Author: maharashtrabreakingnews.com

– पिंपरीत संजोग वाघेरे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन – 4 जूननंतर नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान राहणार नसतील पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रत्येक लोकसभेची जागा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. विशेषत: मावळ लोकसभा मतदारसंघात जिथे गद्दारी झाली. ही गद्दारी पूर्णपणे मातीत गाडावी लागणार आहे. त्यासाठी मावळ लोकसभेतून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांना लोकसभेत पाठवायचं आहे, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते तथा खासदार संजय राऊत म्हणाले. तसेच, देशात परिवर्तन होणार असून येत्या 4 जूननंतर नरेंद्र मोदी नावाचे सद्गृहस्थ देशाचे पंतप्रधान राहणार नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे. पिंपरी येथील उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या लोकसभा निवडणुकीच्या…

Read More

उद्धव ठाकरे बहुरूपी तर श्रीरंग बारणे कट्टर शिवसैनिक – डॉ. संजय पांडे सर्व उत्तर भारतीय मतदार बारणे यांच्या पाठीशी – डॉ. संजय पांडे* खारघर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ‘जो राम को लाये है, हम उनको लायेंगे’, ‘जय श्रीराम, जय जय श्रीराम’च्या घोषणांनी सभागृह दणाणून सोडत उत्तर भारतीयांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला. खासदार बारणे यांच्या प्रचारार्थ खारघर येथे उत्तर भारतीयांच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजपाच्या उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष डॉ. संजय पांडे, सरचिटणीस चिराग गुप्ता, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील,…

Read More

पंतप्रधान मोदींनी साठ वर्षातील खड्डे दहा वर्षात भरून काढले – बारणे खारघर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पंजाब व हरियाणा या राज्यांतून येऊन नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने पनवेल परिसरात स्थायिक झालेल्या पंजाबी व हरियाणवी बांधवांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना आज (रविवारी) पाठिंबा जाहीर केला. कळंबोली येथे पंजाब-हरियाणा निवासी महासभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी खासदार श्रीरंग बारणे, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सचिव शिवदास कांबळे, माजी नगरसेवक राजू शर्मा तसेच परेश पाटील, हॅपी सिंग, जसपाल…

Read More

बारणे यांच्या हॅटट्रिकसाठी कामगार तसेच रिक्षा व टॅक्सी चालक-मालकांचा निर्धार विरोधकांनी आंबेडकर वाचलेच नाहीत – बारणे पनवेल, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नरेंद्र मोदी हे सर्वसामान्यांच्या हितासाठी झटणारे पंतप्रधान आहेत, असे उद्गार मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (रविवारी) काढले. नवीन पनवेल येथील खांदा कॉलनीमध्ये झालेल्या कामगार, रिक्षा व टॅक्सी चालक-मालक यांच्या मेळाव्यात खासदार बारणे यांना विक्रमी मताधिक्याने निवडून देऊन हॅटट्रिक करण्याचा निर्धार करण्यात आला. त्यावेळी बारणे बोलत होते. व्यासपीठावर आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे क्लस्टर प्रमुख बाळासाहेब पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शिवसेनेचे तालुकाप्रमुख रुपेश…

Read More

भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला विश्वास पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भोसरी विधानसभा मतदार संघात महायुतीची ताकद निर्णायक असून, गत निवडणुकीत या मतदार संघातून सुमारे ३७ हजार मतांचे लीड आढळराव पाटलांना मिळाले होते. आता त्याची पुनरावृत्ती होणार असून, यावेळी १ लाख मातांची आघाडी या मतदार संघातून राहील आणि शिरुर लोकसभा मतदार संघात भोसरी ‘किंगमेकर’च्या भूमिकेत असेल, असा विश्वास भाजपा आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला आहे. शिरुर लोकसभा मतदार संघातील भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी-आरपीआय- मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरी गावठाण येथे दौरा करण्यात आला. यावेळी पदयात्रेची सुरूवात भोसरीचे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिरात दर्शन घेऊन करण्यात…

Read More

शिरूर लोकसभेत शरद पवार घेणार पाच सभा, तर आदित्य ठाकरेंची होणार रॅली पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचारात रंगत यायला सुरुवात झाली आहे. आपले उमेदवार निवडून आणण्यासाठी पक्षातले जेष्ठ नेते आता निवडणुकीच्या मैदानात उतरत आहेत. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे मैदानात उतरणार आहेत. शिरुर लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या एकूण पाच सभा होणार आहेत. तर शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांची भोसरी विधानसभेत 7 मे रोजी रॅली असणार आहे. शिरुर-हवेली, हडपसर, आंबेगाव-शिरुर, खेड -आळंदी, जुन्नर…

