- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
निसर्गासाठी झटणारा माणूस, विकासासाठी लढणारा उमेदवार – शंतनू विलास नांदगुडे पिंपळे निलख, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– प्रभाग क्रमांक 26 मधील पिंपळे निलख, वाकड आणि कस्पटे वस्ती परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शंतनू विलास नांदगुडे निवडणूक लढवत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार करण्याचा त्यांचा संकल्प आहे. शंतनू विलास नांदगुडे हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नाहीत, तर ते एक निसर्गप्रेमी म्हणूनही परिसरात ओळखले जातात. प्रभाग क्रमांक 26 मध्ये त्यांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संगोपन करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पुढाकार घेतला आहे. रोपे लावणे एवढ्यावरच न थांबता त्यांचे संवर्धन, पाणीपुरवठा आणि संरक्षण यासाठीही त्यांनी स्वतः लक्ष घातले…
“प्रभाग क्र. १७ मध्ये भाजपच्या दबावाच्या राजकारणाला थारा नाही” — शशिकांत शिंदेंचा हल्लाबोल चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) च्या वतीने भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. भोईरनगर येथील जयवंत प्राथमिक शाळेच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आक्रमक शैलीत भाजपवर जोरदार टीका केली. या सभेस प्रभाग क्रमांक १७ मधील अधिकृत उमेदवार — मनिषा आरसूळ (अ गट), भाऊसाहेब भोईर (ब गट), शोभाताई वाल्हेकर (क गट) आणि शेखर चिंचवडे (ड गट) उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने जमलेल्या नागरिकांनी घोषणांनी परिसर दणाणून…
भाजपाचा विकास सापडत नाही – आमदार भास्कर जाधव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भाजपा प्रत्येक निवडणुकीत विकासाचा दावा करते, भ्रष्टाचाराच्या आड लपलेला त्यांचा विकास पिंपरी चिंचवड मधील नागरिकांना अध्यापही सापडत नाही. त्यांच्या भ्रष्टाचाराची कबुली त्यांच्याबरोबर सत्तेमध्ये सहभागी असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार जाहीरपणे देतात. आता ताथवडे, पुनावळे, वाकड प्रभाग क्रमांक २५ मधील सुजाण नागरिकांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार चेतन महादेव पवार आणि सागर विजय ओव्हाळ यांना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवण्याचा निश्चय केला आहे असे आमदार भास्कर जाधव यांनी सांगितले. रविवारी (दि.११ ) ताथवडे येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रभाग क्रमांक २५ चे अधिकृत उमेदवार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ११ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार नारायण बहिरवाडे यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत प्रचाराला वेग दिला आहे. प्रभागातील पूर्णानगर येथील विविध सोसायट्यांमध्ये त्यांनी भेटीगाठी घेत नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. या भेटीदरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, स्ट्रीट लाईट, सुरक्षितता आदी प्रश्न मांडले. बहिरवाडे यांनी प्रत्येक मुद्दा गांभीर्याने ऐकून घेत विकासाबाबत सविस्तर चर्चा करत ठोस उपाययोजनांची ग्वाही दिली. सारिका पवार यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रभाग ११ नारायण बहिरवाडे यांच्या पॅनलच्या प्रचारार्थ सभेची रणधुमाळी घरा घरात पोहोचत आहे. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हेच…
प्रभाग १७ मध्ये राष्ट्रवादीचा सूर बुलंद! भाऊसाहेब भोईर यांच्या प्रचाराने ‘घड्याळा’ची टिक-टिक घराघरात
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक १७ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार भाऊसाहेब भोईर यांनी प्रचारात स्पष्ट आघाडी घेतल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. घराघरात सुरू असलेली ‘घड्याळा’ची टिक-टिक ही केवळ प्रचाराची भाषा न राहता, मतदारांच्या मनात निर्माण झालेल्या विश्वासाचे प्रतीक ठरत आहे. भाऊसाहेब भोईर यांनी सुरुवातीपासूनच नियोजनबद्ध, लोकाभिमुख आणि मुद्देसूद प्रचारावर भर दिला आहे. प्रभागातील पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिलांचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा तसेच युवकांसाठी रोजगार व क्रीडा संधी या विषयांवर त्यांनी थेट संवाद साधत नागरिकांची मने जिंकली आहेत. “काम बोलते” या भूमिकेतून केलेल्या प्रचारामुळे मतदारांमध्ये सकारात्मक प्रतिसाद उमटत आहे. प्रचारादरम्यान सोसायट्या,…
पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथे विकसित करण्यात आलेले बाळासाहेब कुंजीर आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल आता केवळ एक मैदान न राहता भावी खेळाडू घडविणारे प्रभावी केंद्र म्हणून ओळख निर्माण करत आहे. सुमारे एक लाख चौरस फूट क्षेत्रफळात उभे राहिलेले हे क्रीडा संकुल ठोस राजकीय इच्छाशक्तीचे जिवंत उदाहरण ठरत असून, विकास म्हणजे फक्त इमारती उभारणे नव्हे तर येणाऱ्या पिढीचे भविष्य घडवणे हा विचार येथे प्रत्यक्षात उतरलेला दिसतो. या क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय दर्जाचे फुटबॉल मैदान, चालणे-धावण्यासाठी सुसज्ज ट्रॅक, बास्केटबॉल कोर्ट तसेच आधुनिक क्रिकेट पिच उभारण्यात आले आहे. या सर्व सुविधांमागे केवळ खेळाला चालना देण्याचा उद्देश नसून, निरोगी, सक्षम आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २० मध्ये निवडणूक रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच राजेश वाबळे यांच्या पॅनलने केलेल्या आक्रमक आणि शिस्तबद्ध प्रचाराने विरोधकांच्या गोटात प्रचंड धडकी भरली आहे. राजेश वाबळे यांच्या पॅनलमध्ये विनोद वाघमारे, वैशाली राजेश वाबळे, स्वीटी मलतपुरे यांचा घराघरांत पोहोचणारा संपर्क, गल्लीबोळातून होणाऱ्या प्रचारफेऱ्या, नागरिकांशी थेट संवाद आणि विकासकामांचा ठोस लेखाजोखा यामुळे वाबळे पॅनलचा प्रचार सध्या केंद्रस्थानी आला आहे. राजेश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली पॅनलमधील सर्व उमेदवार एकसंधपणे मैदानात उतरले असून ‘काम बोलते, आश्वासने नाही’ या भूमिकेवर प्रचार सुरू आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षा आणि युवकांसाठी संधी या मुद्द्यांवर मतदारांशी थेट संवाद साधण्यात येत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून काळेवाडी परिसरातील महिलांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून थेट महिलांच्या खात्यावर आर्थिक मदत जमा करण्यात आली आहे. भाजपचे अधिकृत उमेदवार विनोद नढे यांच्या पुढाकारातून ही योजना प्रत्यक्षात उतरली असून, त्यांच्या अधिपत्याखाली सौ. प्रियंका नढे यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतला आहे. काळेवाडी परिसरातील सुमारे १२ हजार महिलांना थेट आर्थिक मदत देण्यात आली असून, ही मदत भाजपच्या महिला-केंद्रित धोरणाचा भाग असल्याचे सांगण्यात आले. महिलांना केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष लाभ देण्यावर भर देण्यात आला आहे. “महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होते आणि कुटुंब सक्षम झाले तर समाज सक्षम होतो,” या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक २२ मध्ये भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार विनोद नढे यांच्या प्रचाराला आता नवे बळ मिळाले असून त्यांच्या अर्धांगिनी प्रियांका नढे यांनी थेट प्रचार मैदानात उतरत आघाडी घेतली आहे. महिलांशी थेट संवाद, घराघरात भेटी, समस्या जाणून घेणे आणि भाजपच्या विकासकामांचा लेखाजोखा मांडणे, या माध्यमातून त्यांनी प्रचाराला वेग दिला आहे. प्रियांका नढे यांच्या सक्रिय सहभागामुळे प्रभागातील महिला मतदारांमध्ये मोठी उत्सुकता आणि सकारात्मक प्रतिसाद दिसून येत आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, महिला सुरक्षा, शिक्षण तसेच स्वावलंबनाचे प्रश्न या मुद्द्यांवर त्या थेट संवाद साधत असून, “महिलांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व भाजपकडे आहे,” असा विश्वास त्या नागरिकांमध्ये…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- प्रभाग क्रमांक २१ (पिंपरी गाव, वैभव नगर, मिलिंद नगर, जिजामाता हॉस्पिटल, अशोक थिएटर) मधील भारतीय जनता पार्टी आरपीआय आठवले पक्षाच्या उमेदवारांना नागरिकांचा पाठिंबा वाढत असून, उमेदवार देखील केवळ विकासाच्या मुद्द्यांवर नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. भाजपाचे उमेदवार उषाताई वाघेरे मोनिकाताई निकाळजे गणेश ढाकणे नरेश पंजाबी यांनी आज वैभव नगर परिसरातील संवाद साधला. निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून प्रभाग क्रमांक २१ मधील परिसरात भाजपच्या उमेदवारांचा प्रचार जोरात सुरू आहे. पदयात्रा, घराघरात भेटी, नागरिक संवाद, सभा आणि बैठकींच्या माध्यमातून भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते थेट जनतेपर्यंत पोहोचत आहेत. केंद्र व राज्य सरकारच्या विविध विकासकामांची माहिती, भविष्यातील योजनांचा आराखडा…
