Author: maharashtrabreakingnews.com

पिंपळे गुरव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दिलासा संस्थेच्या वतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या गाडीवर काम करणाऱ्या सुनिता दिगंबर मुन्ने या महिलेचा यथोचित सन्मान शाल आणि रोख रक्कम देऊन दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी केला. ओला सुका हा कचरा विलगीकरण करू या.. पिंपरी चिंचवडला नंबर वन करू या ! या गीताची धून लावलेली कचऱ्याची गाडी रोज शहरातील कचरा गोळा करीत फिरते. आपले शहर या कष्टाळू आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कामगारांमुळे खऱ्या अर्थाने स्वच्छ राहात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुनिता मुन्ने या महिला कामगार ओला आणि सुका कचरा विलग करून आमच्याकडे द्या असे हसतमुख होऊन सांगत नागरिकांचे प्रबोधन…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील यशवंतराव चव्हाण कन्या शाळेत महिला दिनानिमित्त महिला पालकांची पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये प्रणाली मांडवीकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर विश्वता कांबळे, रिजवाना शेख यांचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक आला तसेच रेश्मा इनामदार, कोमल साळुंखे, अर्चना गायकवाड .यांना वैशिष्ट्यपूर्ण पदार्थांसाठी उत्तेजनार्थ क्रमांक देण्यात आले. महिला शिक्षकांच्या गटात अनुक्रमे राधिका भोईटे, छाया थोरात ,आरती पवार यांनी क्रमांक पटकावले., या स्पर्धेचे परीक्षण दिपाली नवले, उमा आनंदकर ,मुक्ता धोंडगे यांनी केले. याचबरोबर मुलींसाठी कर्तुत्वान स्त्रिया या विषयावर वेशभूषा स्पर्धा व चित्रकला प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्याचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संगीता…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने “जागतिक महिला दिनानिमित्त” डांगे चौक, थेरगाव येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा माजी आमदार दिप्ती चौधरी व शहराध्यक्ष डाॅ. कैलास कदम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या खालील महिलांना माता जिजाऊ पुरस्कार – श्रीमंती शकुंतला कदम, झाशीची राणी लक्ष्मीबाई पुरस्कार – ॲड. निशा चव्हाण, माता अहिल्याबाई होळकर पुरस्कार – सौ. आशा कदम, माता सावित्रीबाई फुले पुरस्कार – सौ. शारदा मुंडे, माता रमाई पुरस्कार – श्रीमती सुलोचना कांबळे, सरोजनी नायडू पुरस्कार – श्रीमती भारती घाग, स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधी पुरस्कार…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जागतिक महिला दिन हा समानतेचा आणि हक्काची व न्यायाची लढाई पुनर्जीवित करण्याचा हा दिवस महिलांना संविधानिक,सन्मान व समान संधीचा अधिकारासाठी होत असलेल्या लढाईला बळ देणारा हा दिवस म्हणून आज कष्टकरी महिलांचा सन्मान करण्यात आला .राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्षाकडून आज सन्मान करण्यात आला . राष्ट्रवादी असंघटीत कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष ,कामगार नेते काशिनाथ नखाते, प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने,नाना कसबे, सलीम डांगे, सैफुल शेख,तानाजी वाघमारे, महादेव गायकवाड आदीं उपस्थित होते. नखाते म्हणाले की, शरद पवार  यांनी महिलांच्या आर्थिक विकासासाठी दूरदृष्टीने अनेक उपाययोजना केल्या महिलांना समान संधी देण्याचे प्रयत्न केले.अर्थमंत्री असताना जयंतराव पाटिल यानी योजना केल्या. आज…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागाकडून महापालिकेच्या २५०० महिला कर्मचारी आणि शहरातील सुमारे ३० महिला पत्रकारांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये शनिवार ९ मार्च रोजी चिंचवडमधील एल्प्रो मॉलमधील आयनॉक्स थिएटरमध्ये “लापता लेडीज” चित्रपटाचे मोफत शो आयोजित करण्यात आले आहेत. महिला कर्मचारी व पत्रकार महिलांचे त्यांच्या योगदानासाठी कौतुक करणे व त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर उपक्रमामध्ये महिलांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार उपस्थित राहण्याची संधी मिळणार आहे. शनिवार, ९ मार्च रोजी सकाळी ९.३० पासून चित्रपट प्रदर्शित होणार असून दोन स्क्रिनवरती ९ शो चे आयोजन करण्यात आले…

