Author: maharashtrabreakingnews.com

शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार गावभेट दौऱ्यावर असताना म्हाळुंगे पडवळ गावात एका आजींनी त्यांची भेट घेतली. अनेक दिवसांनी आपला नातू भेटल्यानंतर कसं प्रेम दाटून येतं अगदी तसंच आजींनी डॉ.अमोल कोल्हे यांच्या चेहऱ्यावरून मायेने हात फिरवला.. आलाबला घेऊन कडाकडा बोटं मोडली . आजींचे प्रश्न हे सर्वसामान्य नागरिकांचं डॉ.अमोल कोल्हे यांच्यासोबत असणारं घट्ट नातं सांगणारे होते. आम्हा म्हाताऱ्यांना कोण सांभाळणार ? आमच्या पोरांना कोण कामाला लावणार ? हे प्रश्न आजींनी डॉ.अमोल कोल्हेंना विचारले, त्यांनीही क्षणाचाही विलंब न लावता “मी करणार, शंभर टक्के करणार” असं म्हणत आजीचा नातू खंबीर आहे हा विश्वास दिला.. त्यानंतर आजींच्या चेहऱ्यावर दिसलेलं…

Read More

विरोधी उमेदवारला डॉ. कोल्हेंचे थेट जाहीर आव्हान मंचर , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विरोधक महागद्दार आहेत हे माहिती होत पण विरोध करण्याचा पोरकट बालिशपणा करत भेकडपणा करतील हे माहिती नव्हतं, अशा शब्दात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ मंचर शहरात पदयात्रा आणि कोपरा सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्यासोबत देवदत्त निकम, सुरेश भोर, राजाराम बाणखेले, राजू इनामदार, आलू इनामदार, बाळासाहेब बाणखेले, दत्ता गांजाळे आदी उपस्थित होते. या पदयात्रेदरम्यान, विरोधकांनी डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात बॅनरबाजी करत आपला पोरकट बालिशपणा दाखवून दिला. या बालिशपणाचा…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आंबेगाव तालुक्यातील चांडोली (बु.) येथे गावभेट दौऱ्यादरम्यान भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि गावकऱ्यांच्या वतीने आदरपुर्वक वाजत-गाजत स्वागत करण्यात आले; या स्वागताने भारावून गेलो. यावेळी जनसेवा केंद्र कार्यालयाच्या परिसरात उपस्थितांशी संवाद साधला. याप्रसंगी ग्रामस्थांनी परिसरातून 90 टक्के पेक्षा जास्त मतांचे मताधिक्य दिले जाईल, असे आश्वासन दिले. यावेळी भिमाशंकर सहकारी कारखाना अध्यक्ष बाळासाहेब बेंडे, जिल्हा परिषदेचे सदस्य विवेक वळसे पाटील, शिवसेना गटनेते जिल्हा परिषद देविदास दरेकर, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद अरुण गिरे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णू काका हिंगे, माजी पंचायत समिती सदस्य रविंद्र करंजखेले, नेते सुनिल बाणखेले, उद्योजक संतोष डोके, भैरवनाथ पतसंस्था संचालक महेश ढमढेरे, कार्याध्यक्ष…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शहरात वास्तव्य करणा-या सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या  हजारो कोकणी बांधवांनी “आम्ही भारताचे नागरिक, लोकशाही निष्ठा ठेवून,  मुक्त निःपक्षपाती व शांततापूर्ण वातावरणातील निवडणुकांचे पावित्र्य राखू व प्रत्येक निवडणुकीत निर्भयपणे तसेच धर्म, वंश, जात,समाज, भाषा यांच्या विचारांच्या प्रभावाखाली न येता किंवा कोणत्याही प्रलोभनात बळी न पडता मतदान करू” अशी शपथ घेऊन १०० टक्के मतदानाचा निर्धार व्यक्त केला. पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आज कार्यक्षेत्रात मतदान जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आला. पिंपरी येथील संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदीर येथे सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाच्या वतीने वधू- वर मेळावा आयोजित करण्यात आलेला होता. त्या…

