Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १९९२ पासून दादांच्या सानिध्यात काम करण्याचा अनुभव असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड लघुउद्योजक संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दादांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. दादांच्या जाण्याने आम्ही घरचा माणूस गमावला असून संपूर्ण उद्योगजगत पोरके झाले आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. “आम्ही प्रश्न मांडायचो आणि उत्तर ते सोडवायचे—हे जणू ठरलेलेच गणित होते. कोणतीही अडचण असो, दादे थेट संबंधित अधिकाऱ्यांच्या बैठका लावून जागेवर प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असायचे,” असे बेलसरे म्हणाले. उद्योगधंद्यांना बळकटी देण्यासाठी दादांनी सातत्याने पुढाकार घेतला. लघुउद्योजकांचे प्रश्न, अडचणी आणि मागण्या शासनदरबारी प्रभावीपणे मांडून त्यांनी उद्योजकांना मोठा आधार दिला. कुदळवाडी येथील प्रश्नावर नुकतीच दादांसोबत भेट झाल्याचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी विमान दुर्घटनेत अपघाती निधन झाले. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे, शहर अभियंता मकरंद निकम,नगररचना उपसंचालक किशोर गोखले,मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रविण जैन, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, सह आयुक्त मनोज लोणकर, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, उप आयुक्त अण्णा बोदडे, संदीप खोत, राजेश आगळे, चेतना केरूरे,विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह महापालिका कर्मचारी उपस्थित…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राजकीय क्षेत्रातील व्यक्तिमत्त्व आमदार अमित गोरखे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भावनिक श्रद्धांजली अर्पण करणारा संदेश सोशल मीडियावर शेअर केला आहे. या संदेशामध्ये त्यांनी अजित पवार यांच्या सार्वजनिक जीवनातील योगदान, लोकाभिमुख नेतृत्व आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला आहे. अमित गोरखे यांनी आपल्या श्रद्धांजली संदेशात म्हटले आहे की, स्पष्टवक्तेपणा, ठाम निर्णयक्षमता आणि जनतेशी असलेले नाते यामुळे अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात वेगळे स्थान निर्माण केले. अर्थमंत्रीपदाच्या काळात राज्याच्या विकासासाठी, महिला सक्षमीकरण, शेतकरी कल्याण आणि युवकांसाठी राबवलेल्या योजनांचे योगदान अतुलनीय असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. ते खऱ्या अर्थाने विकासाचे दादा होते.. या भावनिक संदेशात…

Read More

अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर शोककळा – आमदार शंकर जगताप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आपली जन्मभूमी बारामती असली तरी माझी कर्मभूमी पिंपरी-चिंचवड आहे,” असे निक्षून सांगणारे आणि पिंपरी-चिंचवड शहरावर पुत्रवत प्रेम करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली झालेले अपघाती निधन मनाला चटका लावून जाणारे आहे,” अशी भावना आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे ते खरे ‘दादा’ होते असेही आमदार जगताप पुढे म्हणाले. आमदार शंकर जगताप पुढे म्हणाले, “अजित पवार हे केवळ ज्येष्ठ नेते नव्हते, तर चणाक्ष राजकारणी, अभ्यासू व्यक्तिमत्त्व आणि प्रशासकीय कारभाराचा दांडगा अनुभव असलेले कर्तबगार नेतृत्व होते. अशा व्यक्तिमत्त्वाचे आपल्या मधून जाणे हे केवळ…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जाण्याने राज्याने एक अनुभवी, निर्णयक्षम आणि प्रशासनावर मजबूत पकड असलेले नेतृत्व गमावले आहे, अशी भावना व्यक्त करत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. नखाते म्हणाले की, अजितदादा पवार यांना अनेक वेळा विविध कामे तसेच असंघटित कामगारांच्या ज्वलंत समस्यांवर भेटण्याचा योग आला. प्रत्येक वेळी दिलेले निवेदन ते अत्यंत लक्षपूर्वक वाचायचे. विषय कोणताही असो, त्यावर त्वरित मत स्पष्ट करणे आणि संबंधित मुद्द्यांचा सखोल अभ्यास करून निर्णय घेणे ही त्यांची खास कार्यशैली प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळाली. निवेदन दिल्यानंतर ते लगेचच सोबत असलेल्या स्वीय सहाय्यकांना संबंधित विभागाकडे कार्यवाहीसाठी पाठवण्याचे आदेश द्यायचे.…

