- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आधार ज्येष्ठ नागरिक संघाचा तृतीय वर्धापनदिन ठाकरे मैदान, यमुनानगर, निगडी येथे अतिशय उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवक उत्तम केंदळे, बापू घोलप, नगरसेविका सुलभा उबाळे, अर्चना कारंडे तसेच आधार ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष नारायण पाटील, उपाध्यक्ष भानुदास कदम, सचिव कचरू जगदाळे, सहसचिव माणिकराव माने, खजिनदार श्रीकृष्ण पुरोहित, सहखजिनदार बाळकृष्ण ठोंबरे यांची प्रमुख उपस्थिती होती. वर्धापनदिनानिमित्त ‘जाने कहाँ गये वो दिन!’ हा जुन्या परंतु अविस्मरणीय असलेल्या हिंदी – मराठी गाण्यांचा सुरेल कार्यक्रम सादर करण्यात आला. सुनील राणे यांनी या सांगीतिक कार्यक्रमाचे बहारदार निवेदन करीत उपस्थितांना खिळवून ठेवले होते. कार्यक्रमादरम्यान जानेवारी महिन्यात वाढदिवस असलेल्या संघातील सभासदांचे मान्यवरांकडून…
रहाटणी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिज्योती महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचलित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडियम स्कूल, रहाटणी, येथे ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी नगरसेविका निर्मला कुटे व मा. वाडिया कॉलेज प्राचार्य वसंत चाबुकस्वार संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार,माजी पोलीस निरीक्षक सुरेश भालेराव, युवा नेते विशाल भालेराव, स्वप्नील भालेराव युवराज प्रगाणे सामाजिक कार्यकर्ते ,धोंडीराम मुंडे, हर्षवर्धन कांबळे शाळेतील पालक उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत,शिक्षक यांची उपस्थिती लाभली. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व सूत्रसंचालनाने झाली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध परेड सादर केली. राष्ट्रीय नेत्यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले व संविधानाचे वाचन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीताने संपूर्ण परिसर देशभक्तीने भारावून गेला. इयत्ता ८ वीच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर रिमिक्स गीतावर नृत्य सादर करून उपस्थितांची मने…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी–चिंचवड महापालिकेच्या आगामी महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीत राजकीय हालचालींना वेग आला असून, पिंपरी शहरातून युवकांचा एक ठाम सूर पुढे येत आहे. पिंपरी–चिंचवडमधील युवकांना यंदा तुषारभाऊ हिंगे हेच महापौर हवेत, अशी मागणी भाजपयुमो शहर उपाध्यक्ष अनिकेत ज्ञानेश्वर शेलार यांनी केली आहे. भारतीय जनता पार्टी जेव्हा जेव्हा अडचणीत सापडली, किंवा पक्षासाठी कठीण निर्णय घेण्याची वेळ आली, त्या प्रत्येक टप्प्यावर तुषारभाऊ हिंगे यांनी स्वतःचा त्याग करत पक्षहिताला प्राधान्य दिले आहे. उपमहापौरपद असो वा भारतीय जनता युवा मोर्चाच्या शहराध्यक्ष पदाची जबाबदारी, तुषारभाऊ हिंगे यांनी नेहमीच पदांपेक्षा पक्षाची एकजूट, संघटन आणि शिस्त महत्त्वाची मानली आहे. उपमहापौर पदाचा…
चिंचवड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत रस्टन ग्रीव्हज औद्योगिक कामगार सहकारी वसाहत मर्यादित यांच्या पुढाकारातुन तसेच रमामंगल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष सौंदणकर आणि डॉ. लाल पॅथलॅब यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत अल्पदरात आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर सोमवार, दि. २६ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७ ते दुपारी १ या वेळेत रस्टन कॉलनी सोसायटी ऑफिस, चिंचवड येथे यशस्वीरीत्या पार पडले. यावेळी रस्टन ग्रिव्हज औद्योगिक कामगार सहकारी वसाहतीचे अध्यक्ष दादा पवार, सचिव विलास कंक, खजिनदार अनिल कदम, कैलास काकडे, अशोक नवले, राजाराम भोसले, रंगराव पाटील, अजय कुंभार, सविता कुरळे, रमा मंगल फाउंडेशनचे संस्थापक…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मध्ये ७७ वा प्रजासत्ताक दिन बँड पथकासमवेत प्रतिभा इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सैनिकी वेशभूषा परिधान करून बँड पथकासमवेत पथसंचलन करून प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देत उपस्थिताची मने जिंकली. प्रमुख पाहुणे जगविख्यात ख्याती असलेले कला ग्रुप पुणेचे संस्थापक मनोजकुमार फुटाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांच्या सत्कार संस्थेचे सचिव डॉ. दीपक शहा यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावरती त्याच्यासमवेत संस्थेच्या खजिनदार डॉ भूपाली शहा , मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ राजेंद्र कांकरिया, एमबीए विभागाचे