भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या पिंपरी शाखेच्या वतीने शिक्षकांचा गौरव
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – शिक्षणमहर्षी डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशात शिक्षकदिन म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या पिंपरी शाखेच्या वतीने पिंपरी येथील सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवानी यांनी जयहिंद हायस्कूल आणि महाविद्यालयांतील प्राध्यापक यांचा गौरव केला.
यावेळी बोलताना मनोहर जेठवानी म्हणाले की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो आणि प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात जशी पहिली मार्गदर्शक ही जन्मदाती आई असते त्या प्रमाणे जीवनात समाजामध्ये वावरताना जे आवश्यक असते ते शिकविणे आणि प्रत्येक व्यक्तीला घडवणे हे महत्त्वाचे मार्गदर्शन आपल्या शिक्षक करत असतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आपला देश हा जगातील अनेक विविध प्रकारे प्रगती करीत असतो.
यावेळी भारतीय सिंधू सभा या संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुरेश हेमनानी आणि सिंधी समाजातील सेंट्रल पंचायत या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी श्रीचंद नागरानी, यांच्या हस्ते एम यु सी सी महाविद्यालयाच्या प्राचार्या विनीता बसंतानी,इंद्रा पुनावाला,पुजा गंगवानी, प्रेरणा खतवानी रेश्मा कैयानी,रोमा खेमचंदानी आणि सुरिंदर मंघवानी यांचा गौरव करण्यात आला या वेळी जगदीश आडवाणी ( भारतीय सिंधू सभा अध्यक्ष पुणे शाखा ) हरेश गंगवानी, सुनील कुकरेजा, पितांबर ऐलानी, नंदू नारंग,दिलीप बसंतानी आदी उपस्थित होते.