- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- शहरातील हजारो नागरिकांसाठी दिलासादायक ठरणारी मोठी राजकीय घडामोड घडली असून ब्लू लाईनचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर निर्णायक भूमिका घेतल्याने पुनर्विकासाच्या प्रक्रियेला मोठी गती मिळणार आहे. या यशामागे सुरेश भोईर, मनीषा चिंचवडे, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि अपर्णा डोके यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याची निर्णायक भूमिका ठरली आहे. ब्लू लाईनमुळे शहरातील अनेक पुनर्विकास प्रकल्प, गृहसंकुले आणि व्यावसायिक इमारती वर्षानुवर्षे अडकून पडल्या होत्या. नागरिकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते, तर विकासावर गंभीर निर्बंध आले होते. या सर्व समस्यांकडे सुरेश भोईर, मनीषा चिंचवडे, ॲड. मोरेश्वर शेडगे आणि अपर्णा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक २० मध्ये शिवसेनेच्या (धनुष्यबाण) उमेदवार राजेश वाबळे यांच्या पॅनलने प्रचारात आघाडी घेतली असून संत तुकाराम नगर, पिंपरी परिसरात त्यांचा जनसंपर्क दौरा विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या पॅनल मध्ये विनोद वाघमारे वैशाली राजेश वाबळे, स्वीटी मलतपुरे यांनी घरोघरी भेटी, नागरिकांशी थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांवर स्पष्ट भूमिका यामुळे वाबळे पॅनलला मोठा प्रतिसाद मिळत आहे. प्रचारादरम्यान पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी हे प्रमुख मुद्दे मांडण्यात येत असून “विकास, पारदर्शकता आणि जनहित” हा प्रचाराचा केंद्रबिंदू ठरला आहे. संत तुकाराम नगरातील नागरिकांनी वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी…
निगडीचा रणसंग्राम पेटला , शिवसेनेची पदयात्रा, अभिनेत्री पूजा काळेंच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निगडी परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून प्रभाग क्रमांक १३ क मध्ये शिवसेनेच्या रिपब्लिकन सेना (आनंदराज आंबेडकर गट) पक्षाच्या वतीने सुलभा उबाळे, शुभांगी बोऱ्हाडे, तानाजी शिंदे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आज ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत ही पदयात्रा पार पडणार असून, निगडी वसाहत, निगडी स्मशानभूमी परिसर, आजाद चौक, राहुल नगर, विलास नगर, राज नगर, संजय नगर, इंदिरा नगर व संगम नगर परिसरातून ही पदयात्रा मार्गस्थ होणार आहे. या पदयात्रेमध्ये शिवसेनेचे पक्षाचे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २५ मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ठाकरे गटाचा प्रचार जोरात सुरू असून, या पार्श्वभूमीवर येत्या काळात भव्य जाहीर सभा होणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या जाहीर सभेत खासदार श्री. ओमराजे निंबाळकर आणि आमदार श्री. भास्कर जाधव हे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रभागातील रखडलेली विकासकामे, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता आणि सुरक्षिततेसंदर्भातील प्रश्न या जाहीर सभेत ठळकपणे मांडले जाणार आहेत. ठाकरे गटाच्या माध्यमातून प्रभागाच्या सर्वांगीण विकासाचा ठोस आराखडा नागरिकांसमोर ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. याच सभेत उमेदवार श्री. चेतन महादेव पवार आणि श्री. सागर विजय ओव्हहाळ हे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत काळेवाडी परिसरात भाजपचा झंझावात वेग घेत असून, विनोद नढे यांचा ‘भाजप फॅक्टर’ सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. घरोघरी संपर्क, जनतेशी थेट संवाद आणि विकासाभिमुख राजकारण यामुळे नढे यांची प्रचारयंत्रणा प्रतिस्पर्ध्यांवर स्पष्ट आघाडी घेताना दिसत आहे. काळेवाडीतील नागरिकांमध्ये “काम करणारा नेता” अशी नढेंची ओळख पक्की होत चालली आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिलांचे सक्षमीकरण, युवकांसाठी संधी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा या मुद्द्यांवर नढे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. याच कामांचा लेखाजोखा घेऊन ते मतदारांपुढे जात असल्याने प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. भाजपच्या संघटनात्मक ताकदीसोबतच नढेंची वैयक्तिक पकड आणि स्थानिक प्रश्नांची अचूक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काळेवाडी परिसरात भाजपने आक्रमक प्रचाराला