Author: maharashtrabreakingnews.com

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – हिंदू संस्कृतीमध्ये सोळा संस्कारांपैकी एक महत्त्वाचा समजला जाणारा व्रतबंध संस्कार अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पिंपरी चिंचवड शहरा तर्फे आज १ मे रोजी खानदेश मराठा मित्र मंडळ,प्राधिकरण येथे पार पडला. सुरुवातीला महासंघाच्या वतीने सर्व बटूंचे औक्षण करून रांगोळी व फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले.त्यानंतर मुख्य कार्यक्रमास सुरुवात झाली.११ वाजून २३ मि शुभमुहूर्तावर हा मुंज सोहळा पार पडला.अतिशय देखणे रुखवत या प्रसंगी मांडण्यात आले होते. सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रबोधन मंचातर्फे  संतोष गायकवाड आणि सहकारी यांनी सर्वांना मतदानाच्या दिवशी आवर्जून मतदान करावे असे आवाहन करण्यात आले. महासंघातर्फे वेळोवेळी ब्राह्मण आणि इतर समजासासाठी उपयुक्त असे…

Read More

शिरूर, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला महत्त्वपूर्ण कलाटी देणारा निर्णय आहे, असे मत महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिरूर येथे व्यक्त केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेना शिरुर लोकसभा मतदार संघ, शिरुर लोकसभा पदाधिकारी बैठक चाकण मधिल ऐश्वर्या आयकाँन, आंबेठान चौक येथे पार पडली. त्या वेळी ते बोलत होते . या वेळी याप्रसंगी आमदार दिलीप अण्णा मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष भाजपा शरद बुट्टे पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, अध्यक्ष खेड तालुका राकाँपा कैलास सांडभोर, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती खेड कैलास लिंबोरे, अध्यक्ष खेड तालुका भाजप शांताराम शेठ भोसले, अध्यक्ष खेड तालुका राकाँपा युवक काँग्रेस जयसिंग…

Read More

शाहूनगर ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – ” विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य हे समाजासमोर पोहोचले पाहिजे. त्यातूनच नव्या पिढीमध्ये काहीतरी नवीन करण्याची ऊर्जा निर्माण होते. समाजात नवनवीन आदर्श निर्माण होणे, ही काळाची गरज आहे. पुढील पिढीला काय पाहिजे हे ओळखता आले पाहिजे. वाचन संस्कार नव्याने वाढवण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. ग्रंथालय हा जीवनाचा अविभाज्य भाग होऊन ग्रंथालयाच्या माध्यमातून समाजसेवा घडणे महत्त्वाचे आहे. ग्रंथालय चळवळीला पाठबळ देत शासन दरबारी असणारी असणारी अनास्था आपल्याला दूर करावी लागेल. माध्यमांच्या युगातही ग्रंथांचे वाचन हेच खरे शाश्वत ज्ञान आहे. त्यातूनच सशक्त समाज, वैभवशाली महाराष्ट्र आणि समृद्ध भारत घडवता येईल” असे प्रतिपादन पुणे विभाग ग्रंथालय संघाचे प्रमुख…

Read More

पिंपरीगावात महायुतीच्या निवडणूक कचेरीचे उद्घाटन निवडणूक कचेरी सुरू करत पिंपरीगावातही बारणे यांची मुसंडी पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पिंपरीगावातील निवडणूक कचेरीचे उद्घाटन रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल (बुधवारी) रात्री करण्यात आले. पिंपरीच्या डॉ. आंबेडकर चौकात जाहीर प्रचार सभा संपल्यानंतर आठवले यांनी पिंपरीगावात जाऊन निवडणूक कचेरीचे फीत कापून औपचारिक उद्घाटन केले. माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्या पुढाकाराने हे कार्यालय सुरू करण्यात आले आहे. कार्यक्रम स्थळी पोहचण्यास विलंब झाल्याने आचारसंहितेमुळे कोणाचीही भाषणे होऊ शकली नाहीत. निवडणूक कचेरीच्या बाहेर…

Read More

– महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांचे जोरदार स्वागत चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ थेरगावात “मशाल निष्ठावंत” पदयात्रा काढण्यात आली. थेरगावात या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून, तसेच फटाक्यांची आतषबाजी करीत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी थेरगावचे ग्रामदैवत बापूजीबुवा मंदिरात दर्शन घेतले. थेरगाव येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यानंतर प्रचार यात्रेला सुरुवात झाली. “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी, जय शिवाजी” या जयघोषाने थेरगावचा परिसर दणाणून गेला होता.…

