- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – इंटर इंजीनियरिंग डिप्लोमा स्टुडन्ट स्पोर्ट्स असोसिएशन इंटर झोनलच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निकच्या मुलांच्या संघावर नारायणगाव, कुरण येथील जयहिंद पॉलीटेक्निक संघाने १४ धावांनी विजय मिळवला. संघ प्रमुख वरद सराफ, जय तारक, जय शर्मा यांच्या अष्टपैलू खेळामुळे हे यश मिळाले. अंतिम सामन्यात गोलंदाज मयूर धांडे, वरद सराफ यांनी प्रत्येकी दोन गडी बाद करून उत्कृष्ट गोलंदाजी केली. वाघोली येथील भिवराबाई सावंत पॉलिटेक्निक येथे आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेत डी १ झोन मधील पॉलिटेक्निकच्या १४ संघांनी सहभाग घेतला होता. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक (पीसीपी) संघाला संघ…
पन्नास हजार हरकती आलेला डीपी रद्द करावा – भाऊसाहेब भोईर पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत प्रशासन काळात झालेल्या मोठ्या प्रकल्पांची प्राधान्याने चौकशी करावी. ५० हजार नागरिकांच्या हरकती येत असतील तर डीपी रद्द करावा. रस्ते लहान करणारा हरित सेतू प्रकल्प रद्द करा. प्रशासनाने अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी, पाणी गळती आणि चोरी रोखण्यासाठी काय केले याची माहिती द्या. या मागण्यांसह महापौर रवी लांडगे यांनी पाणी पुरवठा २४ तास सुरू करू असे सांगितले आहे. त्यांच्या मताशी मी सहमत आहे. मी विरोधी पक्षनेता असलो तरी विरोधाला विरोध करणार नाही. तर सत्ताधारी आणि विरोधक, नागरिक यांच्यामध्ये समन्वयक म्हणून काम करणार असल्याचे…
पिंपरीत भाजपतर्फे “महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर व पक्षनेते प्रशांत शितोळे यांचा सत्कार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)-पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर, शहराच्या वैभवात भर टाकण्यासाठी आणि विकासाची गंगा घराघरांत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी सज्ज झाली आहे. नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर आणि सभागृह नेते प्रशांत शितोळे यांचा आज मोरवाडी येथील भाजपा शहर मध्यवर्ती कार्यालयात जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने जंगी सत्कार करण्यात आला. हा सोहळा केवळ सत्काराचा नसून, आगामी पाच वर्षांच्या ‘विकास पर्वाचा’ शंखनाद ठरला आहे. शहराध्यक्ष शत्रुघ्न (बापू) काटे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला माजी खासदार अमर साबळे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, संघटन सरचिटणीस मोरेश्वर…
रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयात युवा उद्यम अभियान संपन्न पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘गरज आणि संधी यांच्या समन्वयातून उत्तम उद्योजक घडतो!’ असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय सल्लागार आणि महाराष्ट्र इकॉनॉमिक्स डेव्हलपमेंट कौन्सिलचे उपाध्यक्ष सचिन ईटकर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी येथे (सोमवार, दिनांक ०९ फेब्रुवारी) व्यक्त केले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या युवा उद्यम अभियान उपक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सचिन ईटकर बोलत होते. प्राचार्य डॉ. पांडुरंग भोसले अध्यक्षस्थानी होते; तसेच दे आसरा फाउंडेशनच्या मनीषा गोखले – तपस्वी, अमेरिकास्थित गर्जे मराठीचे संस्थापक आनंद गानू, महाराष्ट्र विभागप्रमुख माधव दाबके, बाबा भारती प्रतिष्ठानचे अध्यक्ष महेंद्र भारती, हृषीकेश भिडे, प्रा. डॉ. सुहास निंबाळकर,…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील १३ पंचायत समित्यांसाठी झालेल्या निवडणुकांनंतर मतमोजणीला सोमवारी सकाळपासून सुरुवात झाली असून जिल्ह्याचे राजकीय चित्र स्पष्ट होऊ लागले आहे. यंदा तब्बल ६८.३५ टक्के मतदान झाल्याने ही निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची ठरली. सुरुवातीच्या कलांनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने स्पष्ट आघाडी घेतली असून अनेक तालुक्यांत पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत. भाजप दुसऱ्या क्रमांकावर असून काही ठिकाणी महत्त्वाच्या जागा जिंकल्या आहेत. