शहरातील तब्बल ३०० पेक्षा जास्त मंडळांमार्फत बाप्पाची आरती करण्यासाठी शत्रुघ्न काटे आमंत्रित

चिंचवड विधानसभेत बदलाचे वारे
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे आणि सर्वांचे लक्ष लागले आहे ते चिंचवड विधानसभेवर.इच्छुकांनी मोर्चे बांधणी सुरू केले आहे परंतु त्यामध्ये सर्वात चर्चेतील आघाडीवर असलेले नाव म्हणजे शत्रुघ्न काटे.
चिंचवड विधानसभेसाठी इच्छुक असलेले भाजप नगरसेवक शत्रुघ्न काटे यांना यंदाचा गणेशोत्सव चांगलाच पावला असल्याचे चित्र आहे.चिंचवड विधानसभा मतदारसंघातील विविध परिसरातील तब्बल ३०० पेक्षा जास्त मंडळांनी बाप्पाची आरती करण्यासाठी आमंत्रित केले होते. यामध्ये पिंपळे गुरव , नवी सांगवी,जुनी सांगवी,पिंपळे सौदागर,रहाटणी,काळेवाडी, थेरगाव, वाकड, पिंपळे निलख, विशालनगर,रावेत,पुनावळे तसेच चिंचवडगाव या परिसरातील गणेश मंडळ तसेच गृहनिर्माण संस्थामधील तरुणांच्या मनात अतिउत्साह दिसून आला.
गणेश मंडळ म्हटलं की त्यांचे नेतृत्व करणारा तरुण वर्ग डोळ्यासमोर येतो. याच गणेश मंडळांतील तरुण वर्गाने शत्रुघ्न काटे यांचा उत्स्फूर्तपणे स्वागत करीत त्यांना आपली पसंती दर्शवली असून चिंचवड मतदार संघातील त्यांच्या मनातील भावी आमदार म्हणून शत्रुघ्न काटे यांनाच कौल दिल्याचे चित्र आहे.
आपल्या विकास कामाने पिंपळे सौदागर-रहाटणी प्रभागाचे कायापालट करणारे नेतृत्व म्हणून शत्रुघ्न काटे यांची ओळख शहर पातळीवर आहे परंतु पक्ष संघटनेच्या पातळीवर सतत त्यांच्यावर अन्याय झाला.
महापौर ,स्थायी समिती अध्यक्ष, पक्ष नेता तसेच शहर प्रमुख पद अश्या अनेक पदाचे मुख्य दावेदार असतांना देखील त्यांना बाजूला करण्यात आले आणि एकाच कुटंबाला प्राधान्य देत सर्व पदे दिल्यामुळे पक्षाने सर्वांची नाराजी ओढून घेतली.
परंतु यावेळी पक्ष नेतृत्व नक्कीच त्यांच्या नावाची दखल घेतील आणि चिंचवड विधानसभा उमेदवारी त्यांनाच देतील असा विश्वास शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केला आहे.












