पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशन व शिवाई हेल्थ अँड वेलनेस सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबीर संपन्न


पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशन व शिवाई हेल्थ अँड वेलनेस सेंटर यांच्या सोजान्याने आरोग्य शिबीर संपन्न झाले.आरोग्य तपासणी शिबीर पिंपरी न्यायालतील पुरुष बार रूम मध्ये सकाळी 11.00 ते 5.00 यावेळेत आयोजित केले होते.


बहुसंख्य जवळपास 150 वकील बंधु भगिनी न्यायालयीन कर्मचारी यांनी उपस्थित राहून आरोग्य तपासणी करून घेतली. सुशांत भैया क्षीरसागर व शिल्पा क्षीरसागर,(जागतिक आरोग्य सल्लागार) मुकूंद देशमुख व दिपाली देशमुख, कृष्णा गोरुले (मेजर) व राधा गोरूले, प्रभात जाधव ( आरोग्य सल्लागार) यांचे मार्गदर्शन मिळाले.. यावेळी उपस्थित ॲड. नाना रसाळ, ॲड. मामा खरात, ॲड.बी.के.कांबळे,ॲड. सुनिल कडूस्कर, अध्यक्षा ॲड. प्रमिला गाडे, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, सचिव ॲड. वर्षा तिडके, ॲड. विशाल पोळ, ॲड. तेजस चवरे, ॲड.साक्षी धुमाळ, ॲड. पल्लवी कुऱ्हाडे, ॲड. संगीता कुशलकर, ॲड. प्रतीक जगताप, ॲड नारायण थोरात, ॲड. काळभोर , व कार्यकारिणी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनचे सभासद उपस्थित होते.











