Author: maharashtrabreakingnews.com

महापालिकेच्या विविध शाळांमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी महापौर,आयुक्त यांचे समवेत महापालिकेचे अधिकारी करणार विद्यार्थ्यांचे स्वागत; पाठ्यपुस्तकांचे वाटपही होणार पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत येणाऱ्या सर्व शाळा सोमवार, दि. १५ जून २०२६ पासून पुन्हा सुरू होणार असून नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणामध्ये स्वागत करण्यासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. विशेषतः इयत्ता पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्याच दिवशी सर्व महापालिका शाळांमध्ये ‘शाळा प्रवेश उत्सव’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. शाळा प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने महापौर रवि लांडगे,आयुक्त डाॅ.विजय सुर्यवंशी यांच्यासह पदाधिकारी,नगरसदस्य अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त विविध शाळांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत. यावेळी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासाची…

Read More

‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असं गाव होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीक्षेत्र भीमाशंकर परिसराचा धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या शाश्वत विकास साधण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या ‘भीमाशंकर हेरिटेज वाडी’ प्रकल्पाच्या जागेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी प्रकल्पाचा आराखडा, पुनर्वसन प्रक्रिया तसेच स्थानिकांसाठी प्रस्तावित सुविधांची याबाबतची माहिती त्यांनी घेतली. ‘हेरिटेज वाडी’ पाहण्यासाठी पर्यटक येतील असं गाव होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या समवेत आमदार दिलीप वळसे-पाटील, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, वन विभागाचे अधिकारी तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पाहणीदरम्यान प्रकल्पातील विविध घटक, पुनर्वसन प्रक्रिया,…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी यांना पर्यावरण संवर्धन व शाश्वत विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘प्लॅटिनम सस्टेनेबल कॅम्पस पार्टनर’ हा मानाचा बहुमान प्रदान करण्यात आला आहे. हा सन्मान रिसर्च हाइट्स फाउंडेशन व एन्व्हायर्नमेंट प्रोटेक्शन ट्रेनिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट (EPTRI) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारत एन्व्हायर्नमेंट प्रोग्राम – भारत सस्टेनेबिलिटी कॅम्पस मिशन २०२६’ अंतर्गत प्रदान करण्यात आला. जागतिक पृथ्वी सप्ताह (२२ ते २९ एप्रिल २०२६) निमित्त हैदराबाद येथील ग्लोबल पीस ऑडिटोरियम येथे आयोजित विशेष कार्यक्रमात महाविद्यालयाच्या वतीने डॉ. अशोक मोरे, डॉ. स्वाती जाधव आणि डॉ. सुहास पाटील यांनी सहभाग नोंदवून संस्थेच्या वतीने प्रमाणपत्र स्वीकारले. महाविद्यालयाने कॅम्पस…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून चालू आर्थिक वर्ष २०२६-२७ मध्ये मालमत्ता कर संकलन मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, मालमत्ता करावरील १० टक्के सवलतीचा लाभ घेण्यासाठी आता अवघे २० दिवस शिल्लक राहिले आहेत. ३० जून २०२६ पूर्वी ऑनलाइन मालमत्ता कर भरणाऱ्या मालमत्ताधारकांना सामान्य करावर १० टक्के सवलत देण्यात येत आहे. अद्याप ज्या मालमत्ताधारकांनी आपला मालमत्ता कर भरला नाही, त्यांनी तो तात्काळ भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. महापालिकेकडून ३० जून २०२६ पूर्वी मालमत्ता कर भरणाऱ्या नागरिकांसाठी विविध सवलती लागू करण्यात आल्या आहेत. विशेषतः ऑनलाइन माध्यमातून कर भरणाऱ्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने वर्षभर विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. या स्पर्धांमध्ये हजारो खेळाडू उत्साहाने सहभागी होत असतात. मात्र, खेळादरम्यान अनेकदा खेळाडूंना गंभीर दुखापतींना सामोरे जावे लागते. अशा वेळी उपचारांचा आर्थिक भार खेळाडू व त्यांच्या कुटुंबीयांवर पडतो. ही बाब लक्षात घेऊन महानगरपालिका प्रशासनाने सर्व सहभागी खेळाडूंना दुखापत विमा संरक्षण द्यावे, अशी मागणी भाजपा क्रीडा शहराध्यक्ष अरुण पाडुळे यांनी क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीचे सभापती कैलास कुटे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी विरोधी पक्षनेतेभाऊसाहेब भोईर, माजी क्रीडा समिती सभापती व नगरसेवक प्रा. उत्तम केंदळे, नगरसेवक निलेश नेवाळे, शाम जगताप, सामाजिक कार्यकर्ते सचिन सानप आदी मान्यवर…

