- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड महानगरपालिका वृक्ष प्राधिकरण यांच्या वतीने ‘रानजाई महोत्सव’ व २७ वे भव्य ‘फळ-फुले भाजीपाला बागा प्रदर्शन व स्पर्धा ’ दिनांक १ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या महोत्सवामध्ये पर्यावरण तज्ञांचे मार्गदर्शन, लाईव्ह कॅलिग्राफी, प्राचीन उद्यान कलेचे अस्तित्व या विषयावर व्याख्यान, निसर्ग कवितांचे कविसंमेलन यांसह पर्यावरण संवर्धन व जनजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून या महोत्सवात शहरवासियांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले आहे. महापौर निवास, सेक्टर नं २७ संत तुकाराम उद्यान शेजारी, निगडी प्राधिकरण येथे शुक्रवार १ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता आयुक्त तथा…
महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त शोभायात्रा, व्याख्यान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पूर्वीच्या काळात समुद्र ओलांडून विदेशात जाणे निषिध्द मानले जात होते. हे नाकारून शिक्षण, व्यापार, उद्योग, व्यवसायासाठी ‘सिंधू बंदी’ उठवण्याचे महान कार्य महर्षी दयानंद सरस्वती यांनी केले. जाती, वर्ण व्यवस्था नाकारून, वेदांचे पठण, ज्ञान सर्वांसाठी खुले करीत अस्पृश्यता संपवण्याचे प्रथम पाऊल त्यांनी उचलले. नाभिक समाजाच्या व्यक्तीच्या घरी जेवण करून रोटी बेटी व्यवहार वाढवून जातिव्यवस्थेवर आधारित व्यवसाय बंदी मिटविण्याचे क्रांतिकारी कार्य विसाव्या शतकात महर्षी दयानंद सरस्वती यांनी केले आहे असे प्रतिपादन आचार्य सोनेराव यांनी केले. आर्य समाज संस्थापक महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त पिंपरी येथे…
स्वयंचलित संगणक प्रणालीचे महानगरपालिका कर्मचा-यांना प्रशिक्षण पिंपरी : पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आणि प्रशासन अधिक कार्यक्षम बनवण्यासाठी अनेक नवीन तंत्रज्ञान राबविण्यात येत आहे. स्मार्ट सिटीच्या जीआयएस प्रकल्पांतर्गत महापालिकेच्या विविध विभागांसाठी ३५ आयटी सॉफ्टवेअर्स एकात्मिक पद्धतीने विकसित करण्यात येत आहे. याअनुषंगाने, दि. २८ फेब्रुवारी २०२४ रोजी स्थायी समिती सभागृह, मुख्य कार्यालय येथे ८० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांना या प्रणालींचा वापर कसा करावा, तसेच प्रस्ताव तयार करणे, प्रस्तावाची नोंद ठेवणे, खरेदी/टेंडर प्रक्रिया, वर्क ऑर्डर तयार करणे, इतर स्वयंचलित प्रक्रिया आदींबाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, उपायुक्त संदीप खोत, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी विजय बोरुडे, कार्यकारी अभियंता हरदिपसिंग बन्सल आदी उपस्थित होते. प्रकल्प सल्लागार राजा डॉन, सुदीप मिटकरी, एटोसचे…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आगामी लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु होण्यापूर्वीच ठाकरे गटाला धक्के बसण्यास सुरुवात झाली आहे. लोणावळ्याच्या उपशहरप्रमुखांसह अनेक कार्यकर्त्यांनी खासदार श्रीरंग बारणे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. लोणावळा उपशहरप्रमुख संजय भोईर, मनिषा भांगरे, पिंपरी-चिंचवडच्या महिला उपजिल्हाप्रमुख स्वरुपा खापेकर, व्यापारी असोसिएशनचे अॅड. कमलेश मुथा, पांडुरंग भाडेकर, मीना मांडे, संगीता आमटे, स्नेहल साळुंखे, काळोखे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांचे विकासाचे व्हिजन, दृरदष्टी, त्यांच्या नेतृत्वार विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेत प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांवर कोणताही अन्याय होणार नाही. त्यांना सन्मान दिला जाईल. सर्वांनी निवडणुकीच्या कामाला लागावे.
