पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्राधिकरण, निगडी येथे महाराष्ट्र शाहीर परिषदेच्या ५८ व्या वर्धापन दिनानिमित्त बुधवार दिनांक ११ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिवंगत शाहीर कै. राजेंद्र आहेर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
यावेळी शाहीर प्रकाश ढवळे यांनी प्रस्ताविक करत कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली, तर शाहीर अशोक कामथे यांनी मनोगत व्यक्त केले. पुढे उपस्थित शाहीरांनी आपल्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढवली. यामध्ये सुरेश सुर्यवंशी, बाळासाहेब मालुसकर, घनश्याम कुदळे, जालिंदर शिंदे, दुर्गा शिंदे, वनिता मोहिते, स्मिता बांदिवडेकर, चित्रा कुलकर्णी, कांचन जोशी, लिना देशपांडे, ऊव्वला जाधव, राजरत्न पांडगळे, अनिकेत सोनकांबळे, श्रेयश सुर्यवंशी आणि प्रदीप वकील यांनी विविध पोवाडे सादर केले. या सादरीकरणांना नमन कांबळे यांनी ढोलकीची सुरेल साथ दिली.
कार्यक्रमास संतोष सायकर, जयंत आढाव, रेखा आढाव, रविकांत फुलावडे, प्रफुल्ल भिषणूरकर, चांदेकर, समुद्र काका आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी शाहीर वनिता मोहिते यांनी उपस्थितांचे आभार मानले.

