- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ८ व्या राष्ट्रीय मास्टर्स गेम्सचे मंगळवारी २७ जानेवारी दुपारी ४ वाजता, हेडगेवार क्रीडा संकुल, मासुळकर कॉलनी, पिंपरी, पुणे १८ येथे पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स संघटनेचे अध्यक्ष अभय छाजेड आणि या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वात ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून होणार आहे अशी माहिती सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन मुख्य कार्यकारी अधिकारी विनोद कुमार यांनी प्रसिद्धीस दिली आहे. या स्पर्धेचे बोधचिन्ह “शुभंकर – शेकरू” आहे. https://www.mastersgames.in या वेबसाईटवर आणि अधिक माहितीसाठी https://clouckofficial.github.io/mastersgames/ येथे संपर्क साधावा असे आवाहन सुपर मास्टर्स गेम्स ॲन्ड स्पोर्ट्स फेडरेशन महाराष्ट्र अध्यक्ष रामसिंग संघा आणि महाराष्ट्र सरचिटणीस शैलेश फुलसुंगे यांनी दिली आहे. …
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बालगंधर्व रंगमंदिर कलादालन पुणे येथे नुकतेच कॅनव्हास ग्रुप तर्फे भव्य चित्रकला प्रदर्शन भरविले होते दिनांक 15 जानेवारी 2026 ते 17 जानेवारी 2026 या कालावधीत हे प्रदर्शन झाले . सदरील चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार श्री अनिल सोनवणे यांच्या हस्ते झाले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध सिने अभिनेते श्री अमोल भोसले उपस्थित होते तसेच अॅड.प्रकाश सोळंकी ,चित्रकार व कलाशिक्षक आनंद गजरमल हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या वेळी श्री अनिल सोनवणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की, आताच्या धावत्या युगातही चित्रकारांनी आपली चित्रकला जपावी हेच कौतुकाचे आणि कलाकाराला अभिमान वाटावा अशी गोष्ट आहे एकत्र…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘प्रजासत्ताक दिन हा आपला राष्ट्रीय सण आहे. यानिमित्त प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना निर्माण झाली पाहिजे!’ असे आवाहन विख्यात स्त्रीरोगतज्ज्ञ डाॅ. रोहिदास आल्हाट यांनी चिंचवड येथे व्यक्त केले. क्रांतितीर्थ, क्रांतिवीर चापेकर वाडा, चिंचवडगाव येथे क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती आयोजित प्रजासत्ताक दिनानिमित्त सोहळ्यात डाॅ. रोहिदास आल्हाट बोलत होते क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती कार्यवाह ॲड. सतिश गोरडे, समिती कोषाध्यक्ष रवींद्र नामदे, समितीचे विश्वस्त मधुसूदन जाधव, नवनिर्वाचित नगरसेविका अपर्णा डोके, मनीषा चिंचवडे, नगरसेवक सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, डाॅ. माधुरी आल्हाट,क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती उपाध्यक्ष डाॅ. शकुंतला बन्सल, समिती सदस्य नितीन बारणे, सुहास पोफळे, हेमराज चौधरी, सेवानिवृत्त मुख्याध्यापिका…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६ रोजी इंडियन म्युझिकल क्लब प्रस्तुत ‘ये दिल हैं हिंदुस्तानी’ या निगडी प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर (छोट्या) नाट्यगृहातील देशभक्तिपर गीतांच्या नि:शुल्क सांगीतिक मैफलीत श्रोते मंत्रमुग्ध झाले. राखी झोपे यांच्या संकल्पनेतून आणि अनिल झोपे यांच्या संयोजनातून ‘गाता रहे मेरा दिल’ या उपक्रमांतर्गत सादर करण्यात आलेल्या या ४५व्या विशेष सांगीतिक मैफलीत देशभक्तीचा परिपोष करण्यात आला. त्यासाठी मनगटावर खास तिरंगी रिस्टबँड परिधान केलेल्या राजकुमार सुंठवाल, प्रमोद शर्मा, गणेश ओहाळ, सागर पाटील, शहाजी कांबळे, मंगेश उंबराणी, अमित पांचाळ, नीलेश मोरे, दत्तात्रय कुंभार, कविता शाह, माधवी पोतदार, रूपाली मिरासदार, प्रशांत कुलकर्णी, दीपा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ७७ वा भारतीय प्रजासत्ताक दिन आणि वंदेमातरम् या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून स्वरोपासना ग्लोबल म्युझिक अकॅडमीच्या सुमारे शंभर विद्यार्थ्यांनी वाकड येथे संपूर्ण वंदेमातरम् गीताचे सामुदायिक गायन करून तिरंग्याप्रति आदर व्यक्त केला. स्वरोपासना म्युझिक अकॅडमीच्या वाकड शाखा क्रमांक एक, शाखा क्रमांक दोन आणि पुनावळे शाखा क्रमांक तीन येथील वय वर्ष तीन ते सत्तर या वयोगटातील विद्यार्थी यासाठी एकत्र जमले होते. बंकिमचंद्र चॅटर्जी यांच्या १८७० च्या