Read More

पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – वाकड येथील इंदिरा स्कूल ऑफ बिझनेस स्टडिज या ठिकाणी प्राध्यापिका म्हणून कार्यरत असणाऱ्या  तेजस्विनी शेवते-उ-हे यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून “बिझनेस लॉ अँड टॅक्सेशन” या विषयावर सादर केलेल्या प्रबंधासाठी पी.एचडी. प्रदान करण्यात आली आहे. प्राध्यापिका तेजस्विनी शेवते- उ-हे यांनी श्री शाहू मंदिर महाविद्यालय, पर्वती,पुणे येथील संशोधन केंद्रातून  “अँन अन्यालिटिकल स्टडी ऑफ इम्प्लिकेशन्स ऑफ  एक्समपशन्स अँड डीडकशन्स अंडर इनकम टॅक्स ऍक्ट टू सॅलरीड असेंसीज ” (“An Analytical study of Implications of Exemptions & Deduction under Incom Tax Act to salaried Assessees” )या विषयावर संशोधन केले आहे.त्यांना डॉ. स्मिता पांडे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.तसेच डॉ. यशोधन मिठारे डीन  कॉमर्स…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारून त्यांना उत्तम सोयी सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभाग प्रामुख्याने प्रयत्नशील आहे. शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी महापालिका प्रशासन आघाडीवर असून त्यासाठी महापालिकेने पी सी एम सी दक्ष नावाचे ॲप्लिकेशन तयार केले आहे. सदर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून उद्यानातील प्रत्येक कामावर लक्ष ठेवण्यात येत असून कर्मचाऱ्यांना ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दैनंदिन कामाचे वाटप सुद्धा केले जात आहे. यामुळे संबंधित ठेकेदार यांच्याकडून काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारास प्रतिदिन दंड सुद्धा आकारण्यात येत आहे. याच अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शहरातील विविध उद्यानास भेटी दिल्या. यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वाकड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळेनिलख येथील कै.…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  चिंचवड येथील कमला शिक्षण संकुल संचलित प्रतिभा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रा. अर्चना गांगड यांनी गणित या विषयातून ब्रेनट्युमर इमेज सेंग- मेंटेन्शन बाय परसिस्टंट होमोलॉजी टूल फ्रॉम टोपोलॉजीकल डेटा अनालिसिस या विषयावर संशोधन करून प्रबंधाचे सादरीकरण राजस्थान येथील श्री जगदीश प्रसाद झांबरमल टिबरेवाला विद्यापीठात केले. विशेष अनमोल मार्गदर्शन डॉ. प्रभा रस्तोगी, डॉ. मिलन जोशी, डॉ. विश्वजीत गोस्वामी यांनी केले. प्रतिभा शिक्षण संकुलाचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा, खजिनदार डॉ. भूपाली शहा, मुख्य प्रशासकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांकरिया, उपप्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष सत्कार केला व भावी कार्यास डॉ अर्चना गांगड शुभेच्छा दिल्या.

Read More

– महाविकास आघाडीचे प्रमुख नेते राहणार उपस्थित – मावळ लोकसभेचे प्रचार प्रमुख योगेश बाबर यांची माहिती पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमदेवार संजोग वाघेरे पाटील यांचा उमेदवारी अर्ज मंगळवार, दि‌.23 एप्रिल 2024 रोजी दाखल करण्यात येणार आहे. वाघेरे पाटील यांचा अर्ज दाखल करण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मावळ लोकसभा मतदार संघाचे प्रचार प्रमुख योगेश बाबर यांनी दिली. अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेनेचे प्रमुख तथा माजी पर्यटनमंत्री आमदार आदित्य ठाकरे, काँग्रेसचे नेते माणिकराव ठाकरे, शिरूरचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – डॉ.डी.वाय पाटील युनिटेक सोसायटीचे डॉ. डी. वाय. पाटील शिक्षणशास्त्र महाविद्यालय (बी.एड., एम. एड.) पिंपरी,पुणे येथे नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . सतत नाविन्याचा ध्यास असणारे व नवनविन गोष्टी करण्यास प्रेरणा देणारे आमचे प्रेरणास्थान डॉ. डी. वाय पाटील युनिटेक सोसायटीचे अध्यक्ष माननीय डॉ. पी. डी. पाटील सर यांच्या प्रेरणेतून व बदलत्या काळानुसार गुणवत्तापुर्ण कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करणारे डॉ. डी. वाय. पाटील युनिटेक सोसायटीचे सचिव माननीय डॉ. सोमनाथ पाटील सरांच्या मार्गदर्शनामुळे स्नेहसंमेलन यशस्वीपणे संपन्न झाले . संघटनात्मक कार्य करण्यास प्रबलन देणाऱ्या महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. रेखा पाठक यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये…

Read More

– संजोग वाघेरेंच्या प्राचाचार्थ युवासेनेचे सैनिक मैदानात पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी गद्दारी करणाऱ्यांच्या विरोधात निष्ठावंत शिवसैनिकांची, तसेच अशा गद्दारांना धडा शिकवणारी ही लोकसभा निवडणूक आहे. त्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात सर्वांपर्यंत मशाल पोहोचवा, असे आवाहन शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवासेना शहरप्रमुख चेतन (अण्णा) पवार यांनी युवसेनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ पिंपरी येथील पक्ष कार्यालयात आयोजित युवासेनेच्या आढावा बैठकीत चेतन पवार बोलत होते. शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना उपशहर प्रमुख भाऊसाहेब जाधव, विनायक दळवी, निखील दळवी, सुमित निकाळजे, रोहन वाघेरे, गणेश जोशी, पिंपरी विधानसभा…

Read More