- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देशातील कामगार, कष्टकरी व शेतकरी, शेतमजूरांच्या न्याय हक्क व कल्याणासाठी कटीबद्ध असल्याचे काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यातून स्पष्ट केले असल्याने लोकसभा निवडणुकीत काँग्रेस व इंडिया, महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून निवडून आणण्याचे व लोकशाही मजबूत करण्याचे आवाहन राष्ट्रीय मजदूर काँग्रेस (इंटक) संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जी. संजीवा रेड्डी यांनी आवाहन केल्याची माहिती महाराष्ट्र इंटकचे प्रदेश अध्यक्ष डॉ.कैलास कदम यांनी दिली. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुक २०२४ करिता न्याय पत्र जाहीर केले आहे त्यामध्ये श्रमिक न्याय, किसान न्याय, आर्थिक न्याय, हिस्सेदारी न्याय, युवा न्याय, नारी न्याय, संविधानिक न्याय, राज्य न्याय, रक्षा न्याय, पर्यावरण न्याय सविस्तरपणे न्यायाची गॅरंटी दिली…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने आजपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली. आज दिनांक 18 एप्रिल रोजी विहित वेळेत सुमारे 27 व्यक्तींनी आकुर्डी येथील मावळ लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयातून 49 नामनिर्देशन पत्र नेले आहेत. आज कोणत्याही उमेदवाराने नामनिर्देशन पत्र दाखल केले नाही. नामनिर्देशन पत्र नेताना नोंदवही मध्ये संबंधितांची प्राथमिक माहिती नोंदवली जात असून यामध्ये दिनांकासह नामनिर्देशन पत्र नेणाऱ्या उमेदवाराचे नाव, पत्ता, नामनिर्देशन पत्रांची संख्या, उमेदवाराच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी नामनिर्देशन पत्र घेत असल्यास त्या व्यक्तीचे नाव, राजकीय पक्षाचे नाव, भ्रमणध्वनी क्रमांक, आदी बाबींची नोंद केली जात आहे. त्यानंतर नामनिर्देशन पत्र ताब्यात घेणाऱ्याची स्वाक्षरी घेऊन…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे शहरात आणि पिंपरी चिंचवड शहरात तसेच पुणे जिल्ह्यातील ग्रामीण दुर्गम आदिवासी,अल्पभूधारक भागात कार्यरत असलेल्या वुई टुगेदर फाऊंडेशन या सेवाभावी संस्थेच्या सल्लागारपदी चिंचवड येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र महावितरण समिती सदस्य मधुकर बच्चे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या सर्व समावेशक ध्येयधोरणा अंतर्गत नागरी समस्या निवारणासाठी शासकीय प्रशासनिक विविध अधिकाऱ्यांना जनसंपर्क करावा लागतो,नागरिकांच्या विविध नागरी समस्या सोडवताना मागील तीन वर्षात मधुकर बच्चे यांनी पालिकेच्या जनसंवाद सभा,लोकशाही दिन, प्रशासकीय स्तरावर ताळमेळ साधून समस्या निवारण केलेल्या आहेत. संस्थेकडे अशा प्रकारे एक समन्वयक दुवा म्हणून मधुकर बच्चे यांनी खूप मदत केलेली आहे,त्याच बरोबर गरजू महिलांचे अडचणी…
कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू तथा कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश तु.कराड यांच्या ५८व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल १५८ दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.रामचंद्र पुजेरी यांच्या हस्ते तर कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, सहाय्यक कुलसचिव डाॅ.विशांत चेमटे, मॅनेटचे प्राचार्य कॅप्टन प्रेरित मिश्रा, डाॅ.श्रीकांत गुंजाळ, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.विशाल पाटील, प्रा.हनुमंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. याप्रसंगी बोलताना, डाॅ.पुजेरी…
पालखी सोहळा दिंडी समाज बैठकीत निर्णय १७ जुलै ला पंढरपूर आषाढी एकादशी आळंदी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार २९ जून २०२४ रोजी आषाढी वारीसाठी आळंदी मंदिरातून श्री क्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत असून पहिला मुक्काम आळंदीतील गांधी वाड्यातील दर्शनबारी मंडपात होणार आहे. यावर्षी पुणे येथे ( दि. ३० जून व १ जुलै ) व सासवड ( दि. २ व ३ जुलै ) येथे सोहळ्याचा दोन दिवस तसेच लोणंदला अडीच दिवस सोहळा मुक्कामी राहणार असल्याचा निर्णय बैठकीत झाला असल्याचे माऊलींचे पालखी सोहळा प्रमुख व देवस्थानचे विश्वस्त योगी निरंजननाथजी यांनी सांगितले. पंढरपूर येथील आळंदी देवस्थानच्या माऊली…
