ताज्या घडामोडीपिंपरी

पिंपरी चिंचवड शहरातील खड्डे बुजवण्याची मागणी; अन्यथा आंदोलनाचा इशारा –  विनोद वरखडे

Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शहरातील मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे (City Road Pits) पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना प्रवास करतांना स्त्यावरील मोठमोठ्या खड्ड्याच्या त्रासाला सामोरे जावे लागते आहे व रस्ता खराब असल्यामुळे धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न (Creating health issues) निर्माण झाला असून महापालिकेने तातडीने रस्त्यांचे दुरुस्ती (पॅकिंग) करण्याची मागणी मनपा आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

शहरातील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे  दररोज छोटे-मोठे अपघात होऊन दुर्घटना होत आहे.त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. तरी लवकरात-लवकर शहरातील खड्ड्यांच्या दुरुस्ती करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाहतुक सेल पिं. चिं. शहर (जिल्हा) शहराध्यक्ष विनोद वरखडे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते आप्पा दौंडे, भरत मोहोड व पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button