- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आकुर्डी खंडोबा माळ येथून भव्य मिरवणुकीने जोरदार शक्तीप्रदर्शन करीत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) उमेदवारी अर्ज दाखल केला. मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्याकडे खासदार बारणे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, भाजपचे विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री बाळा भेगडे, माजी खासदार रामशेठ ठाकूर, अमर साबळे, आमदार प्रशांत ठाकूर, अण्णा…
रिक्षा पंचायतीचा तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त उपक्रम पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिक्षाचालकांचे आरोग्य महत्त्वाचे आहे शारीरिक दृष्ट्या सुदृढ असल्यास अपघात किंवा दुर्घटना होणार नाहीत, रस्ता सुरक्षा राखली जाईल, रिक्षा पंचायतीच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये विविध ठिकाणी नेत्र तपासणी व मोफत चष्मे वाटप हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे असे मत उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी व्यक्त केले. रोटरी क्लब संभाजीनगर आणि काळेवाडी येथे या शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्वराज अभियान महाराष्ट्र अध्यक्ष मानव कांबळे, रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितिन पवार,एच व्ही देसाई रुग्णालयाचे डॉ. प्रवीण नरवाडकर,कामगार नेते काशिनाथ नखाते,रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष गिरमे, परिवहन अधिकारी मनोज…
मोशी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील माजी सरपंच व माजी पंचायत समिती सदस्य हरिभाऊ सस्ते यांच्या निवासस्थानी भेट दिली. सस्ते परिवाराने आत्मियतेने स्वागत केले. यावेळी ट्रस्टचे माजी नगरसेवक वसंत बोराटे,शहराध्यक्ष अजित भाऊ गव्हाणे, माथाडी कामगार अध्यक्ष शिवसेना इरफान भाई सय्यद, शहर उपाध्यक्ष भोसरी विधानसभा अतीश बारणे, गाडा मालक अध्यक्ष गणेश सस्ते, ट्रस्टचे अध्यक्ष नितीन दादा सस्ते पाटील, शहराध्यक्ष पिंपरी चिंचवड राकापा कविता अल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम अल्हाट, माजी शिक्षण मंडळाचे सदस्य विजू लोखंडे, कुस्तीगीर संघ अध्यक्ष पंडित मोकाशी, सोसायटी चेअरमन माणिक अल्हाट, स्वयमं प्रदेशाध्यक्ष मेघा पवार,उपाध्यक्ष राकापा रवींद्र सोनवणे उद्योजक प्रकाश अल्हाट, उद्योजक संतोष सस्ते, सामाजिक कार्यकर्ते राघू…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंबेगाव तालुक्यातील आदर्शगाव असणाऱ्या भागडी, येथे पुष्प वर्षाव करुन गावात जोरदार स्वागत केले. यावेळी वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. गावातील पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी उत्सफुर्तपणे स्वागत सत्कार केले. यावेळी गावातील सर्वानी संपुर्ण गाव माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहील याची ग्वाही दिली. यावेळी भिमाशंकर कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे सदस्य विवेक वळसे पाटील, शिवसेना गटनेते जिल्हा परिषद पुणे देविदास दरेकर, उपाध्यक्ष जिल्हा परिषद अरुण गिरे, सुनिल बाणखेले, तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस विष्णू काका हिंगे, पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, उद्योजक संतोष डोके, कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आंबेगाव निलेश थोरात, युवासेना जिल्हाप्रमुख प्रविण थोरात, युवासेना राष्ट्रिय कार्यकारीणी सदस्य…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) “बालसाहित्यातून मुलांचे भावविश्व साकार व्हायला हवे!” असे मत साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कारविजेते साहित्यिक एकनाथ आव्हाड यांनी शांता शेळके सभागृह, निगडी प्राधिकरण येथे व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी – चिंचवड शाखा आणि अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात रश्मी गुजराथी आणि सीमा गांधी यांनी मुलाखतीच्या माध्यमातून एकनाथ आव्हाड यांच्याशी सुसंवाद साधला. ज्येष्ठ साहित्यिक विनीता ऐनापुरे अध्यक्षस्थानी होत्या. शिक्षकी पेशातील एकनाथ आव्हाड यांचा सविता पटेकर नावाच्या विद्यार्थिनीवर लिहिलेली पहिली कविता ते दिल्ली येथील भारत सरकाराच्या साहित्य अकादमीच्या बालसाहित्यातील पुरस्कारापर्यंतचा ‘दापूर ते दिल्ली’ हा लेखनप्रवास सुसंवादाच्या माध्यमातून उलगडत गेला. विद्यार्थी मित्रांना समोर ठेवून…