“मराठी शब्द वापरून भाषेचा गौरव करा- अरुण बोऱ्हाडे” चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “आपली मायबोली मराठी ही सर्वांगाने समृद्ध भाषा आहे. आपल्या भाषेतील शब्द आपण दैनंदिन व्यवहारात ठरवून वापरले पाहिजेत. मातृभाषा आणि राजभाषा असणारी मराठी ज्ञानभाषा म्हणूनही श्रेष्ठ आहे. उत्तमोत्तम दर्जेदार शब्दांनी समृद्ध असलेल्या आपल्या मायबोली मराठी भाषेचे संवर्धन करण्यासाठी घराघरात वाचन संस्कृती रुजविणे ही काळाची गरज आहे. शहरी भागातील लोकांनां बोली भाषेतील ग्रामीण शब्द वापरायला लाज वाटते. म्हणून इतर भाषेतील शब्द वापरून संभाषण केले जाते. नुसता गौरवदिन साजरा करून उपयोग नाही. पदोपदी मराठी शब्दांचा वापर करणे आणि मराठीमधूनच संवाद साधणे, हाच मराठी भाषेचा खरा गौरव आहे. आपली भाषा हे…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मंगळवारी (दि.२७) मराठी स्वाक्षरी मोहीम घेण्यात आली. त्यामध्ये पदाधिकारी, मान्यवर आणि सर्वसामान्य नागरिकांनी सहभाग घेत स्वाक्षरी केली. ‘मी मराठी, माझी स्वाक्षरी मराठी’ या उपक्रमात मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, शहर सचिव रुपेश पटेकर, शहर उपाध्यक्ष राजू सावळे, बाळा दानवले, राजू भालेराव, शैलेश पाटील, अनिता पांचाळ, वैशाली बोत्रे, नितीन चव्हाण, शहर संघटक जयसिंग भाट, नारायण पठारे आदींनी सहभाग नोंदवला. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी मराठी भाषेच्या घोषणा दिल्या. तसेच, राज्य शासनाच्या आदेशानुसार पिंपरी- चिंचवड शहरातील सर्व व्यापाऱ्यांनी महाराष्ट्राचा गौरव आणि अस्मिता जपण्यासाठी न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठी भाषेचे संवर्धन व विकसन यांचे संस्कार विद्यार्थ्यांवर व्हावे” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक माधुरी विधाटे यांनी केले. ज्येष्ठ साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज ह्यांच्या जयंती निमित्त विद्या विनय निकेतन प्राथमिक शाळा,विशाल नगर, पिंपळे निलख येथे मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी विशालनगर येथील नगरसेविका मा.आरतीताई चोंधे व शाळेच्या मुख्याध्यापिका मा. नूतन भांबुरे मॅडम व इतर शिक्षक वृंद, विद्यार्थी आणि पालक सहभागी होते. सदर कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मराठी दिनाविषयी महती सांगून मराठी गौरव गीते सादर केली.तसेच पाठ्यपुस्तकातील विविध कवींच्या कवितांचे सामुहिक सादरीकरण केले. मान्यवरांनी मराठीतून स्वतःची…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ड क्षेत्रिय कार्यालयाचे कार्यक्षेत्रातील नाशिक फाटा उड्डाणपूल ते कोकणे चौक या मार्गालगतच्या दुसऱ्या बाजूचे अनधिकृत पत्राशेड व बांधकामावर कारवाई करण्यात आली.सुमारे ४५ हजार चौ फूट क्षेत्राचे पत्राशेड पाडण्यात आले. उद्या साई चौक जगताप डेअरी ते डांगे चौक या रस्त्यालगत कारवाई करणेत येणार आहे. सदरची कारवाई आयुक्त शेखर सिंह यांचे आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील व शहर अभियंता मकरंद निकम यांचे नियोजनानुसार करणेत आली. सदरची कारवाई अ, ब,ग, ड क्षेत्रिय कार्यालयाकडील चार टीम मार्फत करणेत आली. उप आयुक्त मनोज लोणकर, क्षेत्रिय अधिकारी अंकुश जाधव, अमित पंडित, अजिंक्य येळे,सुचिता पानसरे, ४ उपअभियंता ५ कनिष्ठ…
एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिकीकरणाच्या वाढत्या प्रभावामुळे व्यवहारिक व ज्ञानभाषा म्हणून इतर भाषा वापरल्या जातात. परंतु कौशल्य आत्मसात करण्यासाठी, एखादी नव संकल्पना समजून घेणे किंव्हा प्रभावीपणे सादर करण्यासाठी आपली मातृभाषा हेच संवादाचे उत्कृष्ट माध्यम आहे असे प्रतिपादन प्राचार्या डॉ. बिंदू सैनी यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूलमध्ये मंगळवारी मराठी राजभाषा दिन निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात डॉ. सैनी बोलत होत्या. इयत्ता १ ली ते ८ वी च्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत विविध गुणदर्शन कार्यक्रम सादर केले. यामधे महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे…
मार्गिकेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात खर्चास मंजुरीखासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठपुराव्याला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तत्कालीन राज्य सरकारच्या अनास्थेमुळे रखडलेल्या पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकला आता मुख्यमंत्री एकनाश शिंदे आणि मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गती मिळाली आहे. या मार्गिकेचा 50 टक्के खर्च करण्यास अर्थसंकल्पात मंजुरी दिली आहे. त्यामुळे मार्गिकेचे काम लवकरच सुरु होईल. मार्गिकापूर्ण झाल्यानंतर लोकल वेळेत धावतील. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होणार नाही. वेळेत कार्यालय, महाविद्यालयात जाता येईल, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारने 2015-16 मध्ये पुणे-लोणावळा लोहमार्गावरील तिसरा आणि चौथ्या ट्रॅक करण्याची घोषणा केली. त्याचा विकास आराखडा (डीपीआर) तयार केला. त्यासाठी 2017…
