Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»शनिवारी पिंपरीत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी संकल्प मेळावा
ताज्या घडामोडी

शनिवारी पिंपरीत शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी संकल्प मेळावा

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com18 July 2024Updated:18 July 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

येत्या निवडणुकीत तीनही विधानसभांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणणार – शहराध्यक्ष तुषार कामठे

पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशाचे नेते शरदचंद्रजी पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.  शनिवारी दि.२० जुलै २०२४ रोजी शहराच्या मध्यवर्ती भागात नवमहाराष्ट्र महाविद्यालय पिंपरीगाव या ठिकाणी सायंकाळी ठीक ४ वाजता या भव्य विजयी संकल्प मेळाव्याचे आयोजन केले आहे.

पावसाळ्याच्या दिवसांमुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी कार्यक्रमस्थळी भव्य असा वॉटरप्रूफ सभामंडप उभारण्यात आला आहे. शिवाय १२ ते १५ हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्थाही करण्यात आली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी तुषार कामठे म्हणाले, लोकसभा निवडणुकीत मायबाप जनतेच्या आशीर्वादाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे दहापैकी तब्बल आठ खासदार संसदेत खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आदरणीय शरद पवार साहेब प्रथमच पिंपरी चिंचवड शहरात अशा भव्य कार्यक्रमासाठी येत आहेत. शरद पवार साहेबांच्या उपस्थितीत या कार्यक्रमात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, पिंपरी व चिंचवड या तीनही विधानसभांमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून येतील असा विजयी संकल्प करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या विकासाचे शिल्पकार म्हणून सर्वश्रुत असणाऱ्या आदरणीय शरद पवार साहेबांनी गेल्या पन्नास वर्षांच्या कार्यकाळात पिंपरी चिंचवड शहराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दुरदृष्टीय धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. या सर्व कार्यकाळात शहरातील कित्येक पितृतुल्य ज्येष्ठ मान्यवरांची शरद पवार साहेबांना भक्कम साथ लाभली, अशा शरद पवार साहेबांच्या सर्व जुन्या सहकाऱ्यांचा सन्मान यावेळी करण्यात येणार आहे. दुर्दैवाने आज हयात नाहीत अशा ज्येष्ठ सहकाऱ्यांच्या स्मृतिगंध स्वरूपी आठवणींनाही यावेळी उजाळा देण्यात येईल. त्याचबरोबर नवनिर्वाचित आठ खासदारांचाही सन्मान यावेळी केला जाणार आहे.
देशाला वाचविण्यासाठी तसेच संविधान रक्षण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्रभर निर्भय बनो चळवळीच्या माध्यमातून जनजागृती करून मोलाचे योगदान देणारे ऍड. असीम सरोदे, विश्वंभर चौधरी, वरिष्ठ पत्रकार संजय आवटे या मान्यवरांचाही यावेळी सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती तुषार कामठे यांनी पत्रकारांना दिली. यावेळी एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे यांनी एमआयएम पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करत असल्याचे जाहीर केले.

पत्रकार परिषदेत पक्षाचे प्रदेश प्रवक्ते रविकांतजी वर्पे, प्रदेश युवक सरचिटणीस प्रशांत सपकाळ, पिंपरी चिंचवड कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्ष ज्योती निंबाळकर, नव्यानेच पक्षात प्रवेश घेतलेले माजी नगरसेवक अजित गव्हाणे, पंकज भालेकर, धनंजय भालेकर यांच्यासह विनायक रणसुभे, उपाध्यक्ष दिलीप पानसरे, उपाध्यक्ष मोहम्मद अली सय्यद, ओबीसी विभाग शहराध्यक्ष भाई विशाल जाधव, विद्यार्थी अध्यक्ष राहुल आहेर राजरत्न शिलवंत, सरचिटणीस सचिन गायकवाड, पक्षाचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleअजित पवारांची पिंपरी चिंचवडमधील पदाधिकाऱ्यांसोबत पुण्यात बैठक
Next Article कासारवाडी जैन स्थानकात उपप्रवर्तिनी परम पूज्य मंगल प्रभाजी आदी ठाणा चार यांचा चातुर्मासार्थ मंगलमय प्रवेश समारंभ उत्साहात संपन्न
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

6 February 2026

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

पिंपळे सौदागर परिसरातील चौक सुशोभीकरणाचे काम प्रगतीपथावर

By maharashtrabreakingnews.com6 February 20260
Spread the love

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता…

पिंपरी-चिंचवडला 27 वे महापौर; रवी लांडगे होणार विराजमान चार वर्षांनंतर प्रशासकीय राजवट संपणार, लोकप्रतिनिधींचा कारभार सुरू

6 February 2026

सर्वांना आनंद देणे महत्त्वाचे! – शोभा जोशी

6 February 2026

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी 

6 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.