Read More

इराण-इस्रायल युद्धबंदीच्या हालचाली; जागतिक शांततेसाठी भारताची डिप्लोमसी यशस्वी ठरल्याचा कामगारनेते यशवंतभाऊ भोसले यांचा दावा पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- गेल्या काही दिवसांपासून आखाती देशात सुरू असलेल्या इराण आणि इस्रायल युद्धाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषद घेऊन दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीबाबत सकारात्मक करार होत असल्याची घोषणा केली आहे. या घोषणेमुळे जागतिक स्तरावर सुटकेचा श्वास घेतला जात असून, या युद्धात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत देश आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्देगिरीचा (डिप्लोमसी) मोठा वाटा राहिला आहे.तसेच राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष तथा कामगार नेते यशवंतभाऊ भोसले यांनी जागतिक शांतता कराराचे स्वागत केले असल्याची माहिती त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना…

Read More

– मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्याचा गौरव – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा सक्रीय पुढाकार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यपूर्ती निमित्त भारतीय जनता पक्षातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. “१२ वर्षे सेवा, सुशासन आणि गरीब कल्याणाची” या संकल्पनेला जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत निगडी परिसरात विकासकामांची पाहणी, स्वच्छता अभियान आणि विशेष जनसंपर्क अभियान राबविण्यात आले. गुरूवारी, दि.११ जून रोजी सकाळी ९.३० वाजता निगडी बस स्टॉप आणि भक्ती शक्ती मेट्रो स्टेशन येथे सुरू असलेल्या विविध विकासकामांना आमदार महेशदादा लांडगे यांनी भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – केंद्र शासनाच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयांतर्गत प्रशिक्षण महासंचालनालय (डीजीटी) यांनी देशभरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांचे (आयटीआय) श्रेणीकरण (ग्रेडिंग) जाहीर केले असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी येथील औद्योगिक प्रशिक्षण विभागाने (आयटीआय) उत्कृष्ट कामगिरीची परंपरा कायम राखत देशपातळीवर मानाचे स्थान मिळविले आहे. प्रशिक्षण महासंचालनालयाने आयटीआयद्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची गुणवत्ता, शैक्षणिक कामगिरी, प्रशिक्षण सुविधा, रोजगाराभिमुखता, संस्थात्मक व्यवस्थापन आणि विविध कार्यक्षमतेच्या निकषांच्या आधारे डेटा चलित ग्रेडिंग पद्धती लागू केली आहे. या पद्धतीनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी डीजीटी एमआयएस पोर्टलवरील माहितीच्या आधारे देशातील सर्व आयटीआयचे मूल्यमापन करण्यात आले. या ग्रेडिंगमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या मोरवाडी आयटीआयने १० पैकी ९.२ गुण प्राप्त…

Read More

ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद; पिंपळे सौदागरमध्ये स्वतंत्र विरंगुळा केंद्राची मागणी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या सदस्यांसोबत नगरसेविका अनिता संदीप काटे यांनी संवाद साधत त्यांच्या समस्या व अपेक्षा जाणून घेतल्या. ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीदरम्यान ज्येष्ठ नागरिक संघाच्या पदाधिकारी व सदस्यांनी परिसरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र विरंगुळा केंद्र सुरू करण्याची मागणी केली. तसेच परिसरातील नागरी सुविधा, सार्वजनिक समस्या आणि ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या दैनंदिन अडचणी याबाबतही त्यांनी आपली मते मांडली. ज्येष्ठ नागरिकांच्या भावना व गरजा लक्षात घेऊन नगरसेविका अनिता काटे यांनी सर्व मागण्यांचा गांभीर्याने विचार करून संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्याचे…

Read More

– तब्बल 330 अधिक ब्राह्मण दांपत्यांचे पाद्यपूजन, सन्मान व स्नेहभोजन – भाजपा आमदार महेश लांडगे यांचा धर्म, संस्कृती परंपरा संवर्धनाचा संदेश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदू धर्मातील पवित्र अधिक मासाच्या पावन पर्वानिमित्त धर्मसंस्कृतीचे जतन, संवर्धन आणि सनातन परंपरांचा गौरव करण्याच्या उद्देशाने पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे महाराष्ट्रातील सर्वांत मोठा लक्ष्मी-नारायण पूजन सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. या भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार व भाजपाचे नेते महेश लांडगे आणि शिवांजली सखी मंचच्या प्रमुख पूजा महेश लांडगे यांच्या पुढाकारातून करण्यात आले. जय गणेश लॉन, मोशी येथे आयोजित या अध्यात्मिक सोहळ्यात राज्यभरातून आलेल्या तब्बल 330 अधिक ब्राह्मण दांपत्यांचे विधिवत पाद्यपूजन, लक्ष्मी-नारायण…

Read More