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट)नेही खाते उघडत स्थानिक पातळीवर आपली ताकद दाखवली आहे. मात्र, अद्याप काँग्रेसला एकही जागा मिळालेली नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तालुकानिहाय विजयी उमेदवार १ ) जुन्नर : ४ राष्ट्रवादी डिंगोरे: सोनाबाई दाभाडे: (राष्ट्रवादी)…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महापौर पदाच्या शुभेच्छा देताना कुणीही हार, पुष्पगुच्छ अथवा अन्य भेटवस्तू घेऊन येऊ नयेत. त्याऐवजी द्यावयाच्याच असल्यास महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य म्हणून उपयोगी ठरेल अशी पुस्तके, वह्या, लेखन साहित्य किंवा अन्य शैक्षणिक वस्तू शुभेच्छा अथवा भेटीच्या वेळी आणाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे यांनी केले आहे. महापौर रवी लांडगे हे नुकतेच दोन दिवसीय वरिष्ठ नेत्यांच्या भेटी व दौऱ्यावर होते. या कालावधीत शहरातील नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटी घेता न आल्याबद्दल त्यांनी नागरिकांची दिलगिरी देखील व्यक्त केली. हार-पुष्पगुच्छ क्षणिक सन्मानाचे प्रतीक असले, तरी विद्यार्थ्यांसाठी दिलेले शैक्षणिक साहित्य त्यांच्या शिक्षणासाठी व भविष्यासाठी अधिक उपयुक्त ठरते, असे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशभरातील आणि राज्यातील कामगारांना देशोधडीला लावणाऱ्या ४ श्रमसंहिता नोव्हेंबर महिन्यात केंद्र सरकारने लागू केल्या आहेत. हा कामगार वर्गावर फार मोठा हल्ला असून कामगारांचे कामाचे तास ८ तासावरून १२ करण्यात आलेले आहेत. याला विरोध करण्यासाठी पिंपरी चिंचवडसह पुणे जिल्ह्यातील कामगारांनी १२ फेब्रुवारी २०२६ च्या देशव्यापी संपात सहभागी व्हावे असे मत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. कर्मचारी संघटना कृती समिती महाराष्ट्र, कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, कष्टकरी रिक्षा- टॅक्सी महासंघ, कामगार कामगार महासंघ तर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये आज निर्णय घेण्यात आला. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष राजेश माने, मनपा समिती सदस्य किरण साडेकर, सदस्य राजू बिराजदार,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कामगार सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत काम करत होते, कामगारांना कुठलाही अधिकार प्राप्त होत नव्हता अशा १८९७ च्या कालावधीमध्ये नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगारांना एकत्रित केले आणि १० हजार मिल मजदूरांची सभा घेऊन त्यांना हक्क मिळवून देण्याचे काम केले. कामगारांचा भारतातील पहिला वाली म्हणजे नारायण मेघाजी लोखंडे होते, असे मत महाराष्ट्र कामगार कामगार साहित्य परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले यांनी आज व्यक्त केले. कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र, रिक्षा -टॅक्सी महासंघ यांच्यावतीने आज रावबहादूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त थरमॅक्स चौक चिंचवड येथील महासंघाचे प्रांगणात कामगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते तर…
पुनावळेतील “७ प्लुमेरिया ड्राइव्ह” सोसायटीत ५७५ किलोवॅट सौर प्रकल्पाचे लोकार्पण आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हरित ऊर्जेचा विकासमार्ग मजबूत पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवडमध्ये शाश्वत विकास आणि पर्यावरणपूरक धोरणांना प्राधान्य देत आमदार शंकर जगताप यांच्या नेतृत्वाखाली हरित ऊर्जेकडे वाटचाल अधिक गतिमान होत. याच पार्श्वभूमीवर पुनावळे येथील ७ प्लुमेरिया ड्राइव्ह गृहनिर्माण सोसायटीत उभारण्यात आलेल्या ५७५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण रविवारी (दि ८) रोजी करण्यात आले. ऊर्जा स्वयंपूर्णतेच्या दिशेने हे ठोस पाऊल टाकण्यात आले आहे असेही आमदार जगताप यावेळी म्हणाले. चिंचवड मतदार संघातील ७ प्लुमेरिया ड्राईव्ह या गृहनिर्माण सोसायटीत उभारण्यात आलेल्या ५७५ किलोवॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाचे लोकार्पण…
मावळ, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सलग 20 वर्षे भाजपच्या ताब्यात असलेल्या मावळ पंचायत समितीवर पुन्हा झेंडा फडकवण्यासाठी मावळ भाजपने कंबर कसली होती, तर विधानसभेतील सलग दोन वेळा झालेल्या विजयानंतर मावळ पंचायत समितीवर झेंडा लावण्यासाठी राष्ट्रवादीने ताकद लावली होती. त्यामुळे आता मावळ पंचायत समितीवर कोणाचा झेंडा फडकणार याची उत्सुकता मावळवासीयांना लागली आहे. मावळ पंचायत समितीमध्ये सन 1992 मध्ये काँग्रेस पक्ष आणि भारतीय जनता पार्टी या दोन पक्षांमध्ये समसमान बलाबल झाल्याने चिठ्ठीद्वारे सभापती व उपसभापती निवडणूक घेण्यात आली होती. त्यावेळी सभापतिपदी भाजपचे एकनाथ तिळे व उपसभापतिपदी भाजपच्या रुपलेखा ढोरे यांची चिठ्ठी निघाली आणि मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता आली होती. त्यानंतरच्या पाच…
