- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील देखभाल, दुरुस्ती व सुरक्षेचे काम करणाऱ्या शेकडो कामगारांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप भारतीय मजदूर संघाने केला आहे. आयआरबी व आर्यन पंप या कंपन्यांमार्फत कार्यरत असलेल्या कामगारांना सन २०२४–२५ ची कायदेशीर वेतनवाढ अद्याप मिळालेली नाही. तसेच अपुऱ्या सुरक्षासाधनांमुळे आणि तुटपुंज्या ओव्हरटाईममुळे कामगारांची आर्थिक व शारीरिक पिळवणूक होत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. या अन्यायकारक धोरणांविरोधात भारतीय मजदूर संघाने दिनांक २६ जानेवारी २०२६ पासून पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवरील संबंधित कार्यालयासमोर ‘रास्ता रोको’ आंदोलन व बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे, अशी माहिती संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटन सचिव बाळासाहेब भुजबळ यांनी दिली. कामगारांच्या प्रमुख…
निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खान्देश मराठा मंडळाच्या वतीने सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ या प्रजासत्ताक दिनी वार्षिक स्नेह मेळावा आणि भव्य पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी ५ वाजता निगडी प्राधिकरण येथील खान्देश मराठा मंडळ याठिकाणी पार पडणार असून, खान्देशच्या मातीतील विविध क्षेत्रांत कर्तृत्व गाजवणाऱ्या मान्यवरांचा यावेळी विशेष सन्मान केला जाणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ऑल इंडिया ट्रेनिंग अँड प्लेसमेंटचे अध्यक्ष डॉ. शितलकुमार रवंदळे उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे, खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे आणि आमदार उमा खापरे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना पिंपरी चिंचवड महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारत २६ जानेवारीच्या पूर्वसंध्येला आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून निघाली. तिरंगा रंगसंगतीतील दिव्यांच्या सजावटीमुळे संपूर्ण इमारत लक्षवेधी आणि राष्ट्रभक्तीचा संदेश देणारी दिसून येत आहे. इमारतीच्या दर्शनी भागावर तसेच सभोवतालच्या परिसरात हिरवा, पांढरा आणि केशरी रंगातील एलईडी दिव्यांची भव्य मांडणी करण्यात आली आहे, ज्यामुळे परिसर अधिकच तेजस्वी व प्रेरणादायी झाला आहे. या रोषणाईमुळे नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून अनेक नागरिक इमारतीसमोर थांबून छायाचित्रे काढत आहेत. महानगरपालिकेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने शहरात विविध ठिकाणी देशभक्तीपर कार्यक्रम, ध्वजारोहण आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी शुक्रवार, दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील यशवंतराव चव्हाण सभागृहात विशेष सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेत स्थायी समितीसह विविध ५ विशेष समित्यांच्या सदस्यांची देखील नियुक्ती केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे महापौर पद सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. या पदासह उपमहापौर पदाची निवड विशेष सभेत केली जाणार आहे. याबाबत पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या स्वाक्षरीने आदेश जारी करण्यात आले आहेत. या सभेचे पिठासीन अधिकारी म्हणून विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून…
*बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ चा शानदार समारोप* ल्यूक मुडग्वेच्या नेतृत्वाखाली ‘ली निंग स्टार’ संघ विजयी पुण्यातील टप्प्यात ल्यूक विजेता; चौथ्या व अंतिम टप्प्यात ॲलिक्सेईची बाजी पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘पुणे प्राइड लूप’ मध्ये उसळलेली गर्दी आणि उत्साहाच्या वातावरणात शुक्रवारी ‘बजाज पुणे ग्रँड टूर २०२६’चा शानदार समारोप झाला. यात पुण्यातील टप्प्यात ली निंग स्टार संघाच्या ल्यूक मुडग्वेने बाजी मारली, तर सांघिक विजेतेपद ली निंग स्टार संघाने पटकावले. चौथ्या आणि अखेरच्या टप्प्यात श्नायर्को अॅलिक्सेईने (१ तास ५६ मिनिटे ५४ से.) अव्वल क्रमांक पटकावला. या पाच दिवसाच्या स्पर्धेने जगात भारताचे पर्यायाने पुण्याचे नाव उंचावले आहे. चौथ्या टप्प्यात सायकलस्वारांनी शहराच्या मध्यभागातून ९५…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सायकल स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाने पुण्याचे नाव जगात पोहोचले. प्रशासनाने