पिंपरी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अजैन आणि पुर्ण शाकाहारी व्यक्तींना हा पुरस्कार दिला जाणार आहे ,हा पुरस्कार भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाच्या दिवशी दिला जातो. या वर्षी डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय,औंध चे प्राचार्य डॉ अरुण आंधळे यांना शैक्षणिक क्षेत्रातील, कविराज प्रा चंद्रकांत वानखेडे यांना साहित्यिक क्षेत्रातील, ह भ प रोहीणी परांजपे यांना समाजप्रबोधन क्षेत्रातील, श्री रफीक शेख यांना समाजसेवा क्षेत्रातील,आणि श्री राजेन्द्र केरकर यांना पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल अहिंसा पुरस्कार जाहीर झाला आहे, संस्थेचे पदाधिकारी आणि प्रमुख मान्यवर यांच्या हस्ते दि २१ एप्रिल रोजी सायं ७…
कर संकलन विभागाच्या विक्रमात लोकसहभागाचा मोलाचा वाटा… पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाने मालमत्ता करवसुलीसाठी आजपर्यंत विविध उपक्रम राबविले. नागरिकांमध्ये जनजागृती होण्यासाठी विभागाने होर्डिंग, पॅम्पलेट, रिक्षातून जनजागृती, सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन आदी आघाड्यांवर काम केले. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये रील्स, मीम्स, व्हिडीओ यांच्या माध्यमातून जनजागृती केली जात असून, त्याला सर्जनशीलतेची जोडसुद्धा मिळत आहे. नागरिकांमध्ये नव्या समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणावर पगडा निर्माण झालेला आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील करदात्यांना कर भरण्याचे आवाहन करण्यासाठी विभागाने सन २०२२-२३मध्ये मीम्स स्पर्धा आयोजित केली. त्यास सोशल मीडियावर उदंड प्रतिसाद मिळाल्यानंतर, विभागाने सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात ‘रील…
चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीराम नवमी जन्मोत्सवानिमित्त शहरात काढण्यात आलेल्या विविध शोभायात्रांमध्ये मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी-मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे काल (बुधवारी) रात्री सहभागी झाले. कासारवाडी येथील विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने आयोजित शोभायात्रेत भगवा झेंडा नाचवत जल्लोषही केला. संभाजीनगर येथील ओम साई राम मंदिरात खासदार बारणे यांच्या हस्ते महाआरती झाली. श्रीमंत जगद्गुरु साईबाबा प्रतिष्ठान व कुशाग्र कदम युथ फाऊंडेशन यांच्यावतीने यावेळी खासदार बारणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी माजी महापौर मंगला कदम, योगेश बहल, कविता बहल, नारायण बहिरवाडे, अमित गोरखे, अनुराधा गोरखे, वैशाली काळभोर, प्रसाद शेट्टी, कुशाग्र कदम आदी मान्यवर उपस्थित होते.…
व्यापाऱ्यांच्या अडीअडचणींना धावून येणारे खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल – श्रीचंद आसवानी पिंपरी कॅम्पला लवकरच गावठाणाचा दर्जा – खासदार बारणे पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी कॅम्पमधील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या पिंपरी मर्चंट फेडरेशनने मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना काल (बुधवारी) रात्री एका बैठकीत जाहीर पाठिंबा दिला. व्यापारी वर्गाच्या अडीअडचणींना धावून येणाऱ्या बारणे यांना विक्रमी मताधिक्य मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पिंपरी कॅम्प येथील उबाडो पंचायत ट्रस्टच्या बी. टी. अडवाणी सभागृहात झालेल्या या बैठकीस खासदार बारणे, पिंपरी मर्चंट फेडरेशनचे अध्यक्ष श्रीचंद आसवानी, उबाडो पंचायत ट्रस्टचे…
२१ निवृत्त न्यायाधीशानीं लिहिलेल्या पत्राकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कायद्याचे रक्षक म्हणून न्यायमूर्ती शपथ घेत असतात निष्पक्षतेच्या तत्त्वानुसार योग्य त्या पुराव्यानुसार न्यायालयीन निर्णय केले जात असतात. मात्र अलीकडच्या कालावधीमध्ये काही राजकीय मंडळीकडून संकुचित आणि राजकीय हितसंबंधासह,वैयक्तिक फायद्यासाठी प्रेरित होऊन न्यायालयाच्या प्रक्रियेवर दबाव टाकत आहेत असे पत्र न्यायालयाच्या २१ निवृत्त न्यायमुर्तीनी दिल्याने न्यायव्यवस्थेवर असलेला दबाव स्पष्ट होत असून न्यायव्यवस्थेवरील दबाव हा लोकशाहीला घातक असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस असंघटित कामगार विभागाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ नखाते यांनी व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेस – शरदचंद्र पवार पक्ष, नॅशनलिस्ट ट्रेड युनीयन फेडरेशन तर्फे आज कामगार कायद्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी ते बोलत…
