Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये उल्लेखनीय कामगिरी करत १ एप्रिल २०२५ पासून ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत ७०२ कोटी ७३ लाख रुपयांचा मालमत्ता कर वसूल केला आहे. तसेच पुढील दोन महिन्यांत मालमत्ता कर वसुलीच्या दृष्टीने व्यापक मोहीम हाती घेण्यात आली आहे. तरी ज्या मालमत्ताधारकांनी अद्याप मालमत्ता कर भरलेला नाही, त्यांनी तो लवकरात लवकर भरावा, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या कर संकलन विभागाने यावर्षी कर वसुलीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे. ऑनलाईन पेमेंट प्रणाली तसेच विविध डिजिटल माध्यमांद्वारे नागरिकांना कर भरण्यासाठी सुलभ सुविधा…

Read More

 पुण्यात ‘हेरिटेज यात्रा–२०२६’चा दिमाखदार प्रारंभ पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भारतीय संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन, समृद्ध आणि विविधतेत एकता दर्शवणारी संस्कृती आहे. वसुधैव कुटुंबकम् हा उदात्त विचार, शांतता, सहिष्णुता, आदर आणि आध्यात्मिक मूल्यांवर आधारित जीवनपद्धती ही भारतीय संस्कृतीची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृती समजावून घेत असताना भारतीय संस्कृतीचे जतन करणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी ‘हेरिटेज यात्रा’सारखे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. येथे पारंपरिक हस्तकलेपासून ऑगमेंटेड रिअॅलिटी (एआर)सारख्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास या महोत्सवात अनुभवता येतो. पुणे महानगरपालिका आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे मत प्रसिद्ध संगीततज्ज्ञ आदिनाथ मंगेशकर यांनी व्यक्त केले. ते भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या…

Read More

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण; २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत सर्वसाधारण सभा तहकूब पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज निवडणूक प्रक्रिया पार पडली. यासाठी विशेष सभा पिठासीन अधिकारी तथा सहकार आयुक्त दिपक तावरे यांच्या अध्यक्षतेखाली पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनातील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडली. यावेळी महापौर पदासाठी भारतीय जनता पक्षाचे रवि लक्ष्मण लांडगे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची महापौर पदासाठी बिनविरोध निवड करण्यात आली. तर उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वैशाली जालिंदर काळभोर आणि भारतीय जनता पक्षाच्या शर्मिला राजू बाबर यांचा प्रत्येकी १ असे एकूण २ अर्ज प्राप्त झाले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने नागरिकांना दिलेला दररोज पाणीपुरवठ्याचा शब्द माझ्याच कार्यकाळात पूर्ण केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकारांशी संवाद साधताना महापौर लांडगे म्हणाले की, प्रशासकीय राजवटीत नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आता लोकप्रतिनिधी म्हणून सर्व नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील. पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले जाईल. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी चिखली जलशुद्धीकरण केंद्र, रावेत बंधारा तसेच भामा आसखेड जलवाहिनीच्या कामांची पाहणी केली जाणार…

Read More

​पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेवर गेल्या ३ वर्षे, १० महिने आणि २४ दिवसांपासून असलेली प्रशासकीय राजवट आज संपुष्टात आली आहे. नवनिर्वाचित महापौर रवी लांडगे आणि उपमहापौर शर्मिला बाबर यांच्या निवडीमुळे शहरात पुन्हा एकदा लोकाभिमुख कारभाराचे पर्व सुरू झाले असून, हे सभागृह शहराच्या प्रगतीचा वेग अधिक वाढवेल, असा विश्वास सत्तारुढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी व्यक्त केला. ​पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. या निवडीनंतर त्यांचे अभिनंदन करताना प्रशांत शितोळे बोलत होते. यावेळी भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न ( बापू) काटे, आमदार महेश दादा लांडगे,…

Read More

महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौरपदी शर्मिला बाबर यांची निवड पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड हे शहर केवळ लोकसंख्येने मोठे नसून नियोजनबद्ध विकास, नागरी प्राधान्य आणि प्रशासनिक शिस्त यामुळे देशात आदर्श ठरले आहे. या यशामागे महापौरांनी सभागृहातून घेतलेले निर्णय, लोकप्रतिनिधींची परिपक्वता आणि शहराच्या हिताला दिलेले सर्वोच्च प्राधान्य कारणीभूत आहे. सभागृहाची हीच गरिमा महापौर व उपमहापौर जपतील आणि शहर विकासाला प्राधान्य देतील असे निवडणूक प्रचार प्रमुख तथा आमदार शंकर जगताप म्हणाले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडीसाठी आयोजित विशेष सर्वसाधारण सभेत महापौरपदी रवी लांडगे आणि उपमहापौर पदी शर्मिला बाबर यांची निवड झाली. महापौर पदासाठी रवी लांडगे यांचा एकमेव…