गेले सहा महिने या स्पर्धेसाठी खूप मेहनत व तयारी केली, अशा शब्दात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पर्धेच्या समारोपप्रसंगी प्रशासनाचे कौतुक केले. ‘बजाज पुणे ग्रँड टूर- २०२६’ च्या अंतिम टप्प्यासह स्पर्धेच्या यशस्वी समारोप आज बालगंधर्व रंगमंदीर समोर झाला. त्यानंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभाला केंद्रीय युवक कार्य व क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे, खासदार मेधा कुलकर्णी, युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनलच्या (युसीआय) महासंचालक अमीना लानाया, युसीआयचे उपाध्याक्ष व आशियाई सायकलिंग महासंघाचे (एसीसी) अध्यक्ष दातो अमरजीत सिंग गिल,…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा नवा महापौर ६ फेब्रुवारी रोजी अधिकृतपणे खुर्चीवर विराजमान होणार असून, त्या दिवशी महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा पार पडणार आहे. विभागीय आयुक्तांच्या आदेशामुळे प्रशासकीय प्रक्रियेला गती मिळाली असली तरी, राजकीय पातळीवर मात्र महापौरपदाच्या शर्यतीला वेग आला आहे. महापौरपदाचा बहुमान नेमका कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. विभागीय आयुक्तांनी महापौर निवड प्रक्रियेबाबत शुक्रवारी (दि. २३)आदेश जारी केले. त्यानुसार मंगळवारी (दि. २७) महापौर निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असून, त्यामध्ये निवड प्रक्रियेचे वेळापत्रक, उमेदवारी अर्ज दाखल करणे, मतदान आणि निकाल याबाबत सविस्तर माहिती दिली जाणार आहे, अशी माहिती नगरसचिव मुकेश कोळप यांनी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदूहृदयसम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी प्रमुख उपस्थिती शिवसेना जिल्हाप्रमुख गौतम चाबुकस्वार, उप जिल्हाप्रमुख रोमी संधू, नगरसेवक अनंत कोऱ्हाळे नगरसेवक शितल शिंदे विधानसभा प्रमुख हरेश नखाते,राजू नखाते, सुनीता चव्हाण, वैशाली कुलथे,सुजाता नखाते,तस्लिम शेख, पूनम रेठे, बाळासाहेब जम, खंडू शिरसाठ, भरत इंगळे, राजू निकम,हनुमंत पिसाळ प्रल्हाद कांबळे व शिवसैनिक सर्व शिवसेना आजी माजी पदाधिकारी उपस्थिती होते. कार्यक्रमाचे आयोजन संस्थापक अध्यक्ष मातोश्री सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष गणेश आहेर यांनी केले. यावेळी गोरख पाटील, रविकिरण घटकर, गणेश पाडूळे, राजाभाऊ कुदळे, बाळासाहेब जम, राजू निकम, नवनाथ जाधव, भरत इंगळे, अंकुश पवार, बाळासाहेब गायकवाड, मारुती म्हस्के,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘बजाज पुणे ग्रँड टूर – २०२६’ या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेचा अंतिम आणि निर्णायक टप्पा आज पिंपरी-चिंचवड शहरातून यशस्वीपणे पार पडला. या स्पर्धेदरम्यान शहरातील विविध प्रमुख मार्गांवर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या संख्येने उपस्थित राहून नागरिकांनी सायकलपटूंचे टाळ्यांच्या गजरात व जल्लोषात स्वागत केले तसेच त्यांना प्रोत्साहन दिले. यामुळे संपूर्ण शहरात क्रीडा उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते. स्पर्धेचा हा अंतिम टप्पा श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे-बालेवाडी येथून दुपारी १.३० वाजता सुरू होऊन पुणे शहरातील जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व रंगमंदिर येथे दुपारी ४ वाजता संपन्न झाला. एकूण ९९.१५ किलोमीटर अंतराच्या या टप्प्यात पिंपरी-चिंचवड शहरातील राजीव गांधी ब्रिज (औंध),…
पिंपरी चिंचवड ॲड असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. बी. के. कांबळे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड ॲड असोसिएशन यांचा पदग्रहण व सत्कार समारंभाचा कार्यक्रम पिंपरी न्यायालय येथील पुरुष वकिल बार रूम मध्ये संपन्न झाला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी महिला अध्यक्षा ॲड.प्रमिला गाडे व प्रमुख उपस्थिती माजी अध्यक्ष ॲड नारायण रसाळ उपस्थित होते. सदर कार्यक्रमाला पिंपरी चिंचवड ॲड असोसिएशनचे मा. अध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे, वकील विकास संघाचे अध्यक्ष ॲड अरुण (मामा) खरात उपस्थित होते. माजी अध्यक्ष ॲड पांडुरंग शिनगारे व माजी अध्यक्ष नारायण रसाळ यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार करून पदभारतीला पुढील वाटचालीसाठी नवनिर्वाचित कमिटीला शुभेच्छा दिल्या. त्यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट असोसिएशन…