Read More

मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानं कधीही भरून न येणारी महाराष्ट्राची हानी झाली आहे. आज त्यांचे विमान अपघातात निधन झाले. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. अजित पवार महाराष्ट्राचे लोकनेते होते. महाराष्ट्रातल्या प्रश्नांची जाण असलेला हा नेता होता. त्यांच्याबद्दल जनसामान्यांमध्ये प्रचंड आस्था होती. अतिशय संघर्षशील असं नेतृत्व होते. सर्व परिस्थितीत न डगमगता पुढे जाणारे व्यक्तिमत्व होते. महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत कठीण दिवस आहे अशी शोक भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. अजित पवारांच्या निधनावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अजित पवारांसारखे नेतृत्व तयार व्हायला अनेक वर्ष लागतात. ज्यावेळी महाराष्ट्राच्या विकासात ते महत्त्वपूर्ण योगदान देत होते,…

Read More

बारामती, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज सकाळी बारामती विमानतळाजवळ झालेल्या एका भीषण विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालं आहे. या अपघातात अजित पवार यांच्यासह एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. डीजीसीएने या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या आज बारामतीमध्ये सभा होणार होत्या. त्या सभांसाठी अजित पवार हे आज सकाळी मुंबईहून बारामती येथे निघाले होते. दरम्यान, त्यांचं विमान बारामती विमानतळावर उतरत असताना विमानाला अपघात होऊन ते जवळच्या शेतात कोसळलं.

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) घर खरेदीची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. पेठ क्र. १२ तसेच पेठ क्र. ३०-३२ येथील सदनिकांच्या लॉटरीसाठी ऑनलाइन अर्ज नोंदणीची मुदत वाढवण्यात आली असून, आता नागरिकांना २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत. पीएमआरडीएने पेठ क्र. १२ मधील ३४० तसेच पेठ क्र. ३०-३२ मधील ४९३ अशा एकूण ८३३ शिल्लक सदनिकांसाठी १४ डिसेंबर २०२५ रोजी जाहिरात प्रसिद्ध केली होती. या सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणीची मूळ अंतिम मुदत २७ जानेवारी २०२६ होती. मात्र, अधिकाधिक नागरिकांना या गृहनिर्माण योजनेचा लाभ घेता यावा आणि त्यांच्या घराचे स्वप्न साकार व्हावे,…

Read More

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या घटना समितीने सादर केलेल्या संविधानाची अंमलबजावणी २६ जानेवारी १९५० रोजी तत्कालीन केंद्र सरकारने लागू केली. या घटनेमुळे भारत देशाच्या सर्व नागरिकांना सन्मान मिळाला. माझ्या सारख्या दिव्यांग व्यक्तीला देखील उद्योग, व्यवसाय करून सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला. या जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या राज्यघटनेचा आपल्याला अभिमान वाटतो असे लघुउद्योजक व सामाजिक कार्यकर्ते राजू कडप्पा हिरवे यांनी सांगितले.      सोमवारी प्रजासत्ताकदिनी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल येथे ७७ व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्त हिरवे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.      यावेळी पिंपरी…

Read More

लोणी-काळभोर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे येथील मॅनेट इमारतीच्या प्रांगणात ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात विशिष्ट सेवा मेडल (VSM) प्राप्त लेफ्टनंट जनरल व माजी महासंचालक, ऑर्डनन्स सेवा (DGOS) आर. के. कुशवाह (निवृत्त) यांच्या हस्ते ध्वजरोहण सोहळ्याने झाली. यानंतर विद्यार्थ्यांनी नृत्य व देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करून उपस्थित सर्वांना मंत्रमुग्ध केले. यावेळी एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष तथा प्र.कुलपती प्रा.डाॅ.मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., प्रोवोस्ट डॉ. सायली गणकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मोहित दुबे, डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. नचिकेत ठाकूर, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ.…

Read More