खैरेनगर शिरूर येथील गावाचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार – शिवाजीराव आढळराव पाटील
शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – शिरुर दौरा दरम्यान खैरेनगर येथे भेट दिली. गावातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी वाजत गाजत फटाक्याच्या आतिषबाजीत स्वागत केले माता-भगिनींनी औक्षण केला. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतले. प्रसंगी आत्मिय आदर सत्कार करण्यात आले. ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेतल्या व उचित उपाय योजना लागू करण्याचे आश्वासन दिले.
शिवाजीराव आढळराव म्हणाले की, या निवडणुकीच्या माध्यमातून अनेक प्रश्न उपस्थित केले. निवडणूक विकासासाठी आहे त्याला हातभार लावण्यासाठी आहे. ही निवडणूक केंद्र आणि राज्याचा समन्वय साधनारी आहे. आपल्या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावायचे असतील तर केंद्राच्या ज्या विचाराची सत्ता आहे, तीच राज्यातही हवी. त्यामुळे निधीसाठी मार्ग मोकळा होईल कालच नरेंद्र मोदी यांनी युवकांसाठी तरुणांसाठी बेरोजगारांसाठी एक लाख कोटींची योजना लागू केली. त्यामुळे उत्पादन व्यवसाय उद्योगाला हातभार लागेल.
प्रदिप वळसे पाटील म्हणाले की, झोपेतून उठून जरी कोणाला विचारलं की कोणाचा सरकारी येणार आहे. तर कोणीही सांगेल की मोदी सरकार मग त्यांच्या विचाराची शिलेदार म्हणून जर आपल्यासमोर शिवाजीराव आढळराव पाटील असेल तर मग विकासाला हातभार लागेल. अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल.
या प्रसंगी भीमाशंकर साखर कारखाना वाईस चेअरमन प्रदिप वळसे पाटील, राकाँपा अध्यक्ष मानसिंग भैया पाचुंदकर, उपजिल्हाप्रमुख शिवसेना अनिल काशिद, माजी चेअरमन कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर शंकर जांभुळकर, जि.प. उपाध्यक्ष अरुण गिरे, उद्योजक प्रदीप साकोरे, उपाध्यक्ष भाजपा शिरुर भगवानराव शेळके, अध्यक्ष शिवसेना शिरुर रामभाऊ सासवडे, सभापती पंचायत समिती राजेंद्र राजकर, अध्यक्ष उद्योग आघाडी रविंद्र गायकवाड उपस्थित होते.
खैरेनगर गावात सरपंच नवनाथ शिंदे, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, माजी सरपंच संदीप खैरे, तुकाराम शिंदे, बाळासाहेब खैरे, विलास खैरे, राहुल शिरसागर, राजेंद्र खैरे, अरुण खैरे, लक्ष्मण खैरे तसेच महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.