पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व अर्थमंत्री Devendra Fadnavis यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ आर्थिक ताळेबंद नसून राज्याच्या सर्वांगीण विकासाचा स्पष्ट रोडमॅप असल्याची प्रतिक्रिया आमदार Amit Gorakhe यांनी व्यक्त केली आहे.
या अर्थसंकल्पाबाबत प्रतिक्रिया देताना गोरखे म्हणाले की, दिवंगत Ajit Pawar यांच्या कार्याला श्रद्धांजली अर्पण करत त्यांच्या नावाने ‘अजित पवार गतिमान नागरी सेवा पुरस्कार’ सुरू करण्याचा तसेच त्यांच्या कार्याची आठवण जपणारे स्मारक उभारण्याचा निर्णय अत्यंत स्वागतार्ह आहे. प्रशासनातील शिस्त आणि विकासाभिमुख दृष्टीकोनासाठी ओळखल्या जाणाऱ्या अजित पवार यांच्या कार्याला हा योग्य सन्मान असल्याचे त्यांनी नमूद केले.
अनुसूचित जातींमधील आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी समिती गठित करण्याचा निर्णय हा सामाजिक न्यायाच्या दिशेने महत्त्वाचा आणि ऐतिहासिक टप्पा असल्याचे गोरखे यांनी सांगितले. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरक्षणाचा लाभ पोहोचावा, ही भूमिका या निर्णयामागे असून वंचित घटकांना न्याय देण्याचा सरकारचा प्रयत्न यातून दिसून येतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्यात आलेली ‘पुण्यश्लोक Ahilyabai Holkar कर्जमाफी योजना’, महिलांसाठी ‘लाडकी बहीण’ योजनेची भरीव तरतूद तसेच २५ लाख ‘लखपती दीदी’ घडवण्याचे उद्दिष्ट हे महिला सक्षमीकरणाला नवी दिशा देणारे असल्याचेही त्यांनी सांगितले. तरुणांसाठी मोठ्या प्रमाणावर पदभरती, स्टार्टअप्सना प्रोत्साहन आणि कौशल्य विकासावर दिलेला भर हा राज्यातील तरुणाईसाठी नवीन संधी निर्माण करणारा आहे.
तसेच पुणे मेट्रोचा विस्तार, बुलेट ट्रेन प्रकल्प आणि राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी केलेल्या तरतुदींमुळे महाराष्ट्राच्या औद्योगिक व आर्थिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले. धार्मिक आणि सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी केलेल्या तरतुदींमुळे श्रद्धा आणि विकास यांचा सुंदर संगम साधण्याचा प्रयत्न या अर्थसंकल्पातून दिसून येतो, असेही ते म्हणाले.
एकंदरीत हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक, सर्वस्पर्शी आणि सामान्य जनतेच्या हिताला केंद्रस्थानी ठेवणारा असल्याचे सांगत आमदार अमित गोरखे यांनी मुख्यमंत्री Devendra Fadnavis, उपमुख्यमंत्री Eknath Shinde आणि उपमुख्यमंत्री Sunetra Pawar यांचे आभार मानले.

