Author: maharashtrabreakingnews.com

थेरगावच्या ‘होम पिच’वर बारणे यांची प्रचाराची जोरदार ‘बॅटिंग’! थेरगावमध्ये भेटीगाठी व कोपरा सभांवर बारणे यांचा भर पाऊस व अंधारातही खासदार बारणे यांचा प्रचार जोरात थेरगाव,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गेली अनेक वर्ष राजकारणात असूनही आपण कधीही सत्ता डोक्यात जाऊ दिली नाही. थेरगाव परिसराचा कायापालट करणारा व नागरिकांच्या अडीअडचणींना धावून येणारा आपला हक्काचा माणूस पुन्हा एकदा संसदेत पाठवा, असे भावनिक आवाहन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या पहिल्या फेरीची सांगता बारणे यांनी थेरगाव या स्वतःच्या गावात केली. प्रमुख पदाधिकारी व मान्यवरांच्या निवासस्थानी जाऊन भेटीगाठी घेण्याबरोबरच ठिकठिकाणी…

Read More

देशातील युवाशक्ती पंतप्रधान मोदींच्या पाठीशी – पूर्वेश सरनाईक बलशाली भारतासाठी युवकांचा पंतप्रधान मोदींना पाठिंबा – पूर्वेश सरनाईक काळेवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी महायुतीचे युवा शिलेदार आता प्रचाराच्या रणांगणात उतरले आहेत. युवकांच्या प्रश्नांची उत्तम जाण असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच लोकसभेत अभूतपूर्व बहुमतासह पुन्हा पंतप्रधान होतील, असा विश्वास युवा पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला. महायुती युवा पदाधिकाऱ्यांचा मेळावा काल (शुक्रवारी) संध्याकाळी काळेवाडी रहाटणी येथील विमल गार्डन बँक्वेट हॉलमध्ये झाला. या मेळाव्यास शिवसेना युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, प्रदेश सचिव किरण साळी, राष्ट्रवादी…

Read More

वाकड,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने सध्या पावसाळा पूर्व कामांना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर वाकड आणि परिसरातील काळाखडक, विनोदे वस्ती, भूमकर वस्ती, पारखे वस्ती, कस्पटे वस्ती भागातील पावसाळ्या पूर्वीची कामे तातडीने हाती घ्यावीत. पावसाळ्यात पाणी साठू नये अथवा तुंबू नये, यासाठी ओढे, नालेसफाई, ड्रेनेजलाइनची साफसफाई करावी. अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष श्री विशाल वाकडकर यांनी केली आहे. याबाबत त्यांनी मनपाच्या ड क्षेत्रीय कार्यालय आरोग्य विभागास निवेदन दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, आगामी काही दिवसात पावसास सुरूवात होत आहे. महापालिकेने दरवर्षी प्रमाणे वाकड आणि परिसरातील काळाखडक, विनोदे वस्ती, भूमकर वस्ती, पारखे वस्ती, कस्पटे वस्ती या…

Read More

खेड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – खेड तालुक्यातील पाईट येथील यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतींना शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील, खेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीपराव मोहिते पाटील व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी बैलगाडा मालकांशी संवाद साधला. सामाजिक, राजकीय कारकीर्दीत बैलगाडा मालकांची मला सदैव साथ मिळाली. त्यांच्या ऋणातून उतराई होणे कदापि शक्य नाही. बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यासाठी बैलगाडा मालक, शेतकरी यांच्यासोबत खांद्याला खांदा लावून लढलो, असे  शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केले.

Read More

चिखली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जाधववाडी, मोशी येथे माजी महापौर राहूल जाधव यांच्या निवासस्थानी भेट दिली. प्रसंगी माध्यमांशी संवाद साधत, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. यावेळी माजी नगरसेवक वसंत बोराटे, नगरसेवक पिंपरी चिंचवड विठ्ठल उर्फ नाना काटे, शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, शिवसेना उपनेते इरफान भाई सय्यद, शहर उपाध्यक्ष अतीश बारणे, राकाँपा ग्राहक सेल अध्यक्ष गणेश सस्ते, श्री नागेश्वर महाराज ट्रस्टचे अध्यक्ष नितीन  सस्ते पाटील, महिला शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड राकाँपा कविता आल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम अल्हाट, अपुर्व आढळराव पाटील, माजी शिक्षण मंडळाचे सदस्य विजू लोखंडे, कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी, सोसायटी चेअरमन माणिक अल्हाट, स्वयमं प्रदेशाध्यक्ष मेघाताई पवार, भैरवनाथ पदसंस्था संचालक…

