Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक: नेतृत्व कायम, पण संचालक मंडळात मोठ्या बदलांचे संकेत
ताज्या घडामोडी

संत तुकाराम साखर कारखाना निवडणूक: नेतृत्व कायम, पण संचालक मंडळात मोठ्या बदलांचे संकेत

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com22 March 2025Updated:22 March 2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

बिनविरोध निवडणुकीसाठी सर्वपक्षीय सहमती

तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ-मुळशी तालुक्यातील प्रतिष्ठेची बनलेली संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याच्या दृष्टीने सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येत सहमती दर्शवली आहे. कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक पार पडेल, यावर सर्वपक्षीय शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. तथापि, संचालक मंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या मागणीमुळे काही फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

संचालक मंडळात नव्या चेहऱ्यांची मागणी

आमदार सुनील शेळके यांनी निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरून नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाला आव्हान दिल्याचा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न झाला. मात्र, शेळके यांनी हे स्पष्ट केले की, “नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाचा आदर असून, फक्त नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी, अशी सर्वसामान्य सभासदांची इच्छा आहे.” परिणामी, विद्यमान संचालकांपैकी काहींना माघार घ्यावी लागेल का, याबाबत उत्सुकता आहे.

राजकीय दबाव आणि समन्वयाची गरज

निवडणुकीसाठी २१ जागेकरिता विक्रमी १९५ अर्ज दाखल झाल्याने नवले यांची डोकेदुखी वाढली होती. मात्र, पक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतर समन्वय साधत ही निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवार यांच्या वतीने निरीक्षक सुरेश घुले, आमदार शंकर मांडेकर, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, आमदार बाबाजी काळे, माजी मंत्री बाळा भेगडे, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांची उपस्थिती होती.

राजकीय समीकरणे आणि भविष्यातील दिशा

कारखान्याचे उपाध्यक्ष बापूसाहेब भेगडे यांनी अपक्ष म्हणून मागील विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे आगामी राजकीय समीकरणे काय राहतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच, निवडणूक बिनविरोध करण्यासाठी उमेदवारांनी २५ मार्चपर्यंत माघार घ्यायची आहे. जर हे शक्य झाले, तर नानासाहेब नवले यांचे अध्यक्षपद कायम राहणार असून, संचालक मंडळात नवीन चेहऱ्यांचा समावेश होणार आहे.

*कारखान्याचा प्रगतीशील इतिहास*

नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने मोठी भरारी घेतली आहे. पहिल्याच गळीत हंगामात राज्यात अव्वल क्रमांक पटकावल्यापासून ते नुकत्याच कार्यान्वित झालेल्या ९२ कोटींच्या इथेनॉल प्रकल्पापर्यंत कारखान्याने प्रगतीचे अनेक टप्पे ओलांडले आहेत. या यशात शरद पवार, अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय नेत्यांचे योगदान राहिले आहे.

संत तुकाराम साखर कारखान्याची आगामी निवडणूक बिनविरोध करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू असून, नानासाहेब नवले यांच्या नेतृत्वाला सर्वपक्षीय समर्थन मिळाले आहे. मात्र, संचालक मंडळात नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची मागणी आणि राजकीय समीकरणे पाहता, ही निवडणूक केवळ कारखान्यापुरती मर्यादित न राहता संपूर्ण मावळ तालुक्यातील राजकारणाला नवा कलाटणी देणारी ठरणार आहे.

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleइज ऑफ लिविंगच्या अनुषंगाने पीएमआरडीएतर्फे चर्चासत्र
Next Article महावितरण समस्यांबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांना ‘‘साकडे’’
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.