पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ आयुर्वेद व संशोधन केंद्र आणि NIMA OBGY सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सुश्रुती २०२५ – आंतरराष्ट्रीय शल्य–वैद्यक परिषद’ तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमानंतर उत्साहात संपन्न झाली. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांच्या एकात्मिक दृष्टिकोनातून शल्य–वैद्यकीय विज्ञानात नवे दिशादर्शन करणारी ही परिषद देश–विदेशातील तज्ज्ञ, क्लिनिशियन, संशोधक, प्राध्यापक आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी प्रभावी व्यासपीठ ठरली.
डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरीचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील आणि प्र-कुलपती डॉ. भाग्यश्री पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली परिषदेचे भव्य आयोजन करण्यात आले.
मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साही उद्घाटन
उद्घाटन सोहळ्यास श्रीमती माधुरीताई मिसाळ, राज्य मंत्री – नगर विकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, महाराष्ट्र राज्य, तसेच विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एन. जे. पवार, प्र-कुलगुरू डॉ. स्मिता जाधव, कुलसचिव डॉ. जे. एस. भवाळकर, तसेच NIMA OBGY सोसायटी आणि आयोजन समितीतील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
प्र-कुलगुरू – डॉ. स्मिता जाधव म्हणाल्या, “सुश्रुती २०२५ या तीन दिवसीय परिषदेच्या माध्यमातून वैद्यकशास्त्र आणि प्रगत तंत्रज्ञान यांची सांगड घालणारा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यक यांचे एकत्रित ज्ञान भविष्यातील आरोग्यसेवेला नवे सामर्थ्य देईल.”
राज्यमंत्री माधुरी मिसाळ म्हणाल्या, “एकात्मिक आरोग्यसेवा ही काळाची मोठी गरज आहे. सुश्रुती २०२५ सारख्या परिषदांमुळे सर्वसमावेशक आणि रुग्णकेंद्री वैद्यकीय व्यवस्थेची उभारणी अधिक वेगाने घडते.”
कुलपती – डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “ज्ञान, संशोधन आणि नवोपक्रम यांच्या त्रिसूत्रीवर आधारित आरोग्यव्यवस्था घडवणे ही आमची सातत्यपूर्ण बांधिलकी आहे. सुश्रुती २०२५ ही त्या दिशेने उचललेले अत्यंत महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायी पाऊल आहे.”
लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्काराने मानाचा सन्मान
स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी प्रख्यात तज्ज्ञ डॉ. सुधा महादेवकर यांना यावर्षीचा लाइफटाइम अचिव्हमेंट पुरस्कार प्रदान करण्यात आला.
उत्कृष्ट संस्थांचा गौरव‘बेस्ट आयुर्वेद इन्स्टिट्यूट इनिशिएटिव्ह’ अंतर्गत स्त्रीरोग प्रसूती मधे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्थांना सन्मानित करण्यात आले :
प्रथम क्रमांक – S.S.A.M., हडपसर, द्वितीय क्रमांक – S.D.M., हसन, तृतीय क्रमांक – शासकीय आयुर्वेद महाविद्यालय, धाराशिव.
वैज्ञानिक सादरीकरणांना देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसादया वर्षीच्या प्री–कॉन्फरन्स कार्यशाळेला तब्बल ६०० नोंदी प्राप्त झाल्या.
एकूण १६० संशोधनपत्रांपैकी ९० संशोधनपत्रांचे सादरीकरण झाले.११ पोस्टर्स निवडण्यात आले, ज्यांपैकी ५ पोस्टर्स वैज्ञानिक चर्चासत्रातील महत्त्वाचा भाग ठरले.
शल्य–प्रशिक्षण सत्रे ठरली परिषदेची शान – अटोनिक PPH, Obstetric Suturing, ट्रॉमा–रिपेयर, इन्स्ट्रुमेंटल डिलिव्हरी, गर्भसंस्कार अशा विषयांवरील प्रत्यक्ष प्रशिक्षण सत्रांना उपस्थितांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला. फॉर्सेप्स, व्हॅक्यूम (Ventouse) आणि उच्च जोखीम सिझेरियन सेक्शन प्रक्रियेचे लाइव्ह डेमो सभागृहात मोठ्या पडद्यावर प्रक्षेपित करण्यात आले.
या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेच्या यशस्वी आयोजनासाठीडॉ. कामिनी धिमान, अध्यक्ष, NIMA OBGY सोसायटी (सेंट्रल PST),डॉ. प्रशांत खाडे, प्राचार्य व वैद्यकीय संचालक, डॉ.डी. वाय पाटील आयुर्वेद महाविद्यालय रुग्णालय, पिंपरी पुणे,
डॉ. प्रियांका नाकाडे, सचिव, NIMA OBGY सोसायटी (सेंट्रल PST),डॉ. सुहास हेरलेकर, उपाध्यक्ष, NIMA OBGY सोसायटी (सेंट्रल),
डॉ. प्रदीप मुसळे, अध्यक्ष, आयोजन समिती – सुश्रुती २०२५,डॉ. स्मृतिक तावरे, आयोजन सचिव – सुश्रुती २०२५,डॉ. विष्णू बावणे, खजिनदार, NIMA OBGY सोसायटी (सेंट्रल PST) मान्यवरांनी परिश्रम घेतले.
२३ नोव्हेंबर रोजी परिषदेचा समारोप ८ प्लेनरी सेशन्स, मेडिको–लीगल नाट्यप्रयोग आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाने झाला.सुश्रुती २०२५ ने एकात्मिक शल्य–वैद्यकीय विज्ञानासाठी नव्या संशोधन–दृष्टीकोनाची वाट मोकळी केली.

