- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक ११ मधील म्हेत्रे वस्ती, अल्पाइन सोसायटी आणि सेलेस्टा सोसायटी परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नारायण बहिरवाडे यांनी थेट संवाद दौर्यातून प्रचाराला धार दिली आहे. हातात प्रचार साहित्य घेऊन नागरिकांच्या दारात पोहोचत त्यांनी मतदारांशी प्रत्यक्ष भेटी घेतल्या आणि त्यांच्या समस्या, अपेक्षा व अडचणी जाणून घेतल्या. या संवाद दौर्यात ज्येष्ठ नागरिक, महिला आणि तरुण वर्ग मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. “फक्त निवडणुकीपुरते नव्हे तर कायम लोकांमध्ये राहणारे नेतृत्व हवे,” अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली. रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज आणि मूलभूत सुविधांबाबत नागरिकांनी थेट प्रश्न मांडले असता, त्यावर ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन नारायण बहिरवाडे यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुनावळे, वाकड आणि ताथवडे परिसरात प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार चेतन पवार यांनी हातात मशाल घेऊन काढलेली प्रचारफेरी संपूर्ण परिसराचे राजकीय वातावरण ढवळून काढणारी ठरली. ‘मशाल’ या निवडणूक चिन्हासह चेतन पवार थेट जनतेत उतरल्याने, ही फेरी केवळ प्रचारापुरती न राहता परिवर्तनाचा निर्धार व्यक्त करणारी ठरली. घराघरांतून, गल्ल्यागल्ल्यांतून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना “प्रभागात बदल हवा”, “काम करणारा नगरसेवक हवा” अशा घोषणा परिसरात दुमदुमत होत्या. चेतन पवार यांनी स्थानिक प्रश्नांवर थेट बोट ठेवत सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर जोरदार हल्लाबोल केला. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि अनियोजित विकासामुळे नागरिक त्रस्त असल्याचा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १२ मध्ये भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शांताराम भालेकर यांच्या प्रचाराला तळवडे परिसरात प्रचंड वेग आला असून, तळवडेकरांनी एकजुटीने रस्त्यावर उतरत जोरदार झंझावात उभा केला आहे. घरोघरी प्रचार, पदयात्रा, कॉर्नर सभा आणि थेट जनसंवादाच्या माध्यमातून भाजपचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. “काम करणारा, जनतेशी जोडलेला आणि विकासाला प्राधान्य देणारा उमेदवार” अशी स्पष्ट ओळख असलेल्या शांताराम भालेकर यांना नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, प्रचारादरम्यान ‘आता बदल नाही, तर मजबूत नेतृत्व हवे’ अशी मतदारांची भावना ठळकपणे व्यक्त होत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, सुरक्षा आणि नागरी सुविधा यांसारख्या प्रश्नांवर भालेकर यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधील काकडे पार्क परिसरात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ॲड. मोरेश्वर शेडगे यांनी घरोघरी भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. या जनसंपर्क मोहिमेत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि सक्रिय सहभाग पाहायला मिळाला. नागरिकांच्या घरात जाऊन त्यांच्या समस्या, अपेक्षा आणि विकासासंबंधीच्या सूचनांचा थेट आढावा घेताना ॲड. शेडगे यांनी “जनतेशी थेट संवाद, लोकांचा सहभाग आणि परस्पर सहकार्य याच माध्यमातून सक्षम, सुरक्षित व विकसित प्रभाग उभारता येतो,” असा ठाम विश्वास व्यक्त केला. या भेटीदरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, नागरी सुविधा तसेच युवक व ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सोयी-सुविधांबाबत नागरिकांनी मते मांडली. विकासकामांबाबत…
भाजप समोर केवळ विकासाचा मुद्दा पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- भाजपची मुख्य भूमिका म्हणजे स्त्रीचा सन्मान आहे. स्त्रीशक्ती शिवाय शिव सुद्धा शून्य आहे. म्हणूनच भाजपने महिला भगिनींचा सन्मान करणारे स्त्री शक्तीयुग आणले. म्हणूनच महिला भगिनींनी आपल्या विकासाची ही निवडणूक हाती घ्यायची आहे. निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीशी उभे राहायचे आहे. विरोधक चुकीचे सांगतील मात्र या भूलथापांना बळी पडायचे नाही. भाजपचा विकासाचा मुद्दा आहे आणि याच मुद्द्यावर आपण भाजपच्या उमेदवारांना बहुमताने निवडून द्यायचे आहे असे आवाहन पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. भारतीय जनता पार्टी, आर.पी.आय. (आ.) मित्रपक्षातील अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ विमल गार्डन, रहाटणी येथे पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री…