सुरुवात करत ‘काळेवाडीत शिवस्मारक होणारच’ असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. भाजपचे उमेदवार विनोद नढे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या गाठीभेटी व प्रचार दौऱ्यामुळे परिसरातील राजकीय वातावरण तापले असून, हिंदुत्ववादी विचारांची ताकद एकवटताना दिसत आहे. आज झालेल्या गाठीभेटी व प्रचारादरम्यान प्रभागातील सर्व शिवभक्त, हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक कार्यकर्ते एकत्र आले. विनोद नढे यांच्यासह भाजपचे सर्व उमेदवार नागरिकांच्या थेट भेटीसाठी मैदानात उतरले. घरोघरी जाऊन संवाद साधताना शिवस्मारकाचा मुद्दा, परिसराचा विकास, मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रश्न यावर भर देण्यात आला. सायंकाळी झालेल्या प्रचारफेरीला अजिंक्य मित्र मंडळ परिवाराने भव्य दिव्य…
आमदार शंकर जगताप यांनी उपस्थित केला पूररेषेचा मुद्दा: मुख्यमंत्र्यांकडून मोठी घोषणा निळ्या आणि लाल पूररेषेचा प्रश्न कायमचा निकालात काढणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड सहित संपूर्ण महाराष्ट्रमध्ये फेर सर्वेक्षण करून निळी आणि लाल पूररेषा नव्याने आखणी करण्यात येणार आहे. “फ्लड मेटिगेशन मेजर्स”नुसार कोल्हापूरच्या धर्तीवर नवा डीसीपीआर केला जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकुर्डी येथील सभेत शनिवारी सांगितले. पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टी आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या अधिकृत उमेदवारांसाठी आकुर्डी विठ्ठल मंदिर येथे शनिवारी (दि १०) मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या उपस्थितीत सभा पार पडली . निवडणूक प्रचार प्रमुख शंकर जगताप, आमदार…
वाकड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २५ मधील वाकड, ताथवडे, पुनावळे परिसरात राहणाऱ्या आणि हिंजवडीसह परिसरात आयटीमध्ये काम करणाऱ्या नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेतील प्रभाग क्रमांक २५ मधील भाजप उमेदवारांना पूर्ण पाठिंबा देत सलग दुसऱ्यांदा महापालिकेत भाजपाला संधी देणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. वाकड, ताथवडे आणि पुनावळे भागातल्या विविध सोसायट्यामध्ये प्रभाग २५ मधील भाजप पॅनलचा झंझावती प्रचार सध्या सुरू आहे. प्रभाग क्रमांक २५ मधील उमेदवार राहुल तानाजी कलाटे, कुणाल वाव्हळकर, श्रुती राम वाकडकर आणि रेश्मा चेतन भुजबळ यावेळी उपस्थित होते. केवळ आश्वासने देणारे नेते नकोत, तर नेहमी आमच्या संपर्कात असणारे , आमचे प्रश्न ऐकून घेऊन त्यावर पर्याय देणारे नेतृत्व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर रहाटणी प्रभाग क्रमांक २८ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत महिला उमेदवार सौ. अनिता संदीप काटे यांनी आपला प्रचार पूर्णतः विकासकेंद्रित ठेवत मतदारांशी थेट संवाद साधण्यावर भर दिला आहे. चॅलेंजर पब्लिक स्कूलच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या अनिता काटे यांनी शिक्षणाला विकासाची किल्ली मानत प्रभागाच्या सर्वांगीण परिवर्तनाचा निर्धार व्यक्त केला आहे. प्रचारादरम्यान प्रभागातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या नागरी समस्या, मूलभूत सुविधांचा अभाव, असुरक्षिततेची भावना आणि नियोजनाअभावी रखडलेला विकास हे मुद्दे ठळकपणे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देणारे निर्णय, सुरक्षित व सुव्यवस्थित परिसर आणि नियोजनबद्ध विकास हेच आपल्या प्रचाराचे केंद्र असल्याचे अनिताताई…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मागील सार्वत्रिक निवडणुकीत पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना बहुमताने निवडून दिले. भाजपचे तत्कालीन शहर अध्यक्ष आमदार स्वर्गीय लक्ष्मणभाऊ जगताप आणि नंतरचे शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड मध्ये आणि विशेष करून भोसरी गावठाण परिसरात भव्य दिव्य प्रकल्प उभारण्यात आले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा जगातील सर्वात मोठा भव्य पुतळा तसेच सर्व्हे नंबर १ मधील आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती व कबड्डी प्रशिक्षण केंद्र, प्रगतीपथावर असणारे भव्य स्टेडियम, सार्वजनिक मंडई, नागरिकांना अहोरात्र वैद्यकीय सेवा सुविधा देणारे अत्याधुनिक १०० बेडचे नूतन भोसरी रुग्णालय, बैलगाडा शर्यत शिल्प, योगासन समूह शिल्प, संपूर्ण भोसरी गावठाण…