जागतिक पुस्तक दिनानिमित्त श्री नेरकर यांना ग्रंथसेवा पुरस्कार पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)”आयुष्यात अनेक संकटे येतात, अगदी जवळची माणसे दुरावतात, मात्र पुस्तके आयुष्यभर सोबत करतात. पुस्तकांमधूनच समृद्ध जीवन जगण्याचा संस्कार घडतो, त्यासाठी पुस्तकांची मैत्री केली पाहिजे.” असे प्रतिपादन पद्मश्री गिरीश प्रभुणे यांनी केले. जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने, कलारंजन प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक नंदकुमार मुरडे, ग्रंथसेवक जगन्नाथ नेरकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत चौगुले आदी मान्यवर उपस्थित होते. संत तुकारामनगर येथील सोहम ग्रंथालय व स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सेवा कार्याबद्दल नेरकर यांना ग्रंथसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना प्रभुणे पुढे म्हणाले की” पुस्तकांमुळे एकटेपणा जाणवत…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संपूर्ण विश्वाला अहिंसा आणि शांतीचा अनमोल संदेश देणारे भगवान महावीर स्वामी यांची बंधूभावाची शिकवण सर्वांनी जोपासावी त्याचप्रमाणे आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सर्वांनी येणाऱ्या मावळ लोकसभा निवडणूकीत मतदानाचा हक्कही बजवून लोकशाही महोत्सवात सहभागी व्हावे असे आवाहन पिंपरी चिंचवड जैन महासंघाचे उमेश पाटील यांनी केले. महावीर जयंती निमित्त पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या वतीने चिंचवड येथील प्रा.रामकृष्ण प्रेक्षागृह येथे विविध भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पाटील बोलत होते. या कार्यक्रमास पिंपरी चिंचवड महापालिकेचे जनता संपर्क अधिकारी प्रफुल पुराणिक,जैन महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अशोक पगारिया तसेच संस्थेचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते. यावेळी…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सिजोफेनिया आजाराने ग्रस्त असलेल्या आईने आपल्या ४ वर्षांच्या मुलाला कडेवर घेऊन राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पिंपरी चिंचवड शहरातील वाकड भागात असलेल्या रीगालिया या उच्च – भ्रू सोसायटी मध्ये ही घटना घडली. कोमल जगदीश हरिश्चंद्र (वय ३२, रा. रिगालिया, सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या आईचे नाव आहे. कोमल यांनी तिने इमारतीमधून उडी मारताना आपला चार वर्षांचा मुलगा विहान संकेत आवटे याला कडेवर घेऊन उडी मारली. शनिवारी सकाळी साडे आठच्या पूर्वी ही घटना घडली आहे. कोमल यांच्यावर परदेशात तसेच भारतात सध्या उपचार सुरू होते. या प्रकारानंतर त्यांचे कुटुंबीय आणि शेजारी पुरते हादरून गेले असून,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाच्या वर्धापनदिनानिमित्त वतीने रवींद्र बोर्लीकर यांना आदर्श पिता म्हणून सन्मानित करण्यात आले. प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा अर्चना वर्टीकर, उपाध्यक्ष. डॉ. शुभांगी म्हेत्रे, कार्याध्यक्ष भगवान महाजन आणि माजी महापौर शैलजा मोरे, माजी नगरसेविका शर्मिला बाबर , सामाजिक कार्यकर्ते बाळा शिंदे,अतुल इनामदार,बाळासाहेब साळुंखे ,अशोक चोपडे,भारती फरांदे आदी जेष्ठ आणि श्रेष्ठ नागरिक उपस्थित होते. यावेळी उपस्थितीतांनी मनोगत व्यक्त केले.
पिंपळे गुरव ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे गुरव या परिसरात सामाजिक काम करणाऱ्या दिलासा संस्था, पुणे जिल्हा गुणवंत कामगार विकास समिती, मानवी हक्क संरक्षण जागृती, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने कडक उन्हाळ्यात पाणी बचतीचा संदेश देणारे पथनाट्य राजमाता जिजाऊ उद्यान पिंपळे गुरव येथे सादर करण्यात आले. या पथनाट्यात मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज पाटील, दिलासा संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष चव्हाण, गुणवंत कामगार संगीता जोगदंड, शब्दधन काव्यमंचाचे सदस्य नंदकुमार कांबळे शामराव सरकाळे तसेच दिलासा संस्थेचे अध्यक्ष सुरेश कंक यांनी सहभाग घेतला. *वासुदेव आला हो वासुदेव आला..*…
