रस्ता सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल राजू घाटोळे यांना पुरस्कार प्रदान
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे ऑटो एक्सपो यांच्यावतीने रस्ता सुरक्षा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल माननीय अमितेश कुमार ( IAS ) पुणे शहर पोलीस आयुक्त* यांच्या शुभहस्ते *शुक्रवार दिनांक 18 एप्रिल 2024* रोजी *सकाळी* *साडेदहा वाजता*कार्यक्रमाचे ठिकाण क्रिएट सिटी मॉल येरवडा पुणे 6 येथे ऑटो एक्सपो 2024 उद्घाटन कार्यक्रम मध्ये प्रदान करण्यात येणार आहे.
राजू घाटोळे हे गेले 40 वर्ष सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल क्षेत्रामध्ये रस्ता सुरक्षा क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत ते पुणे शहर मोटर ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष. तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत तसेच गाव तिथे ग्रंथालय या चळवळीत पुणे जिल्हा ग्रंथालय संघाचे ते कोषाध्यक्ष आहेत.
राजू घाटोळे यांनी रस्ता सुरक्षा क्षेत्रात गेल्या 40 वर्ष सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल साठी इंधन वाचवा परिसंवाद पी. सी. आर. ए मुंबई राज्यभरातील 53 आरटीओ मध्ये आयोजित केले तसेच सी.आय. आर. टी . पुणे या केंद्रीय वाहतूक संस्था यांचे मार्फत सरकारमान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल साठी ड्रायव्हिंग स्कूल ची गुणवत्ता दर्जा व कुशल वाहन चालक निर्माण करण्यासाठी व ड्रायव्हिंग स्कूलचा दर्जा अ अद्ययावत करण्यासाठी पंधराशे ड्रायव्हिंग स्कूल संचालकांसाठी तीन दिवसाचा निवासीकोर्स आयोजित करून पंधराशे ड्रायव्हिंग स्कूल संचालक व महिला संचालकांना प्रशिक्षण दिले महिलांसाठी जागतिक महिला दिनानिमित्त ब्रिजेस स्टोन कंपनीच्या सामाजिक बांधिलकीतून सी एस आर फंडातून 180 ड्रायव्हिंग स्कूल महिला संचालिका यांच्यासाठी दोन दिवसाचे प्रशिक्षण आयडीटीआर पुणे येथे आयोजित करण्यात आले तसेच” नो हॉर्न ओके प्लीज” पुणे शहरामध्ये एका दिवसात 1 कोटी हॉर्न वाजवले जातात आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर हॉर्किंग होत आहे हे कमी करण्यासाठी व रस्त्यावर 24 तास निगराणी करणाऱ्या पोलीस यंत्रणा व वाहतूक शाखा यांच्या अधिकाऱ्यांना कुठेतरी बहिरेपणा किंवा कमी ऐकू येणे अशा समस्या निर्माण होऊ लागले आहे.
राजू घाटोळे यांनी महाराष्ट्रातील पुणे शहरात विविध शाळांमध्ये 5 000 मोफत हेल्मेट चे वाटप हिरोमोटो क्रॉप कंपनी यांच्या सीएसआर फंडाकडून हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला यामध्ये दहेड इंजुरी फाउंडेशन नवी दिल्ली व सेफ इंडिया ओरिसा यांचे सहकार्य लाभले तसेच जगामध्ये रस्ते अपघातात मरण पावलेल्या वाहन चालकांसाठी त्यांचे प्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी जागतिक अपघात मरण दिन दिना निमित्त रांगोळीच्या माध्यमातून रस्ता सुरक्षा बाबतची माहिती विविध घोषवाक्यातून घेण्यासाठी पुणे शहरातील सर्व सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल च्या कार्यालयाबाहेर रांगोळी स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे करण्यात आले.
तसेच पुणे शहरातील 30 मुख्य चौकात पिंपरी चिंचवड शहरातील 15 मुख्य चौकात जागतिक अपघात मरण दिन कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित केले तसेच जागतिक कीर्तीचे रस्ता सुरक्षा विभागातील अभ्यासक यांना निमंत्रित करून भारत देशातील 15 रस्ता सुरक्षा विषयक अभ्यासकांचा राष्ट्रीय रस्ता सुरक्षा परिषदेचे आयोजन करून त्यामध्ये करण्यात आला त्याच्या व्यतिरिक्त वाहनचालक दिन रस्ता सुरक्षा सेमिनार तसेच शाळांमध्ये प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा चे ज्ञान व्हावे मोटर वाहन कायद्याची माहिती व्हावी यासाठी चार हजार विद्यार्थ्यांचा ट्रॅफिक प्रश्नमंजुषा व विविध रस्ता सुरक्षा विषयक विषयावर चित्रकला स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन यशस्वीपणे केले.
तसेच वर्ल्ड ऑटो फोरम मध्ये सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल संबंधीच्या सूचना व प्रस्ताव फोरम मध्ये मांडले त्यांनी मांडलेले विषय फोरमने स्वीकारले सरकार मान्य मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या हितासाठी सदैवते काम करत असेल गेले 40 वर्ष सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूलच्या समस्या सोडवण्यासाठी हे प्रयत्नशील आहेत आणि रस्ता सुरक्षा विषया मध्ये व त्याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असतात त्यांच्या या कार्याची दखल घेऊन पुणे ऑटो एक्सपो यांच्यावतीने यंदाचा रस्ता सुरक्षा पुरस्कार यांना प्रदान करण्यात बाबतचा निर्णय पुणे ऑटो एक्सपो संयोजन समितीने घेतला संयोजक राजन सर यांनी श्री राजू घाटोळे यांना पुरस्कार मिळवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले