Close Menu
maharashtrabreakingnews.com
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Subscribe to Updates

Get the latest creative news from FooBar about art, design and business.

What's Hot

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026
Facebook X (Twitter) Instagram YouTube WhatsApp
Facebook X (Twitter) Instagram YouTube
maharashtrabreakingnews.commaharashtrabreakingnews.com
Subscribe
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ
maharashtrabreakingnews.com
Home»ताज्या घडामोडी»हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.. पाच लाख पुरणपोळ्या, चार हजार लीटर दूध, दोन लाख मांडे.. सोहळ्याची भव्यतेची होईल ऐतिहासिक नोंद
ताज्या घडामोडी

हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.. पाच लाख पुरणपोळ्या, चार हजार लीटर दूध, दोन लाख मांडे.. सोहळ्याची भव्यतेची होईल ऐतिहासिक नोंद

maharashtrabreakingnews.comBy maharashtrabreakingnews.com16 March 2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp VKontakte Email
Share
Facebook Twitter LinkedIn Pinterest Email
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हजारोंच्या संख्येने उपस्थित भाविक, रोज हजारोंच्या संख्येत गाथा पाराण, हजारोंचा तुकाराम जप, हजारो भाविकांना प्रसाद, हा प्रसाद करणारे हजारो हात.. अशा भव्य वातावरणात पार पडणारा जगद्गुरू तुकोबाराय त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सदेह वैकुंठ गमन सोहळ्याची इतिहासात निश्चितच नोंद राहील.

या भव्य सोहळ्याच्या निमित्ताने सांप्रदायात लोकांमध्ये भक्तिची भावना वाढीस लागली पाहिजे. असे सोहळे दरवर्षी झाले पाहिजेत. त्यानिमित्ताने लोकांच्या हातून दान केले जात आहे. कुठेतरी आपण समाजाचे, संतांचे देणे लागतो, याचे उतराई होण्याचा प्रयत्न लोकांनी केला पाहिजे. संप्रदायाविषयीची लोकांची भावना दृढ होत असते. हा सोहळा आयोजित करण्यात आला म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणावर नामजप करण्यात आला आणि तो यशस्वी झाला. १५ हजार लोक पारायण करण्यासाठी बसले होते.

संत तुकाराम महाराज जिथे गाथा लिहिण्यासाठी बसले होते, तिथेच सध्या पारायण सुरू आहे. हा योग क्वचित येत असतो. पुन्हा पुन्हा हे सगळे अनुभवता येणार नाही. त्या माध्यमातून समाजाची आणि संतांची सेवा घडावी, अशी इच्छा व्यक्त होत आहे. तुकाराम बीजेच्या दिवशी ७० ते ८० हजार लोक श्रवणासाठी उपस्थित असतील असा अंदाज आहे. त्यादृष्टीने नियोजन सुरू आहे.

पुरणपोळ्यांसाठी उत्तरप्रदेशातून तूप

श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे सुरू असलेल्या सोहळ्यामध्ये होळी पौर्णिमेनिमित्त मुळशी तालुक्यातून पाच लाख पुरणपोळ्या आल्या होत्या. तालुक्यातील गावांमध्ये घरोघरी महिलांनी पुरणपोळ्या तयार केल्या आणि त्या भंडारा डोंगरावर प्रसादासाठी पाठविण्यात आल्या. या प्रसादासाठी पुरणपोळीबरोबर चार हजार लीटर दूध आले होते. पुणे जिल्हा आणि आसपासच्या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू असतानाच उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथून ३७५ किलो तूपाचे डबे आले होते. आमदार शंकरभाऊ जगताप यांचे बंधू विजू शेठ जगताप यांच्या सहकार्याने हे तूप आणण्यात आले.

बीजेच्या दिवशी तीन लाख मांडे भोजन

आज बीजेच्या दिवशी मांडे भोजन होणार आहे. धुळे तालुका वारकरी सेवा मंडळ, समस्त साक्री तालुका वारकरी सेवा मंडळ, समस्त मालेगाव, सटाणा, देवळा, चांदवड, पारोळा या तालुक्यांमधून म्हणजे पुण्यापासून ५५० ते ६०० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वेगवेगळ्या तालुक्यांमधून २ लाख मांडे भोजन पाठविले जात आहे. शनिवारी (१५ मार्च) संध्याकाळी या गाड्या श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथे दोन लाख मांडे घेऊन येतील. या तालुक्यांमधील घरोघरी मांडे तयार केले जाणार आहेत.

एकूणच सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शिधा देण्यात आला आहे. गावागावातून शिधा दिला गेला आहे. एखाद्या गावाने ३७५ तेलाचे डबे दिले आहेत. हा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी सोहळा असल्यामुळे ३७६ या आकड्याचे महत्त्व राखून तशाप्रकारे दान दिले जात आहे. ज्याला जितके जमेल तसा शिधा लोक देत आहेत. काही जणांनी ५०, १०० तेलाचे डबे दिले आहेत.