Read More

ग्लोबल गांधीयन मानद डॉक्टरेट मनोज कदम, राजेंद्रसिंह वालिया यांना प्रदान पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा ग्लोबल गांधीयन मानद डॉक्टरेट प्रदान करून गौरविण्यात येत आहे. हा अभिमानाचा क्षण असून डॉक्टरेट मिळविलेल्या व्यक्तींबरोबरच समाजाचा आणि राष्ट्राचा ही गौरव आहे. गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ, कर्तव्य फाऊंडेशन यांनी विविध क्षेत्रातील कर्तव्यदक्ष व्यक्तींचा गौरव करून समाजाला नवी दिशा दिली आहे; हे कौतुकास्पद आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले.     गांधी पीस फाऊंडेशन नेपाळ, कर्तव्य फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सहावा ग्लोबल गांधीयन फिलॉसॉफी मानद डॉक्टरेट प्रदान सोहळा निगडीतील ग. दि. माडगूळकर सभागृहात शनिवारी…

Read More

*- उरण विधानसभा पदाधिकारी बैठकीस उस्फुर्त प्रतिसाद !* *- निष्ठावंत शिवसैनिकांना गद्दारी आवड नाही* उरण, (प्रतिनिधी) :- उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिक हा कडवट आणी निष्ठावंत आहे. ठाकरे कुटुंबावार प्रचंड प्रेम करणारा आहे. त्याला गद्दारी अजिबात आवडत नाही. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहण्यासाठी आपले उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना आपल्याला जास्तीत जास्त मताधिक्य द्यायचे आहे. त्यासाठी घरा घरात आपली मशाल निशाणी पोहोचवा, असे आवाहन शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी केले. मावळ लोकसभेचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ उरण विधानसभा मतदारसंघातील उरण, पनवेल आणि…

Read More

पीसीसीओईआर मध्ये राज्यस्तरीय ‘टेक्नोवेट-२०२४’ स्पर्धा संपन्न पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आजच्या स्पर्धात्मक जगात, विद्यार्थ्यांनी प्रगत शिक्षणावर आणि कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंग सारख्या साधनांच्या वापरावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. उच्च तंत्रज्ञानामुळे साधने कितीही वाढली, विकसित झाली तरी निरंतर शिक्षण हीच यशाची गुरुकिल्ली आहे असे मत डॉ. संजय तलबार यांनी व्यक्त केले.     पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड रिसर्च (पीसीसीओईआर) मध्ये ‘टेक्नोवेट-२०२४’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.    टेक्नोवेट २०२४ मध्ये विविध तंत्रज्ञानावर आधारित बीजीएमआय-व्हॅलोरंट, कॅड ओ क्रिएट, फास्ट अँड फ्यूरियस, आयपीएल लिलाव, एम यू एन, शार्क टॅंक, टेक-संगम…

Read More

– गाठी-भेटी घेत मतदारांशी साधला संवाद चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी आज, शनिवारी चिंचवड परिसरात पदयात्रा काढून प्रचार केला. ठिकठिकाणी नागरिक, ज्येष्ठ नागरिक, युवकांनी, तसेच महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केले. संजोग वाघेरे पाटील यांंनी संवाद साधत आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले. चिंचवडगावातील दर्शन नगरी, चित्तराव, गणपती मंदिर, प्रभात कॉलनी, मोरया गोसावी, राज पार्क, गोयल गरिमा, सोनेगिरा टाऊनशिप, काकडे पार्क, विवेक वसाहत, साईबाबा मंदिर, निंबाळकर आळी, भोईर आळी, तालेरा हॉस्पिटल परिसर, शिवाजी उदय मंडळ, लोंढे नगर व भीम नगर परिसरातून कार्यकर्त्यांसह मोठ्या संखेने पदयात्रा काढून…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे हे सोमवारी (22 एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यानिमित्ताने महायुतीच्या वतीने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे. खासदार बारणे हे सोमवारी सकाळी 10 वाजता आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने पीएमआरडीए कार्यालयापर्यंत जाऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित दादा पवार यांच्यासह महायुतीच्या सर्व प्रमुख नेत्यांना त्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा बनसोडे, सुनील शेळके, अश्विनी जगताप, महेंद्र थोरवे, महेश बालदी, उमा…

Read More