Read More

रस्त्याच्या बदल्यात प्रतिपुर्ती करण्यास महापालिकेची चालढकल?.. भूमिपुत्रांनी प्रशासनावर व्यक्त केली नाराजी पिंपळे सौदागर (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापालिका प्रभाग २८ मधील पिंपळे सौदागर येथील लष्कर हद्दीची जागा ताब्यात दिल्यानंतरही त्याची प्रतिपुर्ती करण्यास अधिकारी चालढकल करीत आहेत. यामुळे नॅचरल आईस्कीम स्टोअर ते ट्रॉईज सोसायटी पर्यंत १८ मीटर सिमेंट रस्त्याच्या कामाला निविदा काढूनही खो बसला आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाकडे वारंवार पाठपुरावा करुन लष्कर हद्दीची जागा ताब्यात घेण्यास योगदान देणा-या भूमिपुत्रांनी पालिका प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे. कासारवाडी ते कोकणे चौक मार्गे शिवार चौक व पुढे जगताप डेअरी मार्गे पुणे, हिंजवडी आणि रावेत भागात जाणारा हा मार्ग पिंपळे सौदागर येथील मुख्य रस्ता…

Read More

महिला दिनानिमित्त मनसेकडून महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महिला कर्मचाऱ्यांनी पिंपरी चिंचवड शहर स्वच्छ ठेवत मोठे योगदान आहे.त्यांच्या या कार्याची दखल घेऊन ‘जागतिक महिला दिनाचे’ औचित्य साधून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून महिला सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी महिला सफाई कर्मचारी उपस्थित होत्या. जागतिक महिला दिन अर्थात स्त्रीत्वाचा उत्सव साजरा करण्याचा दिवस. दरवर्षी 8 मार्च रोजी हा दिवस जगभरात साजरा केला जातो.हा दिवस खास महिलांच्या समान हक्कासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो. यादिवशी महिलांसाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. राजकारणापासून विज्ञान, कला, संस्कृती आणि इतरही विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो. या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहरातील भाजप महिला पदाधिकाऱ्यांनी जागतिक महिला दिन क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मस्थळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस वंदन करून साजरा केला. यावेळी सातारा येथील भाजप प्रदेश निमंत्रित सदस्या सुवर्णा पाटील, भाजप शहराध्यक्षा रीना भणगे,  भाजप जिल्हा उपाध्यक्षा निर्मला पाटील व पिंपरी चिंचवडमधील भाजप महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. महिला दिनानिमित्त उमा खापरे यांनी राजकारणाचा प्रवास उलगडला. व महिलादिनी विचार व्यक्त केले . त्या म्हणाल्या, स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, ती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी!, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आम्ही महिला शिकलो आणि घडलो. सावित्रीबाई यांचा आदर्श डोळ्यासमोर आहे.…

Read More

पीसीसीओई मध्ये फ्रान्स मधील शैक्षणिक संधी बाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगात शैक्षणिक क्षेत्रांसह व्यवसाय व्यवस्थापन, कला, फॅशन डिझायनिंग, विज्ञान, तंत्रज्ञान क्षेत्रात देखील फ्रान्स आघाडीवर आहे. संशोधन, विकास यावर लक्ष केंद्रित केलेल्या उच्च दर्जाचे शिक्षण देणाऱ्या अनेक प्रसिद्ध शिक्षण संस्था, विद्यापीठे फ्रान्स देशात आहेत. एवढेच नाही तर फ्रान्स मधील ७३ संशोधकांनी नोबेल पारितोषिकावर आपले नाव कोरले आहे. भारत देशासह  जगभरातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण आणि संशोधन च्या उज्ज्वल संधी आहेत असे प्रतिपादन वैज्ञानिक आणि शिक्षण तज्ज्ञ संचालक डॉ. फिलिप मॉरीन यांनी केले.   पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) निगडी येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मध्ये मुंबईतील फ्रान्स…

Read More

जागतिक महिलादिनानिमित्त विशेष मुलाखती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – समस्त महिला वर्गांना जागतिक महिला दिनांच्या शुभेच्छा ! आंतरराष्ट्रीय महिला दिन हा 8 मार्चला जगभरात साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सांस्कृतिक, राजकीय व सामाजिक कामगिरीच्या स्मरणार्थ दरवर्षी साजरा केला जाणारा दिवस आहे. जगभरातील सर्व महिलांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. अशा परिस्थितीत प्रत्येक स्त्रीला सन्मान देणे आणि त्यांचे महत्त्व समजून घेणे ही प्रत्येकाची जबाबदारी बनते. महिला कोणत्याही बाबतीत मागे नाहीत. त्यांनी प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे. प्रत्येक ठिकाणी महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत. समाजाच्या प्रगतीत पुरुषांइतकाच महिलांचाही वाटा आहे, पण तरीही अनेक…

Read More