- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील भव्य राम मंदिरात रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली. तेव्हापासून अयोध्येत रामभक्तांची रीघ लागली आहे. शनिवारी (दि. १०) भाजपाच्यावतीने मावळ लोकसभा मतदारसंघ अंतर्गत चिंचवड विधानसभा मतदारसंघातील ४०० रामभक्तांना घेऊन रेल्वे अयोध्येकडे रवाना करण्यात आली. यावेळी पिंपरी-चिंचवड ते लोणावळापर्यंत ‘राममय’ झाले होते. ‘प्रभू श्री राम की जय’, ‘जय श्री राम’ अशा घोषणा देत चिंचवड मतदारसंघातील नागरिक रेल्वेद्वारे अयोध्येला रवाना झाले. भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी भगवा झेंडा दाखवल्यानंतर रामभक्त अयोध्येकडे मार्गस्थ झाले. यावेळी भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप म्हणाले, “देशात मोदी सरकार आल्यामुळेच राम मंदिराचे स्वप्न साकार झाले. २००८ आणि २०११ साली प्रभू श्रीराम…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी शहरातील प्रत्येक नागरिकांपर्यंत केंद्र व राज्य या दोन्ही सरकारने केलेली कामे पोहोचवण्यासाठी ४ फेब्रुवारीपासून शहरात “घर चलो अभियान” राबविण्यात येत असून, या अभियानाला पिंपरी चिंचवड शहरवासियांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभत आहे. भाजपा पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या नेतृत्वात हे यशस्वी आभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत भाजपाचे पिंपरी चिंचवड शहर सचिव व महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे त्यांच्याकडील वारियर्स म्हणून सोपविलेले चिंचवड मधील काकडे पार्क,केशवनगर, राज पार्क,काकडे टाऊन शिप, पोदार शाळा आदी भागातील बूथ क्रमांक 139,140,141 , बूथ वरील नागरिकांशी संवाद साधला.दोन दिवसात केशवनगर,विवेक वसाहत,राजपार्क, काकडे टाऊन…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आळंदीत बंकटस्वामी सदनाचे लोकार्पण आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – येथील वारकरी शिक्षण संस्थेचे कार्य बघून मनाला समाधान होते. मानव समाजाला प्रेरणा देणाऱ्या भागवत धर्माची पताका फडकत ठेवण्याचे कार्य जोग महाराज संस्थांपित वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून केले जात आहे आळंदीत येथील संस्थेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांकडून भारतीय सांस्कृतिक विचार लाखो लोकां पर्यंत दिला जातो.संस्थेच्या माध्यमातून भारतीय संस्कृती आणि आपला विचार जनसामान्यांपर्यंत देण्याचे कार्य केले जाते. सर्व प्रकारच्या वेदांना मुठमाती देत ‘विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम,अमंगळ’ हा ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा विचार या संस्थेने दिला आहे. संस्थेला १०० वर्षांची परंपरा असून ती वृद्धींगत…
आळंदी ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उत्तरप्रदेश मध्ये शिवाजी महाराज यांचे लष्कर सामर्थ्यावर भव्य संग्रहालय निर्माण कार्य होत असल्याचे उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथजी यांनी येथे सांगितले. आळंदी येथे प पू. गोविंददेव गिरी महाराज यांच्या ७५ व्या वाढदिवसा निमित्त गीताभक्ती अमृत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने रविवारी ( दि.११ ) उत्तर प्रदेश चे मुख्यमंत्री योगी आदित्य नाथ यांचे आळंदी मध्ये आगमन झाले होते. त्यांनी प्रथम संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी चे दर्शन घेतले.व पूजन केले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांनी सिद्धेश्वर मंदिरात सिद्धेश्वराचे दर्शन घेतले. तत्पूर्वी माऊलींचे दर्शन घेतले. यावेळी आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त राजेंद्र उमाप,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – तिसर्या वाको आंतरराष्ट्रीय किकबॉक्सिंग स्पर्धेत भारत देशाच्या स्मिता वाल्हेकर हिने दोन प्रकार प्रथम क्रमांक मिळवित दुहेरी सुवर्णपदक जिंकले. स्पर्धेत जगभरातील 20 देशांतील 1 हजार 500 स्पर्धकांनी सहभाग घेतला. ही स्पर्धा 7 ते 11 फेब्रुवारी 2024 दरम्यान दिल्ली येथील इंदिरा गांधी स्पोट्स कॉप्लेक्स येथे झाली. स्मिता वाल्हेकर हिने 70 किलोखालील वजनी गटात पॉईट फाईट व लाईट कॉन्टॅक्ट या दोन प्रकारामध्ये विजय मिळवीत सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच, मेघा गावडे हिने 55 किलोखालील वजनी गटात पॉइंट फाईट प्रमारात सुवर्ण पदक, पूजा वाल्हेकर हिने 60 किलो वजनी गटात फुल कॉन्टॅक्ट प्रकारामध्ये सुवर्णपदक प्राप्त केले. तसेच, आर्या अंबारे हिला…
