पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नागरिकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन उपमहापौर शर्मिला बाबर यांनी केले.
स्वच्छ, सुंदर आणि देशात अव्वल स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेणे गरजेचे असून, स्वच्छ सर्वेक्षण २०२५–२६ अंतर्गत नागरिकांचा अभिप्राय हा शहराच्या कामगिरीचा महत्त्वाचा मापदंड मानला जातो. त्यामुळे प्रत्येकाने आपला अभिप्राय नोंदवून शहराला स्वच्छतेत अव्वल स्थान मिळवून देण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
आपले शहर स्वच्छ, सुंदर आणि देशात अव्वल बनवण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. स्वच्छ सर्वेक्षणात दिलेला तुमचा अभिप्राय हा शहराच्या विकासाला दिशा देणारा ठरेल . त्यामुळे आपण सर्व मिळून पिंपरी चिंचवडला देशात प्रथम क्रमांकावर नेण्याचा निर्धार करूया, असे उपमहापौर शर्मिला बाबर यांनी सांगितले.
शहराला देशात प्रथम क्रमांकावर नेण्यासाठी प्रशासनासोबत नागरिकांनी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच सर्व नागरिकांनी अभिप्राय नोंदवण्यासाठी https://cf.sbmurban.org या संकेतस्थळाला भेट देऊन त्यातील प्रश्नांची उत्तरे देत आपला अभिप्राय नोंदवावा, असे आवाहन देखील त्यांनी केले.
यावेळी उपमहापौर शर्मिला बाबर यांनी स्वतः देखील अभिप्राय नोंदवला.

