- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
तुकोबारायांचे आशीर्वाद घेऊन बारणे यांच्या मावळातील प्रचाराचा शुभारंभ संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेऊन बारणे यांचा मावळात धडाकेबाज प्रचार देहूगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना- भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप व मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी (मंगळवारी) मावळ तालुक्यातील प्रचाराचा शुभारंभ केला. खासदार बारणे यांनी आज मावळ तालुक्याच्या पूर्व भागात प्रचार दौरा केला. चिंचोली, किन्हई, झेंडेमळा, माळवाडी, देहूगाव, सुदुंबरे, सुदवडी, इंदोरी, नवलाख उंबरे, आंबी, वराळे, उर्से, परंदवडी, सोमाटणे, शिरगाव, गहुंजे, शेलारवाडी, मामुर्डी या गावांमध्ये प्रचार फेरी काढून मतदारांशी संपर्क साधला. प्रचार फेरीची सांगता देहूरोड येथे झाली. मोठ्या…
– पनवेल विधानसभेत संजोग वाघेरे यांच्या प्रचारार्थ गावभेट दौरा – महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा सहभाग पनवेल (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कुठलेही युद्ध जिंकायचे असेल, तर आपल्या हातात कुठले शस्त्र आहे. त्याची ताकद ओळखून त्या युद्धात उतरावे लागते. आमचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी आमच्या हातात “मशाल” हे शस्त्र दिले आहे. स्वाभीमान, निष्ठा आणि क्रांतीचे प्रतिक असलेली हीच “मशाल” विरोधकांना भस्म केल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी विरोधकांवर तोफ डागली. मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील पनवेल विधानसभेत गावभेट दौरा करत बैठका घेत…
उरण, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील उरण तालुक्यात मनसेला मोठे खिंडार पडले आहे. तालुक्यातील सोनारी येथील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शाखा अध्यक्ष सुरेश चंद्रकांत कडू, माजी शाखा खजिनदार अमर हरीचंद्र पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि.30) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला आहे. पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर यांनी नेतृत्वावर विश्वास ठेवत मनसे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी इंजिन सोडून हातात मशाल घेतली आहे. मनोहर भोईर यांच्या हस्ते सुरेश कडू व अमर पाटील यांना शिवबंधन बांधून व भगवी शाल देऊन त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले. या वेळी माजी सरपंच रोहिदास पाटील, उपसरपंच मेघशाम कडू, शाखाप्रमुख…
मावळ, शिरूर, बारामती लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारात भाजपची आघाडी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी अक्षरशः धुरळा उडवला आहे. या तीनही लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या पिंपरी, चिंचवड, भोसरी विधानसभेसह बारामती लोकसभा मतदारसंघात समावेश असलेल्या ताथवडे भागात नमो संवाद सभांच्या माध्यमातून जास्तीत जास्त मतदारांशी संवाद साधण्यात येत आहे. या सभांना सर्व वर्गातील मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. मोदी सरकारची गेल्या १० वर्षांतील कामगिरी सांगताना राम मंदिर, मेट्रो, डिजीटल इंडिया, विविध कल्याणकारी योजना आणि विकसित भारताचा संकल्प अशा विविध गोष्टींवर मतदारांशी संवाद साधून महायुतीला विजयी करण्याचे आवाहन शंकर…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पीसीसीओईचा माजी विद्यार्थी शुभम भगवान थिटे याने यूपीएससी परीक्षेत मिळविलेले उल्लेखनीय यश कौतुकास्पद आहे. त्याचा पीसीईटी व्यवस्थापनाच्या वतीने सत्कार करताना आम्हाला अभिमान वाटतो असे पीसीईटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी सांगितले. पीसीसीओईचा २०१८ च्या मेकॅनिकल विभागाचा माजी विद्यार्थी शुभम थिटे याने नुकत्याच जाहीर झालेल्या यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले. त्याचा सत्कार काळभोर यांच्या हस्ते ट्रस्ट कार्यालयात शुक्रवारी करण्यात आला. यावेळी पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्ष पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त तथा पीसीयूचे कुलपती हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे उपसंचालक डॉ. निळकंठ चोपडे, मेकॅनिकल विभाग…
शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरुर दौरा दरम्यान खैरेनगर येथे भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले माता-भगिनींनी औक्षण केला. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. प्रसंगी आत्मिय आदर सत्कार करण्यात आले. ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या व उचित उपाय योजना लागू करण्याचे आश्वासन दिले. शिवाजीराव आढळराव म्हणाले की, या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले. निवडणूक विकासासाठी आहे त्याला हातभार लावण्यासाठी आहे. ही निवडणूक केंद्र आणि राज्याचा समन्वय साधनारी आहे. आपल्या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावायचे असतील तर केंद्राच्या ज्या विचाराची सत्ता आहे, तीच राज्यातही हवी. त्यामुळे निधीसाठी मार्ग मोकळा होईल कालच नरेंद्र मोदी…
हिवरे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरुर दौरा दरम्यान हिवरे कुंभार येथे भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले माता-भगिनींनी औक्षण केला. प्रसंगी उपस्थितांना संबोधित केले. हिवरे येथे कार्यकर्त्यांना शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, तरुणांनी राजकारणामध्ये गावाच्या विकासासाठी हातभार लावला. तर उन्नती व्हायला वेळ लागत नाही. देशाची भूमिका जगासमोर मांडायचे काम मोदीजींनी केले आहे. त्यांच्यासोबत मी काम केला आहे. त्यांनी लागू केलेल्या योजना लोकां उपयोगी ठरत आहे. आम्ही सगळे एकत्र आलो हे विकासासाठी काही लोक चुकीचा अर्थ लावत आहे. दिलीपराव वळसे पाटील यांचा समवेत एक हजार ते दीड हजार कोटींचा निधी आपल्या भागाला दिला. या प्रसंगी…
करंदी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर दौरा दरम्यान सांसद आदर्श ग्राम करंदी येथे भेट दिली. येथिल गावातील पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले. माता भगिणीकडून औक्षण करण्यात आले. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. आचार संहितेच्या नियमाचे पालन करत हनुमान मंदिराच्या परिसरात कार्यक्रम पार पडले. येथे ग्रामस्थांच्या वतीने आदर सत्कार करण्यात आले. तसेच 80% मताने विजयी करु असे आश्वासन याठिकाणी देण्यात आले. जेष्ठ, तरुण आणि माता भगिनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, जेव्हा जेव्हा मी इथे आलो तेव्हा तेव्हा आपल्या प्राथमिक गरजा जाणून घेतल्या. आणि ते पूर्ण केल्या जे काही ग्रामस्थांच्या अपेक्षा होत्या ते मी पूर्ण करू शकलो. विकास कामाच्या…
शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरूर प्रचार दौऱ्या दरम्यान ज्ञानेश्वर माऊलीच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या केंदूर नगरीला भेट दिली. येथिल गावातील पदाधिकाऱ्यांनी वाजत गाजत स्वागत केले. माता भगिणीकडून औक्षण करण्यात आले. केंद्राई माता मंदिरात जाऊन दर्शन घेतले. ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात कार्यक्रमाचे आयोजन केले होते येथे ग्रामस्थांच्या वतीने आदर सत्कार करण्यात आले ग्रामस्थांनी पाण्याचे प्रश्न या ठिकाणी मांडले तसेच केंदूर गाव दत्तक घ्यावा अशी विनंती या ठिकाणी केली. तसेच जास्तीत जास्त मताने विजयी करु असे आश्वासन याठिकाणी देण्यात आले. जेष्ठ, तरुण आणि माता भगिनींचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यावेळी शिवाजीराव आढळराव म्हणाले, तिर्थक्षेत्र केंदूर नगरी मध्ये किती निधी आला विद्यमान खासदाराकडून? काहीच नाही…
नवी सांगवी , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय हिंदू संस्कृती मधील सोळा संस्कारांपैकी महत्वाचा समजला जाणाऱ्या उपनयन संस्कारासाठी पांचाळ सोनार समाजातील सुवर्ण पुष्प संस्था, आम्ही सांगवीकर ग्रुप यांच्या वतीने सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. एकूण २८ बटूंवर उपनयन संस्कार करण्यात आले. या संस्काराचे पौराहित्य वेदमूर्ती अनुपसिंह दीक्षित, माधव वेदपाठक, श्याम पंडित यांनी केले. यावेळी बटूंना गायत्री मंत्राची दीक्षा देण्यात आली. पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय येथे सोमवारी सामुदायिक व्रतबंध सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. संपूर्ण पुणे शहरासह विविध भागातून बटूंचा यामध्ये सहभाग होता. अत्यंत नियोजनबध्द आणि शिस्तबद्ध पद्धतीने झालेल्या या सोहळ्याची सुरवात श्रीगणेश पूजन करून करण्यात…