मातंग साहित्य परिषद, पुणेतर्फे दुसऱ्या मातंगऋषी साहित्य संमेलनाचे आयोजन पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एक काळ असा होता त्या काळी आपला देश जगाला अन्न, आयुर्वेद औषधाचा पुरवठा करीत होता. समाजातील वाईट चालीरिती दूर सारून समाजातील चांगले ते स्वीकारले पाहिजे. प्राचीन परंपरेमध्ये ज्ञान, विज्ञान भरभरून आहे. मेकॉलेचा चष्मा काढून समाजाकडे पाहिले पाहिजे. साहित्य संमेलने केवळ कविसंमेलने, पुस्तक प्रकाशनासाठी नाहीत तर अशा संमेलनांच्या माध्यमातून इतिहासाकडे नजर टाकून भविष्याकडे वाटचाल करायची आहे. याची सुरुवात अयोध्येतील राम मंदिराच्या उभारणीतून झाली असून आता राष्ट्रमंदिराची, भेद विरहित समाज उभा करायचा आहे. याचा पाया मातंगऋषी संमेलनाच्या माध्यमातून रचला गेला आहे, असे गौरवाद्गार संमेलनाध्यक्ष, पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी काढलेत.…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील उन्नती सोशल फाऊंडेशन द्वारे फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ.कुंदा संजय भिसे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने , पिंपळे सौदागर आणि परिसरातील सर्व रहिवाशी सोसायटी / कॉलनी यांच्यासाठी भव्य हाफ पिच क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते . स्व.बाळासाहेब कुंजीर क्क्रीडांगण , पिंपळे सौदागर येथे महिला आणि पुरुष अश्या दोन्ही गटांमध्ये ही स्पर्धा खेळवली गेली . दि. ४ फेब्रुवारी रोजी या स्पर्धेचा शुभारंभ चिंचवड विधानसभेच्या आमदार अश्विनी जगताप यांच्या शुभहस्ते झाला. दि. ९ फेब्रुवारी रोजी स्पर्धेची बक्षीस वितरणाने सांगता झाली . बक्षीस वितरण समारंभ पिंपरी चिंचवड भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते संपन्न झाला. उन्नती चषक महिला विभागात…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विद्यार्थ्यांनी पारंपारिक शिक्षणाबरोबर कुठली तरी एक कला आत्मसात केली पाहिजे. कारण, कला ही माणसाला सामाजिकरित्या जिवंत ठेवते. कलेच्या सहवासामुळे खऱ्या अर्थाने माणूस घडतो आणि त्याला दैनंदिन कामाव्यतिरिक्त एक आनंदी जीवन जगण्याची प्रेरणा व संधी प्राप्त होते, असे मत सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने मांडले. ती एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठाच्या सहाव्या ‘पर्सोना फेस्ट-२४’ च्या उद्घाटनात बोलत होती. याप्रसंगी, सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू, ‘एमआयटी एडीटी’ विद्यापीठाचे कार्याध्यक्ष व कुलगुरू प्रा.डाॅ.मंगेश कराड, एमआयटी ‘मिटकाॅम’च्या कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनिता कराड, प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, डाॅ.रामचंद्र पुजेरी, डाॅ.मोहित दुबे, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.विरेंद्र शेटे, डाॅ.रजनीशकौर सचदेव-बेदी, डाॅ.नचिकेत ठाकूर,…
– तीन संस्थांना दहा लाखाची मदत; एएनपी कर फाऊंडेशनला डायलिसिस मशीन पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) — ‘सिंधी प्रीमिअर लीग’च्या पाचव्या पर्वाचे भारतीय क्रिकेटपटू केदार जाधव याच्या उपस्थितीत शानदार उद्घाटन झाले. सिंधी समाजातील तरुणांना खेळांसाठी प्रोत्साहन देण्यासह सिंधी संस्कृतीचे जतन आणि सामाजिक भावनेतून सेवाभावी संस्थांना मदत करण्याच्या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून ही क्रिकेट स्पर्धा होत आहे. यंदा सिंधी प्रीमियर लीगच्या वतीने एएनपी केअर फाऊंडेशनला साडेसात लाखाचे डायलिसिस मशीन, सिंधुताई सपकाळ यांच्या ममता बाल सदनला दीड लाख, तर जागृती स्कुल फॉर ब्लाईंड गर्ल्स संस्थेला ५० हजार रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. येत्या २ मार्चपर्यंत होणार असलेल्या या क्रिकेट स्पर्धेचा उद्घाटन सोहळा…
भाजपतर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांना पुण्यतिथी निमित्त आदरांजली पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सेवा, सुशासन आणि विकास यातून ‘अंत्योदय’ संकल्प साकारण्यासाठी पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी दिलेली मूल्ये आपल्या कर्तव्याचा मार्ग बनून मार्गदर्शन करतात. त्यांचे कार्य नेहमीच आदर्शवत ठरणारे आहे, असे प्रतिपादन पिंपरी चिंचवड शहर (जिल्हा) अध्यक्ष शंकर जगताप यांनी केले. अखंड मानवतावादाचे प्रणेते आणि कुशल संघटक आदरणीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप पक्ष कार्यालयात रविवारी आदरांजली अर्पण करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी, वरिष्ठ उपाध्यक्ष तथा प्रवक्ते राजू दुर्गे, सरचिटणीस शीतल शिंदे, अजय पाताडे, मंडल अध्यक्ष प्रसाद कस्पटे, संदीप नखाते, निलेश अष्टेकर, माजी नगरसेवक मोरेश्वर…