मोठ्या प्रमाणावर इंद्रायणी तांदूळ दान

मावळात जिथे शेतकरी भाताचे पीक घेतात त्या शेतकऱ्यांनी तांदूळ प्रचंड मोठ्या प्रमाणावर दान केला आहे. आत्ता सुरू असलेल्या भव्य सप्ताहासारखे आणखी चार सप्ताह होतील, इतक्या मोठ्या प्रमाणात इंद्रायणी तांदूळ या सोहळ्यासाठी शेतकऱ्यांनी पाठविला आहे.

काल्याच्या कीर्तनाने १७ तारखेला सोहळा संपेल.

हभप ज्ञानेश्वर महाराज कदम अर्थात छोटे माऊली यांच्या शब्दाखातर समाज मोठ्या प्रमाणावर एकत्र आला आहे आणि हा सोहळा यशस्वी होण्यासाठी हातभार लागला आहे. त्यांचे हे कार्य खूप मोठे केले आहे. त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी छोटे माऊली यांचा मनपत्र देऊन गौरव करावा अशी इच्छा पुणे जिल्ह्यातील सेवेकरींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे १७ तारखेला हे मानपत्र प्रदान केले जाईल, अशी चर्चा आहे.

सोहळ्याची वैशिष्ट्ये

– सोहळ्याच्या परिसरात २४ तास तुकाराम नावाचा जप सुरू आहे.

– त्यासाठी स्वतंत्र मंडप व्यवस्था करण्यात आली आहे.

– १२० गावांचे वीणेकरी २४ तास पहारा देत असतात आणि अखंड नामजप सुरू असतो.

– गाथा पारायणात १५ हजार जणांचा सहभाग आहे.

– रोज ५०० टाळकरी, १२ वीणेकरी सोहळ्यात उपस्थित असतात.

– बीजेच्या दिवशी ७० ते ८० हजार लोक कीर्तनासाठी असतील

Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr WhatsApp Email
Previous Articleयश मिळेपर्यंत प्रयत्न सोडू नका – शरमन जोशी
Next Article एसबीपीआयएमचा माजी विद्यार्थी मेळावा संपन्न
maharashtrabreakingnews.com
  • Website

Related Posts

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

5 February 2026

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026
Leave A Reply Cancel Reply

Demo
Our Picks

Remember! Bad Habits That Make a Big Impact on Your Lifestyle

13 January 2021

The Right Morning Routine Can Keep You Energized & Happy

13 January 2021

How to Make Perfume Last Longer Than Before

13 January 2021

Stay off Social Media and Still Keep an Online Social Life

13 January 2021
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
  • Vimeo
Don't Miss
ताज्या घडामोडी

कष्टकरी कामगारांनी जागवल्या अजितदादांच्या आठवणी 

By maharashtrabreakingnews.com5 February 20260
Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी,…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या गटनेतेपदी भाऊसाहेब भोईर यांची नियुक्ती

4 February 2026

काळा घोडा फेस्टिव्हल २०२६’ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिकेच्या शाळेला प्रथम क्रमांक

4 February 2026

येरवड्यात ‘यशस्वी महिला सामाजिक संस्था’चा समतेचा संदेश देणारा हळदीकुंकू कार्यक्रम

4 February 2026

Subscribe to Updates

Get the latest creative news from SmartMag about art & design.

About Us

Maharashtra Breaking News ही महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडी वाचकांपर्यंत वेगाने पोहोचवणारी विश्वासार्ह डिजिटल न्यूज वेबसाइट आहे. आम्ही ब्रेकिंग न्यूज, राजकारण, समाज, गुन्हेगारी, शिक्षण, आरोग्य, व्यवसाय, तंत्रज्ञान आणि मनोरंजन या सर्व क्षेत्रांतील महत्त्वाच्या बातम्या सातत्याने प्रकाशित करतो. आमचा भर अचूकता, तथ्य तपासणी आणि निष्पक्ष पत्रकारितेवर आहे. प्रत्येक बातमी वाचकांसाठी सोप्या आणि स्पष्ट भाषेत सादर केली जाते. समाजहिताशी संबंधित विषयांना प्राधान्य देणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. अफवा आणि अप्रमाणित माहितीपासून दूर राहून आम्ही जबाबदार बातमीदारी करतो. आमची वेबसाइट मोबाईल-फ्रेंडली असल्याने कुठेही आणि कधीही बातम्या वाचता येतात. वाचकांचा विश्वास जपणे हेच आमचे खरे बळ आहे. बदलत्या काळासोबत डिजिटल पत्रकारितेचे नवे मापदंड आम्ही स्वीकारत आहोत. Maharashtra Breaking News सोबत जोडा आणि प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडीवर अपडेट राहा.

Choose Language To Read
@2023 - All Rights Reserved.Website Designed & Developed By Swara Infotech 9096040204
  • ताज्या घडामोडी
  • पिंपरी चिंचवड
    • भोसरी
  • देहू
  • आळंदी
  • पुणे
    • मावळ
    • शिरूर
    • हिंजवडी
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • राजकारण
  • क्राईम
  • Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
  • डिजिटल आवृत्ती – जाहिरात
  • मनोरंजन
  • शिक्षण
  • सांस्कृतिक
  • जाहिरात विभाग
  • आरोग्य
  • धार्मिक
  • आरोग्य
  • क्रीडा
  • नवरात्री विशेष
  • व्हिडिओ

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.