Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वतीने शुक्रवार, दिनांक २६ जानेवारी २०२४ रोजी अमृतमहोत्सवी ७५वा प्रजासत्ताकदिन नेहरूनगर न्यायालयाच्या प्रांगणात साजरा करण्यात आला. यावेळी पिंपरी न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आर. एस. वानखेडे, पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांच्या हस्ते तिरंगाध्वज फडकविण्यात आला. तसेच पोलीस दलामार्फत ध्वजाला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश माने आणि पौळ तसेच पिंपरी येथील न्यायाधीश एम. जी. मोरे, आर. एम. गिरी, पी. सी. फटाले, व्ही. एन. गायकवाड, ए. एम. बगे, एम. ए. आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रजासत्ताक दिनानिमित्त पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे सहायक…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये ‘प्रजासत्ताक दिन’उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी औंधकॅम्प येथील २४ मराठा लाईट इन्फेनेटी कमांडर सुभेदार राम बाघेले, मा. नगरसेविका निर्मला कुटे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका नाझनीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, संतोष कापसे, विलास पोळ, शांताराम भालेराव, गोरख रोकडे, मयूर ओव्हाळ, बाळासाहेब शेंडगे, फहाद खान, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. प्री-प्रायमरी, पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी, सहावी, सातवी, आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावर नृत्य सादर केले. प्री- प्रायमरीच्या फॅन्सी ड्रेस स्पर्धा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  गेल्या अनेक वर्षापासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत होता. त्यासाठी विविध आंदोलने, क्रांती मोर्चे निघाले, पण प्रश्न सुटत नव्हता. गेल्या पाच महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली गरजवंत मराठा समाज विविध आंदोलने करत होता. मराठा समाज मुळातच कुणबी आहे. त्यास कुणबी नोंदी तपासून कुणबी दाखले द्यावेत ही प्रमुख मागणी होती. त्यासाठी सरकारने शिंदे समिती नेमली होती. पण आश्वासने देऊनही प्रश्न सोडवला जात नव्हता. त्यासाठी आंदोलनाचा शेवटचा टप्पा दि. २० जानेवारीला सुरू झाला. मनोज जरांगे पाटील लाखो मराठा आंदोलकांसह मुंबईकडे जायला निघाले होते. नवी मुंबईमध्ये आंदोलन पोहोचले, त्यानंतर सरकारने जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य केल्या.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – सुरेश शिवाजी भोईर यांच्या कार्यालयात महिला बचत गटाच्या शक्ती वंदन कार्यक्रम घेण्यात आला येणाऱ्या वर्षात बचत गटाच्या महिलांसाठी सुविधा ,बाजारपेठा व महिला सक्षमीकरण या विषयी माहिती देण्यात आली. सुरेश शिवाजी भोईर , प्रमुख उपस्थिती सुजाता पालांडे (जिल्हा अध्यक्ष भाजपा महिला मोर्चा), कविता हिंगे (प्रदेश सचिव महिला मोर्चा मावळ लोकसभा संयोजिका ), अनघा रुद्र ( महिला मोर्चा भाजपा सर चिटणीस ), कल्पना भोईर, पल्लवी पाठक, दिपाली संजय कलापुरे, व बचतगटातील सर्व महिला उपस्थित होत्या

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे व इतर मागण्यासाठी सकल मराठा समाज,मराठा क्रांती मोर्चा आक्रमक होत मनोज जरंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यावर उतरला होता. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली अंतरवली सराटी ते आझाद मैदान मुंबई पायी मोर्चा निघाला याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. मोर्चा मुंबईच्या वेशीवर वाशी येथे पोचला असताना याची दखल घेत सरकारने दोन पावले पुढे टाकत सकारात्मक चर्चा करत ज्यांची कुणबी म्हणून नोंद आहे त्यांच्या सर्व पितृसत्ताक रक्त नातेवाईकांना सगे सोयाऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला यामुळे बऱ्याच मोठ्या प्रमाणात मराठा समाजातील वंचित घटकाला याचा फायदा होणार आहे.या शासन निर्णयाचे स्वागत करीत पिंपरी…