Read More

– महापौर, उपमहापौर, सत्तारुढ पक्षनेत्यांची घोषणा – भारतीय संविधानाची पत्र देऊन केले अभिनंदन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टीचे बिनविरोध नगरसेवक रवि लांडगे यांनी महापौरपदी बिनविरोध निवड झाली. भाजपाचे निष्ठावंत व शहराचे माजी विरोधी पक्षनेते कै. बाबासाहेब लांडगे, भाजपाचे नेते दिवंगत कै. अंकुशराव लांडगे कुटुंबियांनी भारतीय जनता पार्टी आणि शहरासाठी समर्पण भावनेतून काम केले आहे. आज त्यांच्या कार्याला खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळाली आहे. तसेच, सर्वसामान्य कार्यकर्ता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी समर्पित भावनेतून काम करणाऱ्या बाबर कुटुंबियांतील शर्मिला बाबर यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड होत आहे. ही किमया फक्त भारतीय जनता पार्टीतच शक्य आहे, असे मला वाटते, अशा भावना…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या महापौरपदी  रवि बाबासाहेब लांडगे यांची निवड झाली असून, त्यांच्या निवडीमुळे भोसरी परिसरासह संपूर्ण शहरात समाधान व्यक्त केले जात आहे. १५ ऑगस्ट १९८४ रोजी भोसरी (ता. हवेली, जि. पुणे) येथे जन्मलेल्या रवि लांडगे यांनी डी. फार्मसी पर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषा त्यांना अवगत आहेत. शेती, उद्योग व बांधकाम हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. ते विवाहित असून त्यांच्या पत्नी  श्रद्धा रवि लांडगे या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या माजी नगरसेविका आहेत. त्यांना एक मुलगा आहे. राजकारणात सक्रिय असलेले रवि लांडगे यांनी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. सन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताकेंद्रांवर भाजपने आपले वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. महापौरपदासाठी भाजपचे रवी बाबासाहेब लांडगे तर उपमहापौरपदासाठी शर्मिला बाबर यांची बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षांकडून कोणताही प्रभावी उमेदवार न आल्याने ही निवड प्रक्रिया निर्विघ्न पार पडली. महापालिकेच्या विशेष सभेत पीठासीन अधिकारी दीपक तावरे यांनी दोन्ही पदांवरील निवडींची अधिकृत घोषणा केली. निवडणूक प्रक्रियेदरम्यान कोणत्याही पक्षाकडून स्पर्धात्मक अर्ज सादर न झाल्याने भाजपच्या उमेदवारांचा विजय आधीच निश्चित झाला होता. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांना पत्र पाठवून उमेदवारांच्या नावांबाबत पूर्वसूचना दिली होती. त्यानुसार सोमवारी उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने यंदाच्या महापौर…

Read More

पिंपळे सौदागर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  भाजप शहराध्यक्ष तथा नगरसेवक  शत्रुघ्न (बापु) काटे,नगरसेविका  अनिता काटे आणि नगरसेविका  कुंदा भिसे यांच्या पाठपुराव्यामुळे पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेमार्फत हे काम हाती घेण्यात आले आहे. या सुशोभीकरणांतर्गत चौक परिसरात विविध रंगीबेरंगी फुलांची झाडे,शोभेची झुडपे लावण्यात येत असून परिसर अधिक आकर्षक, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक बनवण्यावर भर देण्यात येत आहे. यामुळे परिसराचे सौंदर्य वाढण्यासोबतच नागरिकांना स्वच्छ व आनंददायी वातावरण मिळणार आहे. या उपक्रमामुळे चौक परिसरात हिरवळ वाढणार असून प्रदूषण कमी करण्यास मदत होईल. स्थानिक नागरिकांनी या कामाचे स्वागत केले असून महापालिका व लोकप्रतिनिधींच्या या पुढाकाराचे कौतुक व्यक्त केले जात आहे. रहाटणी-पिंपळे सौदागर परिसरातील चौक,रस्ते इ. सुशोभीकरण आणि…

Read More