Read More

विक्रमी मताधिक्यासाठी मतदानाचा टक्का वाढवा – खासदार बारणे थेरगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना चिंचवड विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीपेक्षा दुप्पट मताधिक्य मिळेल. सुमारे पावणेदोन ते दोन लाख मतांच्या फरकाने ते विजयी होतील, असा विश्वास पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी आज (शुक्रवारी) व्यक्त केला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार यांच्या प्रचारार्थ थेरगाव येथील संतोष मंगल कार्यालयात झालेल्या नमो संवाद सभेत ते बोलत होते. त्यावेळी खासदार बारणे, भाजपचे चिंचवड विधानसभा अध्यक्ष काळूराम बारणे, माजी नगरसेवक सिद्धेश्वर बारणे, अभिषेक बारणे, हर्षल ढोरे‌ तसेच प्रसाद कस्पटे, पियुशा पाटील,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – गतवर्षी महिला बचत गटाच्या वतीने मालमत्ता कराची बिले वाटपाचा निर्णय यशस्वी झाल्यानंतर 2024-25 या आर्थिक वर्षातही महिला बचत गटाच्या मार्फत बिलांचे वाटप सुरू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी ओटीपीद्वारे आपल्या मालमत्तेचा जोडलेला मोबाईल क्रमांक व्हेरिफाय करावा, असे आवाहनही महापालिकेमार्फत करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड शहरात 6 लाख 25 हजार नोंदणीकृत मालमत्ता आहेत. त्यानुसार सव्वा सहा लाख बिलांची छपाई होऊन बिले वाटप करण्यास सुरुवात झाली आहे. या वर्षी प्रथमच बिलावर युपिक आयडी छापण्यात आला आहे. पालिकेमार्फत चालू असलेल्या सर्वेक्षणात ज्या मालमत्तांचे सलग क्रमांक (geo -sequencing) देऊन झाले आहेत त्या मालमत्तांच्या बीलावर युपिक आयडी दिलेला आहे. हा लक्षात…

Read More

आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते मावळ लोकसभा मतदारसंघात ‘आपला माणूस’ म्हणून महायुतीचे उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांचे काम करतील व त्यांना विक्रमी मताधिक्याने निवडून आणतील, अशी ग्वाही मनसेचे सरचिटणीस रणजीत शिरोळे यांनी आज (शुक्रवारी) दिली. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार बारणे यांच्या प्रचाराच्या नियोजनासाठी काळभोर नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या पिंपरी- चिंचवड मधील मनसे कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस खासदार बारणे, मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले, महिला अध्यक्ष सीमा बेलापूरकर तसेच हेमंत डांगे, प्रीती सिंह परदेशी, राजू भालेराव, अनिकेत प्रभू, राजू सावळे, अंकुश तापकीर, सागर लांघे, नितीन…

Read More

चिंचवड येथे गांधी पेठ तालीम मित्र मंडळाच्या जिजाऊ व्याख्यानमालेचा रविवारी समारोप पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  मानवाच्या पुढच्या पिढीचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी व प्लास्टिक मुक्त वसुंधरेसाठी सर्वांनी सजग झाले पाहिजे. यासाठी शाळांमध्ये भूगोलाबरोबरच “भूजलगोल” शिकवून विद्यार्थ्यांमध्ये जागृती केली पाहिजे. एक विद्यार्थी दोन पालकांमध्ये जागृती करतो. पुणे, पिंपरी चिंचवड मधील शाळांमधून अठरा हजार पाचशे विद्यार्थी दरमहा “सागरमित्र” या पथदर्शी प्रकल्पांतर्गत दहा टन प्लास्टिक गोळा करतात. हे प्लास्टिक रिसायकल केले जाते. विद्यार्थी पालकांबरोबरच समाजातील सर्व घटकांनी प्लास्टिक मुक्त वसुंधरा करण्यासाठी आपला खारीचा वाटा उचलावा. यासाठी पाण्यासाठी प्लास्टिकच्या बाटल्या बंद करून स्टीलच्या बाटलीचा वापर करावा. तसेच प्लास्टिक कॅरीबॅग ऐवजी ज्यूटच्या, कापडी पिशव्यांचा…

Read More