- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
काळेवाडी परिसरात संजोग वाघेरे यांना जोरदार प्रतिसाद ! ज्येष्ठ नागरिकांनी दिला विजयाचा आशीर्वाद… पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभेच्या विकासासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. तुम्ही मला एकदा संधी द्या, मावळचा लोकसभेचा कायापालट करून दाखवू, असे विनम्र आवाहन करत मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी काळेवाडी परिसरात प्रचार दौ-यात केले. काळेवाडीतील तापकीरनगर, ज्योतीबानगर, विजयनगर, नढेनगर आणि कोकणेनगर परिसरातील मतदारांशी त्यांनी संवाद साधला. अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नागरिकांच्या गाठीभेटी घेत निघालेल्या संजोग वाघेरे पाटील हे सर्वांचीच आस्थेने तसेच, विनम्रपणे विचारपूस करीत होते. त्यांनी ज्येष्ठ नागरिकांचे आशीर्वाद घेतले.…
शाहूनगर , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शाहूनगर (चिंचवड) येथील श्री. शाहू वाचनालयाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी निवृत्त मुख्याध्यापक अधाटे गुरुजी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. वाचनालयाचे अध्यक्ष बालकिशन मुत्याल, सल्लागार सोमनाथ कुईटे, रवींद्र पाटील आदिंची प्रमुख उपस्थिती होती. अधाटे गुरुजी यांनी बाबाहेबांच्या जीवनातील प्रसंग सांगून भारताच्या संविधान निर्मिती साठी दिलेल्या योगदानाची महती सांगितली. उपेक्षितांच्या साठी मोलाचे कार्य करताना , स्वातंत्र्य-समता-बंधुता या त्रिसूत्री साठी आंबेडकरांनी केलेल्या कार्याविषयी उपस्थितांना अवगत केले. मनीषा पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र अडसूळ यांनी आभार प्रदर्शन केले.
आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीवर चंदन उटी तून श्री’चे राजबिंडे रूप शिंदेशाही पगडी अवतारातील वैभवी रूप अभिजित धोंडफळे आणि सहकारी यांनी आळंदी मंदिरात परिश्रम पूर्वक साकारले. श्रीचे लक्षवेधी रूप पाहण्यासह व श्रींचे दर्शनास भाविक नागरिकांनी मंदिरात गर्दी केली. आळंदी परिसरात श्री रामजन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा झाला. माऊली मंदिरातील प्रथा परंपरांचे पालन करीत गुढी पाडव्यापासून श्रीचे समाधीवर चंदन उटी लेप लावण्यास सुरुवात होते. राम नवमी निमित्त श्रीचे संजीवन समाधीवर आकर्षक वस्त्रालंकार, पुष्पसजावट करून श्रीचे वैभवी रूप साकारण्यात आले. श्री नर्सीव्ह सरस्वती स्वामी महाराज मंदिरात श्रीक्षेत्रापाध्ये श्रीचे पुजारी माजी नगराध्यक्ष सुरेश गांधी,सुधीर गांधी व गांधी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फाउंडेशन च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तसेच विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या सयुक्त जयंती महोत्सव निमित्त “रन फॉर भीमथोन” हि अर्ध मॅरेथॉन स्पर्धा तसेच बाल आनंद मेळावा छत्रपती संभाजी महाराज उद्यान समोर कोकणे चौक रहाटणी या ठिकाणी आयोजित केला होता. प्रमुख पाहुणे मा.खासदार श्रीरंग अप्पा बारणे, मा. नगरसेवक शत्रुघ्न काटे, मा. क्रीडा सभापती चंद्रकांत नखाते, मा. महिला बाल विकास सभापती निर्मलाताई कुटे, उन्नती फौंडेशनचे संजय भिसे, संस्थेचे संस्थापक अरुण चाबुकस्वार, संस्थेचे सेक्रेटरी संदीप चाबुकस्वार ह्यांचा हस्ते उदघाटन झाले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते राकेश नखाते, उल्हास कोकणे,डॉ. संग्राम नागणे, कैलाश कुंजीर, प्रदीप दळवी, काळुराम कवितके, राजेश भालेराव, पुरषोत्तम गाणार, अमित भालेराव, शशी जाधव, वैभव शिनगारे, मयुर ओव्हाळ, मोसीन अन्सारी , युवराज प्रगणे, शाळेच्या मुख्याध्यापिका नाजमीन शेख, उपमुख्याध्यापक सचिन कळसाईत, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. हि अर्ध मॅरेथॉन स्पर्धा छत्रपती संभाजी महाराज…
मावळ लोकसभेसाठी २३ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेल्या दहा वर्षे मावळ लोकसभेचे खासदार असतानाही त्यांना मतदारसंघात एकही नवीन प्रकल्प आणला नाही. मतदारसंघातील अनेक प्रश्न जैसे थे आहेत. देशात कामगार कायदे बदलून त्यांना देशोधडीस लावले आहे. महागाई आणि बेरोजगारी वाढली आहे. यावरून प्रचारादरम्यान लोकांकडून प्रचंड चीड व्यक्त होते. मतदार माझ्या व महाविकास आघाडीच्या पाठिशी उभा राहणार असून आपला पावणेचार लाखांच्या मताधिक्याने विजयी होईल, असा विश्वास महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांनी बुधवारी (दि.17) पत्रकार परिषदेत व्यक्त केला. महाविकास आघाडीतर्फे आकुर्डी येथे झालेल्या पत्रकार परिषदेस शिवसेना उद्धव…