संचालक डॉ सचिन बोरगावे, प्राचार्या डॉ क्षितिजा गांधी, डॉ वनिता कुऱ्हाडे, डॉ पौर्णिमा कदम, डॉ वृंदा जोशी, उपप्राचार्या…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने सैनिकांचा सन्मान सोहळा चिंचवड येथील हॉलमध्ये उत्साहात पार पडला. भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून तिरंगा ध्वजास सलामी देण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताचे गायन झाले. फाउंडेशनच्या सहसचिव मंगला डोळे–सपकाळे व महिला समन्वयक अपर्णा कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत सामूहिकरित्या सादर करण्यात आले. या सोहळ्यात फाउंडेशनच्या वतीने सैनिकांचा यथोचित सत्कार करून त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले की, सैनिक हा देशाचा अभिमान असून तो कायम राहील. माजी सैनिक निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यातून देशसेवा करत असतात. त्यांच्या कर्तृत्व, शिस्त आणि…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संत तुकारामनगर येथील महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने देशभक्ती गीतावर नृत्य करून घोषणा देऊन ,लहान मुलांना खाऊ वाटप करुन प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक शिवाजीराव शिर्के म्हणाले की मी पहिला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याचा साक्षीदार आहे. ते पुढे म्हणाले की पिंपरी चिंचवड औद्योगिक शहरात कामगार मंडळाने कामगार कवी संमेलन आपल्या शहरात घेतले पाहिजे ,कामगारांना बसमध्ये सवलत देऊन गुणवंत कामगारांसाठी लाडक्या बहिणी प्रमाणे लाडका गुणवंत कामगार म्हणून शासनाने पेन्शन दिली पाहिजे असे मत व्यक्त केले . आण्णा जोगदंड म्हणाले की सध्या तरुणाई मोबाईलच्या व्यसनाधीन झाली आहे, मोबाईल मुळे त्यांच्यामध्ये पाश्चात्त्य…
कुसगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे–मुंबई राष्ट्रीय महामार्गावर अपघातग्रस्तांना तात्काळ मदत करून अनेकांचे प्राण वाचवणाऱ्या ‘देवदूत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे आयर्न (आर्यन) पंप कंपनी प्रशासनाकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ कुसगाव येथे भारतीय मजदूर संघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. अत्यंत धोकादायक आणि जबाबदारीचे काम करूनही या कामगारांना योग्य वेतन, सामाजिक सुरक्षा, विमा संरक्षण, सुरक्षितता साधने, निश्चित कामाचे तास तसेच कायदेशीर हक्क मिळत नसल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या अन्यायकारक परिस्थितीविरोधात भारतीय मजदूर संघाने रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधले. या आंदोलनाचे नेतृत्व श्री. बाळासाहेब भुजबळ (संघटन सचिव, भारतीय मजदूर संघ, महाराष्ट्र प्रदेश), सचिन मेंगाळे (उपाध्यक्ष, भारतीय मजदूर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील 15 जानेवारी 2026 च्या नगरसेवक निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) 128 सदस्यीय महापालिकेत पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवले आहे, ज्यामुळे महापौर पदासाठी भाजपकडून दावेदारांची रस्सी भडकली आहे. महापौरपदाचे आरक्षण सर्वसाधारण (ओपन) प्रवर्गासाठी जाहीर करण्यात आले असून, भाजपमध्ये अनेक अनुभवसंपन्न नगरसेवक या शर्यतीमध्ये पुढे येत आहेत. याच पार्श्वभूमीवर, नगरसेवक सुरेश शिवाजी भोईर हे भाजपच्या महापौर शर्यतीतील प्रमुख दावेदारांपैकी एक म्हणून चर्चेत आहेत. प्रभाग क्रमांक १८ (चिंचवड गाव) चे लोकप्रिय नगरसेवक म्हणून परिचित सुरेश भोईर यांनी सलग दुसऱ्यांदा भाजपकडून नगरसेवकपद मिळवले आहे आणि त्यांची जनसमर्थनाची क्षमता महापौर पदासाठी पक्षात महत्त्वाची मानली जाते. पिंपरी-चिंचवडमध्ये महापौर निवडणूक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी आजच्या युवा पिढीचा सहभाग आवश्यक आहे. युवकांनी उत्कृष्टता, प्रामाणिकपणा आणि नवोन्मेष यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे. मला दावोस येथे झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली. या ठिकाणी भारत देशाविषयी आणि विशेषता महाराष्ट्रातील जागतिक दर्जाच्या पायाभूत सेवा सुविधांविषयी जागतिक दर्जाच्या गुंतवणूकदारांनी विश्वास व्यक्त केला आहे. तेथे झालेल्या विविध सामंजस्य करारामुळे आगामी काळात खूप मोठी आंतरराष्ट्रीय गुंतवणूक महाराष्ट्रात येईल आणि त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल. याचा लाभ घेण्यासाठी कुशल आणि नेतृत्व गुण संपन्न मनुष्यबळ घडवण्यासाठी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट नेहमी प्रयत्नशील आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्यातील नेतृत्व गुण विकसित करीत…
