Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेवाडी परिसरात भाजपने आक्रमक प्रचाराला सुरुवात करत ‘काळेवाडीत शिवस्मारक होणारच’ असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. भाजपचे उमेदवार विनोद नढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गाठीभेटी व प्रचार दौऱ्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून, हिंदुत्ववादी विचारांची ताकद एकवटताना दिसत आहे. आज झालेल्या गाठीभेटी व प्रचारादरम्यान प्रभागातील सर्व शिवभक्त, हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक कार्यकर्ते एकत्र आले. विनोद नढे यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार नागरिकांच्या थेट भेटीसाठी मैदानात उतरले. घरोघरी जाऊन संवाद साधताना शिवस्मारकाचा मुद्दा, परिसराचा विकास, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न यावर भर देण्यात आला. सायंकाळी झालेल्या प्रचारफेरीला अजिंक्य मित्र मंडळ परिवाराने भव्य दिव्य…

Read More

आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केला पूररेषेचा मुद्दा:   मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा निळ्या आणि लाल पूररेषेचा प्रश्न कायमचा निकालात काढणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड सहित संपूर्ण महाराष्ट्रमध्ये  फेर सर्वेक्षण करून निळी आणि लाल पूररेषा नव्याने आखणी करण्यात येणार आहे. “फ्लड मेटिगेशन मेजर्स”नुसार कोल्हापूरच्या धर्तीवर नवा डीसीपीआर केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकुर्डी येथील सभेत शनिवारी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अधिकृत उमेदवारांसाठी आकुर्डी विठ्ठल मंदिर येथे शनिवारी (दि १०) मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा पार पडली . निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप, आमदार…

Read More

वाकड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २५ मधील वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरात राहणाऱ्या आणि हिंजवडीसह परिसरात आयटीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५ मधील भाजप उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देत सलग दुसऱ्यांदा महापालिकेत भाजपाला संधी देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. वाकड, ताथवडे आणि पुनावळे भागातल्या विविध सोसायट्यामध्ये प्रभाग २५ मधील भाजप पॅनलचा झंझावती प्रचार सध्या सुरू आहे. प्रभाग क्रमांक २५ मधील उमेदवार राहुल तानाजी कलाटे, कुणाल वाव्हळकर, श्रुती राम वाकडकर आणि रेश्मा चेतन भुजबळ यावेळी उपस्थित होते. केवळ आश्वासने देणारे नेते नकोत, तर नेहमी आमच्या संपर्कात असणारे , आमचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर पर्याय देणारे नेतृत्व…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपळे सौदागर रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार सौ. अनिता संदीप काटे यांनी आपला प्रचार पूर्णतः विकासकेंद्रित ठेवत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अनिता काटे यांनी शिक्षणाला विकासाची किल्ली मानत प्रभागाच्या सर्वांगीण परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रचारादरम्यान प्रभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नागरी समस्या, मूलभूत सुविधांचा अभाव, असुरक्षिततेची भावना आणि नियोजनाअभावी रखडलेला विकास हे मुद्दे ठळकपणे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देणारे निर्णय, सुरक्षित व सुव्यवस्थित परिसर आणि नियोजनबद्ध विकास हेच आपल्या प्रचाराचे केंद्र असल्याचे अनिताताई…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मागील सार्वत्रिक निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिले. भाजपचे तत्कालीन शहर अध्यक्ष आमदार स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप आणि नंतरचे शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड मध्ये आणि विशेष करून भोसरी गावठाण परिसरात भव्य दिव्य प्रकल्प उभारण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा भव्य पुतळा तसेच सर्व्हे नंबर १ मधील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती व कबड्डी प्रशिक्षण केंद्र, प्रगतीपथावर असणारे भव्य स्टेडियम, सार्वजनिक मंडई, नागरिकांना अहोरात्र वैद्यकीय सेवा सुविधा देणारे अत्याधुनिक १०० बेडचे नूतन भोसरी रुग्णालय, बैलगाडा शर्यत शिल्प, योगासन समूह शिल्प, संपूर्ण भोसरी गावठाण…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गाव खेड्यांचे एकत्रीकरण करून पिंपरी चिंचवड शहराची स्थापना झाली. आता पिंपरी चिंचवड शहर हे मेट्रोसिटी म्हणून ओळखले जात आहे. आय. टी. उद्योग, शिक्षण आणि रोजगारासाठी काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत असलेल्या बेरोजगार तरुणांना पिंपरी चिंचवड येथे रोजगार मिळण्याची खात्री वाटते, मागील ३५ वर्षात लोकांमध्ये हा विश्वास मिळवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली शहर विकासासाठी नियोजन करून निर्णय घेतले आहेत. विकासाचा वेग मागील १० वर्षात कमी झाला होता. आता पुन्हा महापालिकेत राष्ट्रवादीला सत्ता द्या असे आवाहन माजी नगरसेवक धनराज आसवाणी यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग क्रमांक १९ मधील अधिकृत उमेदवार रीना लहू तोरणे…

