पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २० मध्ये राजकीय वातावरण तापले असून राजेश वाबळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा घरोघरी प्रचार जोरात सुरू आहे. संत तुकाराम नगर, वल्लभनगर, महात्मा फुलेनगर, कासारवाडी आणि नाणेकर चौक परिसरात वाबळे पॅनेलने थेट मतदारांच्या दारात जाऊन संवाद साधत प्रचाराची आघाडी घेतली आहे.
या प्रचारादरम्यान स्थानिक प्रश्न, पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा तसेच युवक व महिलांसाठीच्या योजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. “प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि पारदर्शक कारभार हाच आमचा एकमेव अजेंडा आहे,” असा ठाम निर्धार राजेश वाबळे यांनी व्यक्त केला.
घरोघरी भेटीदरम्यान नागरिकांनी आपल्या समस्या मोकळेपणाने मांडल्या, तर वाबळे पॅनेलने त्या सोडवण्याची ग्वाही दिली. प्रचाराच्या प्रत्येक फेरीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता प्रभाग २० मधील लढत अधिकच रंगतदार होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