Read More

-विभागवार बैठका घेऊन कष्टकऱ्यांची साधणार एकजूट पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्यासह पुणे जिल्ह्यात लोकसभा निवडणुका होत आहेत या निमित्ताने प्रचार सुरू आहे, मोदी सरकारने कामगार विरोधी केलेले कायदे त्याचबरोबर बेरोजगारी, महागाई यासह असंघटित कामगारांवर अन्याय आणि निराशाजनक कामगिरी असल्यामुळे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासचा शब्द महाविकास आघाडीने दिल्यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मत देऊन विजयी करण्याचा निर्धार राष्ट्रवादी- शरदचंद्र पवार, कामगार नेते काशिनाथ नखाते यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या आजच्या सभेत करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार, कामगार विभाग आणि असंघटित कामगार विभाग, कष्टकरी संघर्ष महासंघ नॅशनॅलिस्ट ट्रेड युनियन फेडरेशन तर्फे आज महविकासाघाडी समर्थन सभेचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी असंघटित…

Read More

चिंचवड येथे ७ असंघटित कामगारांचा पुरस्कार देऊन केला सन्मान पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – १ एक मे जागतिक कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कष्टकरी संघर्ष महासंघ महाराष्ट्र,क्रांती कष्टकरी असंघटित कामगार कल्याणकारी संघातर्फे आज चिंचवड येथे विशेष नैपुण्य मिळवलेल्या असंघटीत कष्टकरी कामगारांना श्रमप्रतिष्ठा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते काशिनाथ नखाते होते, प्रमुख पाहुणे म्हणून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचे अध्यक्ष पुरुषोत्तम सदाफुले, कामगार नेते अरुण गराडे, सचिव तुषार घाटुळे,राजू हरगूडे, राजु बिराजदार, हौसराव शिंदे,माधुरी जलमूलवार,लक्ष्मी गायकवाड,किरण साडेकर,ज्योती इनामके, यशवंत होळकर,आदी उपस्थित होते. श्रमप्रतिष्ठा पुरस्कारामध्ये बांधकाम कामगार -हनुमंत नरवडे, रिक्षाचालक- शीलाताई दिंडे, सफाईकामगार – सुभाष चाबुकस्वार, घरेलूकामगार शिला काळे,…

Read More

चिंचवड (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- अखिल भारतीय मराठा महासंघ, खान्देश तिळवण तेली समाज मंडळ, माजी सैनिक संस्था अशा विविध संस्था संघटनांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अखिल भारतीय मराठा सेवा संघाच्या वतीने खासदार बारणे यांना पाठिंब्याचे लेखी पत्र देण्यात आले. पत्रावर संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे, राज्य संपर्कप्रमुख अनिल ताडगे, पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष उदयसिंह पाटील, उपाध्यक्ष संतोष भांगरे, सरचिटणीस संजय देसाई यांच्या सह्या आहेत. मराठा महासंघाने पाठिंबा पत्रात म्हटले आहे की, सरकारच्या विविध खात्यांमध्ये निवड झालेले 2,200 तरुणांना आरक्षण…

Read More

संभाजीनगर येथील छत्रपती संभाजी महाराज व वडार मजूर शिल्पास संजोग वाघेरेंकडून अभिवादन पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- पिंपरी चिंचवड शहराच्या पायभरणीत‌ सर्वात मोलाचा वाटा इथल्या कष्टकरी, कामगार वर्गाचा आहे. जगाच्या नकाशावर पोहोचलेल्या पिंपरी चिंचवड शहराची जडणघडण त्यांच्या योगदानातून झाली. कामगार दिनी त्याचे स्मरण प्रत्येकाला झाले पाहिजे, असे मत मावळ लोकसभा मतदार संघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी मांडले. संभाजीनगर येथील बर्ड-व्हॅली उद्यान येथील वडार मजूर शिल्प प्रतिष्ठानच्या वतीने कामगार दिन साजरा करण्यात आला. यावेळी संजोग वाघेरे पाटील यांनी उपस्थित राहून स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि वडार मजूर शिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. वडार समाज…

Read More

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – “माजी विद्यार्थी हे महाविद्यालयाचे सदिच्छादूत म्हणून कार्य करीत असतात!” असे मत ज्येष्ठ विधिज्ञ आणि रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी संघ सचिव ॲड. सतिश गोरडे यांनी  पिंपरी वाघेरे येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना व्यक्त केले. प्रभारी प्राचार्य डॉ. माधव सरोदे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तसेच उद्योजक विजय चौधरी, बाळासाहेब वाघेरे, संजय गायके, उपप्राचार्य प्रा. डॉ. शहाजी मोरे, प्रा. डॉ. नीळकंठ डहाळे, प्रा. डॉ. संजय खत्री, प्रा. विद्यासागर वाघेरे यांची प्रमुख उपस्थिती होती. महाराष्ट्रदिनाचे औचित्य साधून प्रतिवर्षी रयत शिक्षण संस्था संचलित महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी वाघेरे येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात येतो. या मेळाव्यात…

Read More