दशकातील ‘आनंदमठ’ या कादंबरीतील वंदे मातरम् या गीताने असंख्य देशभक्तांना स्वातंत्र्यलढ्याची प्रेरणा दिली. त्यामुळे या गीताला २४ जानेवारी १९५० रोजी भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय गीताचा दर्जा बहाल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाच्या १५० दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांची कामगिरी भारतीय गुणवत्ता परिषद (QCI) यांच्यावतीने अंतिम मूल्यमापनात तपासली गेली. या मूल्यमापनात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कार्यालयांची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि. २६) प्रजासत्ताक दिनी केली. यामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) सर्वोत्तम शासकीय संस्था, मंडळे व कंपन्या या गटातून राज्यात तृतीय क्रमांक पटकावला आहे, तर पुणे विभागात प्रथम क्रमांक मिळवून मानाचा तुरा खोवला आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या नेतृत्वाखाली पीएमआरडीएने ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. कार्यालयाची अधिकृत वेबसाइट, ‘आपले सरकार’ प्रणाली, ई-ऑफीस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या ७७ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी, पिंपरी येथे शहराध्यक्ष योगेश बहल यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी योगेश बहल म्हणाले की, आज आपला भारत देश जागतिक स्तरावर एक महासत्ता म्हणून उदयाला येत आहे. तंत्रज्ञान असो, अंतराळ संशोधन असो किंवा आर्थिक क्षेत्र, भारताने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण हे वैभव टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपल्या तरुणांच्या खांद्यावर आहे. भ्रष्टाचारमुक्त भारत, प्रदूषणमुक्त पर्यावरण आणि सर्वांना समान संधी मिळणारा समाज घडवणे, हेच आपले आजचे खरे कर्तव्य आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी भारताचे संविधान वाचन करण्यात…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय प्रजासत्ताकाचा ७७ वा वर्धापन दिन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या आकुर्डी येथील मुख्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीताच्या ध्वनीत परिसर दुमदुमला. पोलिस दलाच्यावतीने राष्ट्रध्वजाला सन्मानपूर्वक सलामी देण्यात आली. या कार्यक्रमास अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला, पोलिस अधीक्षक तथा मुख्य दक्षता अधिकारी अमोल झेंडे, सहआयुक्त (प्रशासन) रूपाली आवले-डंबे, महानगर मुख्य अभियंता रिनाज पठाण, सहआयुक्त (जमीन व मालमत्ता) पूनम मेहता, सहआयुक्त (अनधिकृत बांधकाम निर्मूलन) दीप्ती सूर्यवंशी-पाटील, मुख्य अभियंता शिवकुमार बागडी, वित्तीय नियंत्रक सविता नलावडे, महानगर नियोजनकार स्मिता कलकुटकी यांच्यासह पीएमआरडीएचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व आशा किरण सोशल फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने १२ वा जागतिक सूर्यनमस्कार महोत्सव मोरया गोसावी क्रीडांगण, केशवनगर, चिंचवडगाव येथे मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. या महोत्सवात शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी एकत्र येत सूर्यनमस्कार सादर करून योग व उत्तम आरोग्याचा संदेश दिला. या महोत्सवाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्याबरोबरच प्राचीन भारतीय योगपरंपरेचा जागर करण्यात आला. पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी महापौर अर्पणा डोके, नगरसदस्य सुरेश भोईर, अनंत कोऱ्हाळे, उप आयुक्त पंकज पाटील,ममता शिंदे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारताच्या प्रजासत्ताक दिनाचा ७६ वा वर्धापन दिन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त खोराटे यांनी उपस्थितांना तसेच शहरवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त आयुक्त खोराटे म्हणाले, ‘भारतीय संविधानाच्या अंमलबजावणीस ७७ वर्षे पूर्ण होत आहेत. हा दिवस आपल्या लोकशाही परंपरेचा, संविधानिक मूल्यांचा आणि राष्ट्रनिर्मितीच्या सातत्यपूर्ण प्रवासाचे प्रतीक आहे. या ऐतिहासिक आणि गौरवपूर्ण प्रसंगी, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मी सर्व शहरवासियांना भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा देतो.’ ‘शहराच्या सर्वांगीण…
