पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा मांडणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पातील तरतुदी सामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपा युवा मोर्चा, पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने ‘अर्थसंकल्प प्रचार-प्रसार संमेलन’ आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात अर्थसंकल्पातील विविध योजना आणि त्याचा युवकांना होणारा फायदा यावर संमेलनाचे प्रमुख वक्ते तथा भाजपा महाराष्ट्र प्रदेश कामगार आघाडी सरचिटणीस हनुमंत लांडगे यांच्या उपस्थितीत व भाजपा शहर अध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या अध्यक्षतेखाली सविस्तर चर्चा करण्यात आली..
हनुमंत लांडगे यांनी, हा अर्थसंकल्प केवळ आकड्यांचा खेळ नसून तो विकसित भारताचा पाया रचणारा आहे. विशेषतः कामगार वर्ग आणि मध्यमवर्गीयांच्या हिताचे रक्षण यामध्ये करण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञान आणि कौशल्यावर आधारित रोजगाराच्या संधी यामुळे तरुणांचे भविष्य उज्ज्वल होणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले..
शत्रुघ्न बाप्पु काटे यांनी, युवकांना संबोधित करताना सांगितले की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मांडलेला हा अर्थसंकल्प ‘सर्वसमावेशक’ आहे. पिंपरी-चिंचवड सारख्या औद्योगिक नगरीतील युवकांनी या योजनांचा लाभ घेऊन उद्योजकतेकडे वळावे. युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या योजना घराघरात पोहोचवून सामान्यांना सक्षम करावे असे आवाहन केले..
शहराच्या विविध भागातून मोठ्या संख्येने युवक आणि नागरिक या संमेलनात सहभागी झाले होते. योजनांची माहिती, स्टार्टअप इंडिया, कौशल्य विकास आणि कर रचनेतील सवलती यावर विशेष सादरीकरण करण्यात आले. तसेच अर्थसंकल्पातील सकारात्मक बाबी सोप्या भाषेत सांगणारी पत्रके यावेळी वितरित करण्यात आली..
या संमेलनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह दिसून आला असून, आगामी काळात शहरात विविध ठिकाणी अशाच स्वरूपाचे माहिती सत्र आयोजित करण्याचा मानस युवा मोर्चा शहर अध्यक्ष दिनेश यादव यांनी व्यक्त केला..
या प्रसंगी भाजपा पिंपरी चिंचवड शहर सरचिटणीस मधुकर बच्चे, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, युवा मोर्चा पुर्व शहर अध्यक्ष संकेत चोंधे, युवा मोर्चा सरचिटणीस सुमित घाटे, प्रसाद कस्पटे, दिनेश काटे यांच्या सह युवा मोर्चा पदाधिकारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते..