Read More

पिंपळे निलख, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २६ मधील राजकीय वातावरणात मोठा बदल घडून आला आहे. पिंपळे निलख येथील मा. स्थायी नेते विलास नांदगुडे यांच्या अपक्ष पॅनलला वंचित बहुजन आघाडीने जाहीर पाठिंबा दिला आहे. या निर्णयामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली असून निवडणूक लढतीत नवे समीकरण तयार झाले आहे. वंचित बहुजन आघाडीचे महासचिव अ‍ॅड. प्रियदर्शी तेलंग, राज्य उपाध्यक्ष अनिल जाधव तसेच राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी याबाबतचे अधिकृत पाठिंब्याचे पत्र दिले आहे. या पत्रामुळे अपक्ष पॅनलला मोठे बळ मिळाले असून स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रसंगी सायली पायगुडे, श्रुती…

Read More

पिंपळे निलख, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर पिंपळे निलख येथील ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर परिसरात भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत बोलताना माजी स्थायी समितीचे अध्यक्ष विलास नांदगुडे यांनी पिंपळे निलख व वाकड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण विकासाचा आराखडा जाहीर केला. नांदगुडे म्हणाले की साई चौक ते औंध मिलिटरीकडे जाणारा शंभर फुटी रस्ता तयार करण्यात येणार असून, पिंपळे निलख ते बालेवाडी दरम्यान दोन नद्यांवर दोन नवीन पूल उभारले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मिलिटरीकडून स्टेडियमसाठी जागा घेण्याचा पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती दिली. पिंपळे निलख–वाकड परिसरात बालगंधर्वसारखे सुसज्ज नाट्यगृह उभारण्याचा संकल्पही त्यांनी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत चालले असून रावेत–किवळे परिसरातील केरळी बांधवांनी दीपक भोंडवे यांच्या पॅनलला दिलेला जाहीर पाठिंबा ही निवडणुकीतील महत्त्वाची घडामोड मानली जात आहे. विविध समाजघटकांना सोबत घेऊन चालणाऱ्या भोंडवे पॅनलच्या प्रचाराला आता सामाजिक पाठबळ अधिक बळकट होत असल्याचे चित्र दिसत आहे. रावेत व किवळे परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या केरळी बांधवांनी विकास, पारदर्शक कारभार आणि मूलभूत सुविधांसाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या दीपक भोंडवे यांच्या भूमिकेवर विश्वास व्यक्त केला आहे. “नेतृत्व असेच असावे जे समाजाच्या प्रत्येक घटकाला समान न्याय देईल,” अशी भावना व्यक्त करत केरळी बांधवांनी भोंडवे पॅनलच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८ मध्ये भाजप उमेदवार शत्रुघ्न काटे यांच्या संभाव्य हॅट्रिक विजयाची जोरदार चर्चा सुरू आहे. मागील दोन निवडणुकांत मिळवलेल्या सलग विजयामुळे यंदाही त्यांच्या विजयाबाबत प्रभागात आशावादी वातावरण निर्माण झाले असून प्रचाराला मिळणारा प्रतिसाद या चर्चेला बळ देत आहे. घरोघरी संपर्क, स्थानिक बैठका आणि नागरिकांशी थेट संवाद हा शत्रुघ्न काटेंच्या प्रचाराचा केंद्रबिंदू ठरत आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, उद्याने तसेच मूलभूत नागरी सुविधांसाठी केलेल्या कामांची दखल मतदार घेत असल्याचे चित्र दिसत आहे. विकासकामांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि प्रशासनाशी असलेली समन्वयाची भूमिका यामुळे ‘काम करणारा नेता’ अशी त्यांची ओळख प्रभागात पक्की झाली आहे. महिला,…

Read More