- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुंबई येथे मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धा -२०२३ स्पर्धेमध्ये पिंपरी चिंचवड मधील हिंदुस्थान अँटिबायोटिक स्कूलच्या माध्यमिक विभागाने अंतिम फेरीत पाच वैयक्तिक बक्षीसांसह प्रथम क्रमांक पटकावला. नवी मुंबईतील मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, वाशी येथे अंतिम फेरी नुकतीच पार पडली. यामध्ये महाराष्ट्राच्या विविध विभागातून संघ दाखल झाले होते. अंतिम फेरीत हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूल, माध्यमिक विभागाच्या ‘द फ्लायर्स’ टीमने ३१ हजार रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळवले. तसेच वैयक्तिक पातळीवर लेखन प्रथम क्रमांक – जगदीश पवार; दिग्दर्शन प्रथम क्रमांक – जगदीश पवार; पार्श्वसंगीत प्रथम क्रमांक – मंगल साठे;…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे जिल्हा व तालुका परिषद माध्यमिक शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड मनपा शिक्षण विभाग यांच्या वतीने आयोजित केलेल्या ५१ व्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन २३-२४ मध्ये पिंपरी मधील हिंदुस्तान अँटिबायोटिक्स स्कूलच्या ‘एक्सीडेंट अलर्ट इंडिकेटर’ या प्रकल्पाने नववी ते बारावी या गटातून १५० प्रकल्पातून दुसरा क्रमांक पटकावला. एच. ए. स्कूलचा इयत्ता दहावीतील विद्यार्थी अभिज्ञ कुलकर्णी याने प्रकल्प सादर केला. विज्ञान प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहावी ते आठवी या गटात ७५ संघाची निवड झाली होती. या मध्ये हिंदुस्तान अँटिबायोटिक स्कूलच्या इयत्ता सातवी मधील संस्कृती पाटील व झयान शेख यांच्या गटाने द्वितीय क्रमांक पटकावला. या दोन्ही गटांना श्वेता नाईक व हविनाळ शिवयोगेश्वर,…
वाकड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील भूमकर चौकातील अस्पष्ट आणि मोडकळीस आलेले दिशादर्शक फलक हटवून त्याठिकाणी नवीन फलक लावण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ड प्रभागातील जनसंवाद सभेत संबंधित अधिकाऱ्यांकडे केली आहे. याबाबत त्यांनी लेखी पत्र दिले आहे. वाकड येथील भूमकर चौक हा नेहमीच गजबजलेला परिसर असून या ठिकाणहून जाणाऱ्या वाहनांची संख्या खूप मोठी आहे. हिंजवडी आयटी पार्क परिसर याच भागात असल्याने नोकरदार वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मुंबई बेंगलोर महामार्गालगत हा भाग असल्याने वाहनचालकांना योग्य रस्ते आणि दिशा समजण्यासाठी दिशादर्शक फलक सुस्थितीत असणे आवश्यक आहे, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी या…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्या प्रभू श्री राम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त भोसरी एमआयडीसी येथे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन आणि दुर्गा ब्रिगेड तर्फे भव्य महाआरती आणि रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. अभय भोर संपर्क कार्यालयात श्रीरामाची आरती घेण्यात आली आरतीला औद्योगिक परिसरातील उद्योजक कामगार आणि महिला भगिनी उपस्थित होत्या. तसेच औद्योगिक परिसरामध्ये उद्योजक आणि कामगार बंधू तर्फे रॅली घेऊन आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी फटाके वाजवून आणि उद्योजक कामगारांनी नाचून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर उद्योजक जसबिंदर सिंग, प्रवीण चव्हाण, जसबाल सिंग, सचिन जाधव , प्रशांत पठारे दुर्गा भोर तसेच अनेक उद्योजक कामगारांचा सहभाग…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- महापालिका शाळांमध्ये झालेले वैविध्यपूर्ण बदल, महापालिकेच्या वतीने राबविण्यात आलेले विविध महत्वाकांक्षी उपक्रम आणि आदर्श शिक्षक यामुळे महापालिका शाळांचे चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे. जल्लोष शिक्षणाचा या उपक्रमामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीस निश्चितच मदत झाली आहे, असे मत खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी व्यक्त केले. शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महापालिका शाळांचे यश साजरे करण्यासाठी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे २३ व २४ जानेवारी २०२४ रोजी “जल्लोष शिक्षणाचा २०२४” या कार्यक्रमाचे महापालिकेच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खासदार बारणे बोलत होते. यावेळी आमदार अश्विनी जगताप, आयुक्त शेखर…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अयोध्या येथे काल श्रीराम मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानिमित्त पिंपळे गुरव येथे दीपमहोत्सव कार्यक्रमाने राजमाता जिजाऊ गार्डन दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघाले. पिंपळे गुरव, राजमाता जिजाऊ गार्डन या ठिकाणी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तसेच सामाजिक कार्यकर्ते रमेश काशीद, पोपट जगताप, मधुकर रणपिसे, प्रसाद जाधव रवी धनवडे ,नरेश पवार ,राज जाधव ,कोळी साहेब शशिकांत गायकवाड, अँड रणजीत ढोमसे, रणजित डोमसे, बाळासाहेब देवकर, सुर्य नमस्कार ग्रुप,हास्य क्लबचे सभासद उपस्थित होते.
