Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) क्षेत्राच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर देण्यात आल्याने उद्योगजगतामध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप श्रीपाद बेलसरे यांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केले आहे. या अर्थसंकल्पात कौशल्य विकास, निर्यात वाढ, पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानवृद्धी यांना प्राधान्य देण्यात आले असून, प्राप्तिकर सवलत व नवीन वाहन खरेदीसाठी कर सवलत न दिल्यामुळे अर्थसंकल्प संतुलित असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. बजेटमध्ये देशभरातील २०० औद्योगिक क्लस्टरच्या पुनर्जीवनासाठी योजना सादर करण्यात आली असून, त्यामुळे उद्योगांची स्पर्धात्मकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. तसेच ‘चॅम्पियन’ सूक्ष्म, लघु व मध्यम…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या दूरदृष्टीपूर्ण संकल्पनेला गती देणारा केंद्रीय अर्थसंकल्प आज केंद्रीय अर्थमंत्री मा. निर्मलाजी सीतारामन यांनी सादर केला. या ऐतिहासिक अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण भारतीय जनता पार्टी पिंपरी-चिंचवड शहराच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष शत्रुघ्न बापू काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार-प्रसार समिती पिंपरी-चिंचवड शहराचे संयोजक व भाजप शहर महामंत्री मधुकर बच्चे यांनी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला. हा अर्थसंकल्प जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या कार्यक्रमाला चार्टर्ड अकाउंटंट बबनराव डांगले हे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प हा ऐतिहासिक असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ या संकल्पनेला गती देणारा असल्याचे मत भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर महामंत्री तथा केंद्रीय अर्थसंकल्प प्रचार-प्रसार समितीचे संयोजक मधुकर बच्चे यांनी व्यक्त केले आहे. या अर्थसंकल्पात समाजातील सर्व घटकांचा समतोल साधत सर्वसमावेशक विकासावर भर देण्यात आला असून शेतकरी, युवक, महिला, मध्यमवर्गीय नागरिक तसेच उद्योगक्षेत्र यांना केंद्रस्थानी ठेवून तरतुदी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पात कोणतीही उणीव दिसून येत नाही, असेही बच्चे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, पायाभूत सुविधांचा विकास, रोजगारनिर्मिती, शिक्षण व आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आलेल्या तरतुदी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  केंद्रीय अर्थसंकल्प २०२६–२७ हा विकसित भारताकडे नेणारा  दमदार आणि दूरदृष्टीचा विकसित भारताचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया आमदार शंकर जगताप यांनी दिली आहे. या अर्थसंकल्पामुळे महाराष्ट्रासह देशाच्या सर्वांगीण विकासाला मोठी चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्रीय अर्थमंत्री निर्मलाजी सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. विकास, लोकांच्या वाढत्या आकांक्षा आणि ‘सबका साथ, सबका विकास’ या तीन सूत्रांवर आधारित हा अर्थसंकल्प आहे असे आमदार शंकर जगताप म्हणाले. आमदार जगताप पुढे  म्हणाले की, मुंबई–पुणे हायस्पीड कॉरिडॉर, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदीमुळे महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीला वेग मिळणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात सरकारी भांडवली खर्च १२.२ लाख कोटी रुपयांपर्यंत…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज (1 फेब्रुवारी 2026) देशाचा अर्थसंकल्प (Budget 2026) मांडला. निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सलग नवव्यांदा अर्थसंकल्प (Union Budget 2026) सादर केला. आम्ही देशातील गरिबी निर्मूलनासाठी महत्वाचे काम केले. देश गेल्या 12 वर्षांपासून प्रगतीपथावर आहे. देशात गुंतवणुक वाढीला लागली आहे. भारताची विकसीत भारताकडे वाटचाल सुरू राहील. जीएसटी सोप बनवणं आणि रोजगाराच्या संधी वाढवणं हे आमचं उद्दिष्ट आहे, असं निर्मला सीतारमण यांनी सांगितले. केंद्र सरकारच्या 2026-27 च्या अर्थसंकल्पात काय स्वस्त आणि काय महाग झालंय, पाहा संपूर्ण यादी. 