ६१५, पुणे कॅन्टोन्मेंट ५ हजार १०० तर कसबा पेठ मतदार संघात ४ हजार ८६८ इतके दिव्यांग मतदार आहेत.

दिव्यांग मतदारांसाठी सर्व मतदान केंद्रांवर रॅम्पची सुविधा, पुरेशा व्हील चेअर्स, वाहन व्यवस्था, स्वतंत्र रांगा, ब्रेल लिपीतील साहित्य, कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक, सहायक, प्रतिक्षालय, फॉर्म १२ ड भरुन घरातूनच मतदानाची सोय, ९२२६३६३००२ हा हेल्पलाईन क्रमांक आदी सोयी- सुविधा उपलब्ध करुन देण्यात‍ येणार आहेत. ‘सक्षम’ ॲपच्या माध्यमातून दिव्यांग मतदारांच्या मागणीप्रमाणे मतदारसंघनिहाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत, अशी माहितीही निवडणूक प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button