नवी सांगवी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जुनी सांगवी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विजय संकल्प सभेत नवी सांगवी – प्रभाग क्रमांक ३१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचा कार्यअहवाल प्रकाशित करण्यात आला. या कार्यअहवालात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात राबविण्यात आलेली विविध विकासकामे, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, शिक्षण तसेच मूलभूत सोयीसुविधांचा सविस्तर आढावा मांडण्यात आला आहे. यावेळी प्रभाग क्र. ३१ चे उमेदवार राजेंद्र गणपत जगताप, अरुण श्रीपती पवार, उमा शिवाजी पाडुळे, दिप्ती अंबरनाथ कांबळे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने सातत्याने भरीव…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 20 मधील राजकीय हळहळ उसळू लागली आहे. या प्रभागात शिवसेना (एकनाथ शिंदे गट) तर्फे राजेश वाबळे यांच्या पॅनलचा प्रचार जोरात सुरु आहे, आणि जनतामध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसत आहे. राजेश वाबळे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलमध्ये विनोद नामदेव वाघमारे, वैशाली राजेश वाबळे, स्वीटी निलेश मलातपुरे, व राजेश चिमणराव वाबळे यांचा समावेश आहे, ज्यांनी भागातील विविध समाजकेंद्रे, गल्ली-रस्ते आणि व्यस्त विस्तारांमध्ये मतदारांशी थेट संवाद साधला आहे. मतदारांना प्रभागाचा सर्वांगीण विकास, राहतात सुविधांचा विस्तार, पायाभूत सुविधांची सुधारणा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या जनहितकारी योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवणे हे प्रमुख घरोघरी पोहचवण्यात येत आहे. पॅनलच्या प्रचार…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी पात्र मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी गेल्यानंतर मतदार छायाचित्र ओळखपत्र दाखवल्यानंतर मतदान करता येईल. जर एखाद्या पात्र मतदाराकडे मतदार छायाचित्र ओळखपत्र नसल्यास त्या व्यक्तीला राज्य निवडणूक आयोगाच्या १४ जुलै २०२५ च्या आदेशानुसार निश्चित केलेल्या अन्य १२ प्रकारच्या ओळखीच्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा दाखविल्यानंतर मतदान करता येईल, अशी माहिती महापालिकेच्या निवडणूक विभागातून देण्यात आली. पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीअंतर्गत १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजता मतदान होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी सादर करावे. परंतु ज्यांच्याकडे छायाचित्र…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये प्रचाराला वेग आला असून अधिकृत उमेदवार बारणे सिद्धेश्वर बाळासाहेब यांच्या प्रचार दौऱ्याला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शिव कॉलनी परिसरात घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधताना त्यांनी विकास, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका मांडली. प्रचारादरम्यान नागरिकांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व सार्वजनिक सुविधा यांसारख्या प्रश्नांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. त्यावर बारणे यांनी प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस आराखडा असल्याचे सांगत, महापालिकेत सक्षम प्रतिनिधित्व देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या कामकाजाची ओळख आणि सातत्यपूर्ण संपर्कामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण वर्गाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आणि अजित दादा पवार यांनी कष्टकरी कामगारांचा, दुर्बल घटकांचा विश्वासघात केला आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये निवडणुका सुरू आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरासह सर्व राज्यातील महानगरपालिकेतील भाजपच्या उमेदवारांना कष्टकरी कामगारांनी मतदान करावे आणि कष्टकऱ्यांचा अपमान करणारे अजितदादा आणि त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्यांची जागा दाखवून द्यावी असे कामगार नेते डॉ. बाबा कांबळे यांनी सांगितले. पिंपरी येथे शुक्रवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत डॉ. बाबा कांबळे बोलत होते. यावेळी आमदार महेशदादा लांडगे, उमा खापरे, अमित गोरखे, भाजपा दक्षिण भारत आघाडी प्रदेशाध्यक्ष राजेश पिल्ले, भाजप शहर प्रवक्ते कुणाल…