Read More

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवडच्या वतीने “सत्यशोधक”या चित्रपटाचे विशेष स्क्रिनिंगचे आयोजन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राष्ट्रवादी युवक काँग्रेस पिंपरी चिंचवड यांच्या वतीने (दि.२५) भोसरी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी,नागरिकांसाठी विशाल सिनेमा पिंपरी येथे “सत्यशोधक”या चित्रपटाच्या विशेष स्क्रिनिंगचे आयोजन करण्यात आले.यावेळी शिरूर लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉ अमोल कोल्हे उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ अमोल कोल्हे म्हणाले”स्त्रियांच्या जीवनात शिक्षणाची मशाल पेटवण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतिराव फुले यांनी असंख्य चटके सोसले.त्यांच्या त्यागाचे, संघर्षाचे फलित म्हणून आज देशातील कोट्यवधी स्त्रियांना ज्ञानमंदिराचे द्वार खुले आहे. फुले दांपत्यांनी प्रतिकूल परिस्थितीत सर्व जाती-धर्माच्या साथीदारांना घेऊन आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी जो संघर्ष केला.त्यांचे उपकार बहुजन समाज कधीच विसरणार नाही.फुले…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीतील एच. ए. स्कूलमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. एच. ए. कंपनीच्या एम. डी. निरिजा सराफ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. एनसीसी स्काऊट गाईड व आरएसपीच्या संचालन केले. राष्ट्रीय एकात्मतेची सामूहिक प्रार्थना करण्यात आली. पूर्व प्राथमिकच्या विद्यार्थ्यांनी ‘आम्ही मुले या देशाची’ हे नृत्य सादर केले. माध्यमिक च्या विद्यार्थ्यांनी ‘होऊ सारे एक अखंड भारत’ हे गीत गायले. यावेळी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका दीपा अभ्यंकर, शिक्षक प्रतिनिधी रमेश गाढवे, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव, पालक प्रतिनिधी व माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. पाचवीच्या विद्यार्थ्यांनी भारतातील खाद्यपदार्थ, प्राणी, पक्षी व वनस्पती या संदर्भामध्ये हस्तलिखित…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेची यमुनानगर, निगडी येथील शाळा यावर्षी रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. त्यानिमित्त आणि भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले. उद्योजक अनिल भांगाडिया, लायन्स क्लबचे ज्येष्ठ सदस्य हिरामण गवई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार,छत्री कवायत, फुलांची कवायत, लेझीमचे प्रात्यक्षिक सादर केले. भारतीय संविधान यावर विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केली. राष्ट्र भक्तीपर गीत सादर केले. शाळा समिती अध्यक्ष दामोदर भंडारी यांनी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थी मानसी गवंडगावे, शिक्षिका जयश्री कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अश्विनी रासकर यांनी केले. मुख्याध्यापिका ज्योती बक्षी, लीना वर्तक, उमा घोळे, मुख्याध्यापक रविंद्र…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल मध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.प्रमुख पाहुणे डेव्हिड प्रकाश आणि मीना डेव्हिड यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यांना शाळेच्या बँड पथकाने सलामी दिली. सूत्रसंचालन विदर्ष त्रिपाठी आणि अंशरा खान यांनी केले. पाचवीतील विद्यार्थिनी राजवी रविशंकर हिने इंग्रजीतून, आठवीतील गौरी खोडके हिने मराठीतून आणि आर्यन भोगे याने हिंदीतून प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले. विद्यार्थ्यांनी राष्ट्रभक्तीपर नृत्य आणि दांडपट्टा, तलवारबाजी या मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले. मुख्याध्यापिका डॉ. बिंदू सैनी म्हणाल्या की, एकविसाव्या शतकात विकसित भारत देश सुसंस्कृत, वैभवशाली, शक्तिशाली घडविण्यासाठी पीसीईटी कटिबद्ध आहे.…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जुनी सांगवीतील अरविंद एज्युकेशन सोसायटीच्या लिटल फ्लॉवर इंग्लिश मीडियम स्कुल, भारतीय विद्यानिकेतन विद्यालय व ज्युनिअर कॉलेजमध्ये 75 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरीने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. राष्ट्रपिता महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सुवर्णपदक विजेते पै. सुमित भोसले, माजी महापौर माई ढोरे, पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य संतोष ढोरे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, संस्थेच्या अध्यक्षा आरती राव, सचिव प्रणव राव, मुख्याध्यापिका, पर्यवेक्षिका, शिक्षकवृंद, पालक, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित…

Read More