- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
मनपा जागांवर मनपाच्या सीबीएससी किंवा स्टेट बोर्डच्या इंग्रजी शाळा सुरू करण्यात याव्यात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक व शैक्षणिक आरक्षणाच्या मौल्यवान जागा या खाजगी संस्थांना देण्याबाबत काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. याबाबत आज काँग्रेसचे शिष्ट मंडळ महापौर रवी लांडगे यांना भेटले त्यांनी पुनावळे परिसरातील शैक्षणिक आरक्षणाचा भूखंड मौजे पुनावळे गाव सर्वे नंबर 38, 44 पै. आरक्षण क्रमांक 4/57 ही जागा खाजगी संस्थेला देण्याचा सुरू असलेला प्रयत्न हा जनविरोधी असल्याचे सांगत या विषयाला रद्द करण्याबाबतची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत माहिती देताना काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे यांनी सांगितले, “पिंपरी चिंचवड शहर झपाट्याने वाढत असताना नागरिकांसाठी…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र प्रदेश व पिंपरी चिंचवड शहर युवक काँग्रेसच्या वतीने आज पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर मा. रवी लांडगे तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बागडे यांची भेट घेऊन महानगरपालिकेच्या शाळा आणि शैक्षणिक आरक्षण असलेल्या जमिनी खाजगी संस्थांच्या ताब्यात देण्याच्या निर्णयाला तीव्र विरोध नोंदविण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे ॲड. उमेश खंदारे यांच्या नेतृत्वाखाली दोघांना निवेदन सादर करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सहा शाळा “आकांक्षा फाउंडेशन” या खाजगी संस्थेकडे चालविण्यास देण्याची प्रक्रिया तसेच पुनावळे येथील सर्व्हे क्रमांक ३८ व ४४ मधील शाळेसाठी आरक्षित असलेली जमीन East Oxford International Foundation या खाजगी संस्थेला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय हा सार्वजनिक शिक्षण व्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना छेद देणारा…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एखादे मुल शाळेत जाण्याऐवजी आर्थिक परिस्थितीनुसार कामाला जावे लागते, तो खऱ्या अर्थाने त्याचा बालपणावर अन्याय तर होतच असतो पण त्याच्या मानवी हक्काचे उल्लंघन असून सामाजिक अन्याय आहे. बालमजुरी रोखण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करून त्यांना मुख्य शिक्षण प्रवाहात आणण्याची गरज असल्याचे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, कष्टकरी रिक्षा टॅक्सी चालक संघर्ष महासंघ, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आयोजित ‘बालमजुरी नको शिक्षण देऊ’ या आयोजित कार्यक्रमांमध्ये ते बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मंगेश पालके, सुनील भोसले,मनीषा चौधरी,गंगाबाई बिरादार, पूनम जैसवार, ज्योती साबळे, ज्योती शिंदे, वैशाली साळुंके, ताई कुसाळकर, निर्मला…
मनपाचे खासगीकरण थांबवा – चेतन पवार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण मंडळात असणारा भ्रष्टाचार आणि भोंगळ कारभाराबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने वेळोवेळी आयुक्तांकडे तक्रार केली आहे. यामध्ये पुनावळे येथील मनपा शाळेचे आरक्षण तुटपुंज्या रकमेवर खासगी संस्थेला देण्याचा घाट घातला जात आहे. त्या आरक्षित जागेवर मनपाने गोर गरीब मुलांसाठी शाळा सुरू करावी. या शाळेचे आरक्षण खासगी संस्थेला देणे म्हणजे मनपाचे खासगीकरण करण्याचा प्रकार आहे. हा ठराव आयुक्तांनी मंजूर करू नये आणि मनपाचे खासगीकरण थांबवावे नाही तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष चेतन पवार यांनी शुक्रवारी पिंपरी येथे आयोजित…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील २०२३ पूर्वी झालेल्या अनधिकृत बांधकामांना लावण्यात आलेला शास्तीकर राज्य सरकारने माफ केल्यानंतर आतापर्यंत ९६ काेटी १२ लाख रूपयांचे समायाेजन केले आहे. २०२६-२७ या वर्षात २२ हजार ९०६ मालमत्ता धारकांच्या रक्कमेचेही मालमत्ता करामध्ये समायाेजन करण्यास बुधवारी (दि.१०) स्थायी समितीने मान्यता दिली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील अनधिकृत बांधकामांना २०१२-१३ पासून शास्तीकर वसूल केला जात हाेता. ३ मार्च २०२३ रोजी राज्य शासनाने शहरातील अनधिकृत बांधकामांचा शास्तीकर माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ३ मार्च २०२३ पूर्वी झालेल्या २५ हजार ६७३ अनधिकृत बांधकामांना याचा लाभ मिळाला. या मालमत्ता धारकांनी शास्तीकराची २६० काेटी ५३ लाख रूपयांची रक्कम महापालिकेकडे जमा…
मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ज्येष्ठ पत्रकार संजय मराठे यांची मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉईंट येथे आयोजित मराठी पत्रकार संघाच्या महाअधिवेशन २०२६ दरम्यान संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. मंगळवार (दि. ९) रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत यशवंतराव चव्हाण सेंटर, नरीमन पॉइंट, मुंबई येथे अधिवेशन उत्साहात संपन्न झाले. या महाअधिवेशनाच्या अध्यक्षस्थानी राज्यपाल जिष्णू देव वर्मा होते. व्यासपीठावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रेरक वक्ते गौर गोपाल दास, सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक निलेश खरे,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पायाभूत सुविधा विकास, वाहतूककोंडी निर्मूलन आणि प्रशासनातील पारदर्शकता या तीन प्रमुख उद्दिष्टांवर आगामी काळात विशेष भर दिला जाणार असल्याची माहिती पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात बुधवार (दि. १०) आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी प्राधिकरणाच्या विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा आढावा घेतला. डॉ. चौधरी म्हणाले की, बहुप्रतिक्षित पुणे मेट्रोलाईन 3 अंतर्गत माण-हिंजवडी ते बाणेर (रामनगर) या मार्गावरील 12 स्थानकांचा पहिला टप्पा जूनअखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मार्गाची तांत्रिक आणि सुरक्षा तपासणी 15 ते 20 जूनदरम्यान आयुक्त रेल्वे सुरक्षा (सीएमआरएस) यांच्याकडून केली जाणार आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर ही सेवा 15 जुलैपर्यंत प्रवाशांसाठी खुली…
ऐतिहासिक, धार्मिक आणि विज्ञानाचा अनुभव; पर्यटनाला मिळणार नवी चालना पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशांतर्गत पर्यटनाला चालना देण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनातून प्रेरणा घेत आणि स्थानिक पर्यटनाला वाव देण्याच्या उद्देशाने आमदार शंकर जगताप यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपी) पुणे दर्शनच्या धर्तीवर ‘पुणे व पिंपरी-चिंचवड दर्शन’ (बससेवा क्र. २) ही विशेष पर्यटन सेवा सुरू करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार प्रवाशांच्या सेवेसाठी ही बससेवा दाखल होणार आहे. यामुळे आता पर्यटकांना अवघ्या ५०० रुपयांत शहरांतील समृद्ध वारसा, संस्कृती आणि पर्यटन वैभव जवळून अनुभवता येणार आहे. आमदार शंकर जगताप यांनी २७ मे २०२६ रोजी पीएमपीएल प्रशासनासोबत या संदर्भात विशेष…
महावितरणच्या आकुर्डी प्रकल्पात 25 कोटींचा गैरव्यवहार ? – वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नियमबाह्य परवानगी – चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई कारा, कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनची मागणी पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डीतील 11 एकर औद्योगिक प्रकल्पाला वीजपुरवठा देताना महावितरणचे नियम धाब्यावर बसवून 2 कोटी 28 लाख रुपयांची कामे कोणतीही अधिकृत वर्क ऑर्डर नसताना सुरू करण्यात आली. या प्रकरणात महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने 20 ते 25 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचे कार्याध्यक्ष तथा शिवसेना पुणे जिल्हा संघटक मा. श्री. संतोष सौंदणकर यांनी गुरुवारी (ता. 11) प्रसिध्दी माध्यमांसमोर केला. हा गैरव्यवहार जावेद मुजावर यांनी माहितीच्या अधिकारातून उजेडात आणला आहे. यावेळी पिंपरी-चिंचवड इलेक्ट्रिकल…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थी चळवळीत सक्रिय सहभाग, काँग्रेसच्या विचारांप्रती असलेली निष्ठा आणि समाजाभिमुख कार्याची जाणीव यामुळे सौरभ शिंदे यांची राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेस (NSUI)च्या पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय प्रभारी कन्हैया कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष विनोद जाखड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सागर साळुंके, पुणे जिल्हाध्यक्ष अभिजीत गोरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. लहानपणापासूनच काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीशी प्रेरित असलेले सौरभ शिंदे यांनी विद्यार्थी आणि युवकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठवला आहे. शिक्षण, रोजगार, सामाजिक न्याय आणि विद्यार्थ्यांच्या हक्कांच्या प्रश्नांवर संघटित पद्धतीने लढा देण्याची त्यांची भूमिका राहिली आहे. नव्या जबाबदारीमुळे विद्यार्थ्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्याची आणि संघटना तळागाळापर्यंत मजबूत करण्याची संधी…