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे ऑटो एक्सपो यांच्यावतीने रस्ता सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माननीय अमितेश कुमार ( IAS ) पुणे शहर पोलीस आयुक्त* यांच्या शुभहस्ते *शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2024* रोजी *सकाळी* *साडेदहा वाजता*कार्यक्रमाचे ठिकाण क्रिएट सिटी मॉल येरवडा पुणे 6 येथे ऑटो एक्सपो 2024 उद्घाटन कार्यक्रम मध्ये प्रदान करण्यात येणार आहे. राजू घाटोळे हे गेले 40 वर्ष सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल क्षेत्रामध्ये रस्ता सुरक्षा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ते पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष. तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच गाव तिथे ग्रंथालय या चळवळीत पुणे जिल्हा ग्रंथालय…
शहरातील राम मंदिरांना भेट देत बारणे यांनी साधला रामभक्तांशी संवाद खासदार बारणे यांनी स्वतःच्या हाताने वाढला महाप्रसाद चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीराम नवमीनिमित्त शहरातील विविध राम मंदिरांमध्ये जाऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेतले तसेच काम भक्तांशी संवाद साधला. सुमारे पाचशे वर्षांच्या संघर्षानंतर अयोध्येतील राम जन्मभूमी मंदिर उभारणीमुळे देशात नवचैतन्य निर्माण झाल्याच्या भावना बारणे यांनी यावेळी व्यक्त केल्या. *नवलाख उंब्रे येथील प्राचीन राम मंदिरात दर्शन* खासदार बारणे यांनी रामनवमी निमित्त मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथील प्राचीन स्वयंभू राम मंदिर, थेरगाव येथील श्रीराम-जानकी मंदिर, रहाटणी, चिंचवड व…
राजा रविवर्मा आर्ट गॅलरीत विद्यार्थ्यांच्या सर्जनशील कला सर्वांसाठी खुल्या पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव असणाऱ्या “कारी-२०२४” ला घोले रोड, शिवाजीनगर येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे मंगळवारी प्रारंभ झाला. ”कारी” म्हणजे ‘कलाकृती’, आणि चार दिवस चालणाऱ्या कला महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अप्रतिम कलाकृती सर्वांना पाहण्यासाठी खुल्या असणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलाकृती लोकांपर्यंत पोचव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते तर प्रसिद्ध वास्तुविशारद ऋषीकेश कुलकर्णी व गिरीश दोशी यांच्या प्रमुख उपस्थिती, विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राममंदीर प्रतिकृतीचे…
चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री भैरवनाथ महाराज यात्रेनिमित्त कुदळवाडी येथील श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथे मानाच्या गाड्याचे पूजन कार्यक्रम टाळगाव चिखली ग्रामस्थांच्या हस्ते भक्तिभावात पार पडला. श्री क्षेत्र टाळगाव चिखली येथील श्री भैरवनाथ महाराज यात्रा महोत्सव लवकरच सुरू होणार आहे यात्रा उत्सवानिमित्त नंदी स्वरूप बैलगाडा पूजनाचा कार्यक्रम नुकताच भक्तिभावाने पार पडला. सदर मानाचा गाडा पूजन कार्यक्रम हा यात्रा उत्सवातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. चिखली गावचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराज मंदिर येथे परंपरेनुसार विधिवत पूजन केले, याप्रसंगी स्थानिक मान्यवरांसह,यात्रा कमिटीचे सदस्य आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – निगडी, यमुनानगर येथील कै. मिनाताई ठाकरे जलतरण तलाव दुरुस्तीसाठीबंद ठेवण्यात आला आहे. त्याला एक वर्ष उलटले तरी दुरुस्तीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. आयुक्त शेखर सिंह यांनी यात लक्ष घालून हा तलाव नागरिकांसाठी खुला करावा, अशी मागणी भाजपचे चिटणीस सचिन काळभोर यांनी केली आहे. सचिन काळभोर यांनी दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की, काळभोर यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे की, सध्या उन्हाळा वाढला असून अशा वातावरणात दुपारी पोहण्याचा आनंद घेण्यासाठी नागरिक जलतरण तलावाकडे जातात. परंतु, यमुनानगर येथील कै. मिनाताई भाजपचे सचिन काळभोर यांचा आयुक्तांना प्रश्न बंद ठेवला आहे. एक वर्षापासून हा तलाव दुरुस्तीच्या नावाखाली बंद…
