Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»‘रेड झोन’  बाधितांवरील टांगती तलवार कायमची दूर व्हावी : संजोग वाघेरे पाटील
ताज्या घडामोडी

‘रेड झोन’  बाधितांवरील टांगती तलवार कायमची दूर व्हावी : संजोग वाघेरे पाटील

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com29 February 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

– शहर विकासावर व नागरिकांच्या जीवनमानावर परिणाम

– रेड झोन प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षण मंत्र्यांकडे मागणी

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचव़ड शहर, देहूगाव, निगडी प्राधिकरण परिसर, तसेच आयटी पार्कसह असंख्य लोकसंख्येच्या परिसरासाठी ‘रेड झोन’ चा प्रश्न जिव्हाळ्याचा आहे. या ‘रेड झोन’चा  शहर विकासावर व बाधित नागरिकांच्या जिवनमानावर विपरित परिणाम होत आहे. केंद्र सरकार, संरक्षण विभाग आणि प्रशासकीय स्तरावर योग्य विचार होऊन  ‘रेड झोन’ बाधितांची कायमची सुटका करून त्यांच्यावरील टांगती तलवार दूर करावी, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) मावळ लोकसभा संघटक संजोग वाघेरे पाटील यांनी केली आहे.

या संदर्भात संजोग वाघेरे पाटील य़ांनी देशाचे संरक्षण मंत्री यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी व पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त यांना निवेदन पाठविले आहे. या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, संरक्षण विभागाचे दिघी व देहूरोड येथील अ‍ॅम्युनिशन डेपोमुळे तेथे ‘रेड झोन’ तयार करण्यात आलेला आहे. या ‘रेड झोन’चा शहर विकासावर व बाधित नागरिकांच्या जिवनमानावर विपरित परिणाम होत आहे. ‘रेड झोन’ मुळे देहूरोड परिसरातील एकूण बारा गावांतील सुमारे ५ हजार एकर जमीन बाधित झालेली आहे. देहूरोड कँटोन्मेंटसह पिंपरी चिंचवड मनपा, पूर्वी कार्यरत असलेल्या नवनगर प्राधिकरणाच्या भागातील असंख्य मिळकती, लघुउद्योग, तळवडे आयटी पार्क, एसआरए प्रकल्प याच ‘रेडझोन’ मुळे बाधित होतात. परिणामी, हजारो कामगार व कित्येक लाखो नागरिक अडचणीत आहेत. त्यांच्यावर ‘ रेड झोन’ची टांगती तलवार कायम आहे. हीच स्थिती पिंपरी चिंचवड शहरातील दिघी रेडझोनच्या बाबतीत देखील आहे.

संरक्षण विभागाच्या स्तरावर हा ५०० ते ७०० मीटर इतकी ‘रेड झोन’ची हद्द असावी, यावर चर्चा झाल्याचे वारंवार सांगण्यात येते. प्रत्यक्षात ‘रेड झोन’ची हद्द २ हजार मीटर इतकी कायम आहे.  लाखो नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेला हा ‘रेडझोन’ प्रश्न निकाली काढण्यासंदर्भात शासन पातळीवर अनास्था आहे. ‘रेड झोन’चा प्रश्न निकाली काढू, याचे फक्त आश्वासन ‘रेड झोन’ बाधितांना मिळत आले आहे. तो निकाली कसा निघेल, याकरिता प्रामाणिक प्रयत्न आणि निर्णयाची आवश्यकता आहे. त्यासाठी  पिं. चिं. मनपा आयुक्त, पुणे जिल्हाधिकारी व राज्य शासनाच्या स्तरावरून वस्तूस्थीती व योग्य प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर करावा. ‘रेड झोन’ बाधितांची कायमची सुटका करून त्यांच्यावरील टांगती तलवार दूर करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

चौकट तळवडे अग्नितांडवानंतर ‘रेड झोन’ प्रश्न गांभीर्याने घेणं महत्त्वांचं : संजोग वाघेरे

तळवडेत घडलेल्या अग्नितांडवात १३ महिला कामगारांचा मृत्यू झाला. या घटनेमागे  ‘रेड झोन’मुळे या भागाचा झालेला अनियोजित विकास देखील कारणीभूत आहे. ही बाब विचारात घेता केंद्र सरकारने हा प्रश्न गांभीर्याने घेण्याची गरज आहे. ‘रेडझोन’पासून या परिसरातील नागरिकांची सुटका कशी करता येईल, या करिता प्रयत्न होणे अत्यावश्यक बनलले आहे. ‘रेड झोन हटाव’ ही शहरवासीयांची आर्त हाक सरकारपर्यंत पोहोचविण्याची गरज आहे, ही बाब देखील संजोग वाघेरे पाटील यांनी निदर्शनास आणून दिली आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleपीसीसीओई एसीएम स्टुडन्ट चॅप्टर सहाव्यांदा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित
Next Article 34 वर्षांनंतर माजी विद्यार्थ्यांच्या शाळेची पुन्हा वाजली घंटा !
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.