– कामगारांनी सलग चौथ्यांदा दाखवला विश्वास – निकालानंतर भंडारा उधळून केला आनंदोत्सव पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्योगनगरी पिंपरी-चिंचवडच्या औद्योगिक क्षेत्राचा ‘कणा’ असलेल्या टाटा मोटर्स एम्प्लॉईजन युनियन सदस्यपदाच्या निवडणुकीत कामगार बंधू सचिन लांडगे यांनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या निवडणुकीत विजयाचा ‘चौकार’ मारल्यामुळे त्यांच्यावर कामगार क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. टाटा मोटर्स कंपनीच्या एम्प्लॉईज युनियनच्या कार्यकारिणीसाठी तीन वर्षांच्या कालावधीसाठी निवडणूक होत असते. या निवडणुकीकडे कामगार क्षेत्राचे लक्ष असते. कंपनीच्या पॅसेंजर्स व्हेईकल बिझनेस युनिट व कर्मर्सिअल व्हेईकल बिझनेस युनिट असे एकूण ५ हजार ३७४ कामगारांनी मतदान केले. ट्रान्स एक्सल शॉप विभागात २२५ मतदार आहेत. त्यापैकी २१९ कामगारांनी मतदानाचा अधिकार…
– हळदी समारंभातून महिलांचा सन्मान ; घरकाम महिला सभेचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या युगातील महिला कितीही संकटे आली तरी स्वाभिमानी आणि स्वावलंबी बाण्याने जगत आहेत. स्वतःच्या पायावर उभे राहून आपल्या कुटुंबाचा आधार बनत आहेत. त्यांचा हा लढा त्यांच्या जगण्याची प्रेरणा बनली असल्याचे प्रतिपादन घरकाम महिला सभेच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्षा आशा कांबळे यांनी केले. घरकाम महिला सभेच्या वतीने पिंपरीतील कार्यालयात हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोज करण्यात आले होते. या कार्यक्रमात सफाई कामगार महिला, घरेलु कामगार महिला, विधवा, परितक्त्या आदी महिलांचा सहभाग होता. यावेळी मार्गदर्शन करताना कांबळे बोलत होत्या. आर्थिक कमाई करून आपल्या कुटुंबाचा आधार बनलेल्या महिलांचा या…
शहरातील मराठा क्रांती मोर्चा सकल मराठा समाज व शेकडो मंडळे करणार स्वागत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मनोज जरांगे पाटील यांच्यासह लाखों मराठा बांधव आंदोलनासाठी मुंबईकडे निघाले आहेत.सर्व आंदोलक बुधवार दिनांक 24 रोजी मार्गे पदयात्रेने शहरात दाखल होत आहेत. पिंपरी चिंचवड शहरात सांगवी फाटा येथे विविध संघटना व सार्वजनिक मंडळ जरांगे पाटील यांचे भव्य स्वागत करणार आहेत. यानंतर रक्षक सोसायटी चौक येथे पिंपळे निलख ग्रामस्थ तसेच जगताप डेअरी चौकामध्ये रहाटणी व पिंपळे सौदागरचे ग्रामस्थ काळेवाडी फाटा येथे काळेवाडी चे ग्रामस्थ व विविध मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात येणार आहे. सोळा नंबर बस स्टॉप थेरगाव येथे मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेड, जिजाऊ…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा हा संघ परिवार व वस्ती प्रमुख स्वामी समर्थ केंद्र महिलांच्या व गोंधळी समाज सेवा संघ तापकीर नगर जोतिबा नगर काळेवाडी तील सर्व राम भक्त स्वामी भक्त यांच्या उपस्थितीत श्री राम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा साजरा करण्यात आला. विनोद तापकीर व ज्ञानेश्वर तापकीर यांच्या हस्ते गणेश पूजन करून श्री रामाची आरती स्वामी ची आरती तुळजाभवानी मातेची आरती करून त्यांतर अन्न प्रसाद वाटप करून आनंदात उत्सवात फाटक्याची अतिषबाजी करीत स्वामी समर्थ केंद्र तापकीर नगर तुळजाभवानी मंदिर तापकीर येथे साजरा करण्यात आला असंख्य भक्तांच्या उपस्थित आनंदात साजरा करण्यात आला.