2026-27 च्या अर्थसंकल्पातून काय स्वस्त झालं? कॅन्सरची औषधं मधुमेहाची औषधं कपडे चामड्याची बूटं क्रीडा साहित्य…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सेवेतून माहे जानेवारी २०२५ अखेर नियत वयोमानानुसार ३३ कर्मचारी सेवानिवृत्त झाले, तर ५ कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याची माहिती मुख्य कामगार कल्याण अधिकारी प्रमोद जगताप यांनी दिली. माहे जानेवारी २०२६ मध्ये नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त होणा-या कर्मचाऱ्यांमध्ये उप अभियंता राजेश जगताप, असिस्टंट मेट्रन सुवर्णलता भोसले, जेनीफर शेफर्ड, गटनिदेशक राजकुमार तिकोने, कार्यालय अधिक्षक किशोर काटे, चंद्रकांत विरणक, सिस्टर इन्चार्ज सरिता कुलकर्णी, रत्नमाला जगताप, ए. एन. एम. मानसी पुणतांबेकर, उपशिक्षक पुष्पलता धोकटे, इलेक्ट्रिक मोटार पंप ऑपरेटर अनंत उदुगडे, वायरलेस ऑपरेटर दिलीप औटी, मुकादम पुखराज रेनवा, सुरक्षा सुपरवायझर रामचंद्र वाजे, रखवालदार भालचंद्र भोसले, विलास गजरमल, मजूर काशिनाथ लांडे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांच्या  गटनेतेपदी श्री. प्रशांत शितोळे यांची अधिकृत निवड करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप यांनी शनिवारी (दि. ३१) दिली. दरम्यान पिंपरी चिंचवड शहरातील नवनिर्वाचित नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या उपस्थितीत नगरसेवकांच्या गटाची अधिकृत नोंदणी केली आहे. याबाबत आमदार शंकर जगताप म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरामध्ये भाजपने अभूतपूर्व यश मिळवले. शहरामध्ये भाजपच्या माध्यमातून गेल्या नऊ वर्षात अनेक सुविधा निर्माण झाल्या. नागरिकांना अत्याधुनिक मेट्रो सुविधेपासून चांगले रस्ते, पाणी व्यवस्थापन, करप्रणालीत सुसूत्रता, कचऱ्याचे नियोजन, सक्षम आरोग्य योजना अशा सर्वंकष विकासावर ‘फोकस’ ठेवला.  यामुळे नुकत्याच पार पडलेल्या मनपा निवडणुकीमध्ये नागरिकांनी भाजपला भरभरून…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकशाहीचा चौथा स्‍तंभ असलेल्‍या माध्यमांचे स्‍वातंत्र्य जपले अशा भावना पिंपरी चिंचवड शहर पत्रकारांनी व्‍यक्‍त केल्‍या. कितीही कठोर प्रश्‍न विचारले किंवा माध्यमातून लिखाण केले तरी पत्रकार बांधवांवर दबाव आणणे अथवा जाब विचारण्याचे प्रकार पवारांनी केला होता नाही. असे माध्यम स्‍वातंत्र्य जपणारा, विकासाभिमूख नेतृत्‍वाला पिंपरी चिंचवड शहरासह राज्‍य मुकले अशा भावनाही माध्यम प्रतिनिधींनी व्‍यक्‍त केल्‍या. पिंपरी चिंचवड शहर पत्रकारांच्‍या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्‍या शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. चिंचवड येथील सायन्‍स पार्कच्‍या सभागृहात पार पडलेल्‍या कार्यक्रमात आठवणीतले अजित पवार या विषयावर माध्यम प्रतिनिधींनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. या वेळी ज्‍येष्ठ…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यासाठी उन्नती सोशल फाउंडेशन, पिंपळे सौदागर यांच्या वतीने उन्नती सोशल फाउंडेशन कार्यालय येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले. या शोकसभेत स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दोन मिनिटांचे मौन पाळण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या सामाजिक, प्रशासकीय व विकासाभिमुख कार्याचा गौरव करत भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना नगरसेविका डॉ. सौ.कुंदाताई संजय भिसे म्हणाल्या, “पिंपरी–चिंचवड शहराचे शिल्पकार अजितदादा होते. त्यांनी स्व. लक्ष्मणभाऊंच्या साथीने शहराच्या पायाभूत सुविधांचा दूरदृष्टीने विकास केला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील सत्तासमीकरणात भारतीय जनता पार्टीने अनुभवी नेतृत्वावर विश्वास दाखवत प्रशांत शितोळे यांच्याकडे गटनेतेपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. चौथ्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेले प्रशांत शितोळे हे सभागृहातील ज्येष्ठ आणि अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात.निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. त्यांच्या प्रवेशाने भाजपच्या संघटनात्मक ताकदीत मोठी भर पडली असून, पक्षाने त्यांच्या अनुभवाचा योग्य सन्मान करत त्यांना गटनेतेपदाची धुरा दिली आहे. यापूर्वी प्रशांत शितोळे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना त्यांनी पक्षाचे शहर कार्याध्यक्ष म्हणूनही काम करत संघटनात्मक पातळीवर प्रभावी…

Read More