- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
देहूरोड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माझ्यासारख्या सामान्य उमेदवाराचा पराभव करण्यासाठी मावळ लोकसभा मतदारसंघात मोठमोठे सेलेब्रिटी आणि नेते विरोधकांना आणावे लागत आहेत. मावळ लोकसभा मतदार संघातील जनता आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. या निवडणुकीत आपेल प्रतिनिधीत्व करून काम करण्याची एक संधी द्या, अशी मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी देहूरोडकरांना केले. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी बुधवारी (दि. 8 मे) देहूरोडसह परिसरातील गावामध्ये प्राचारयात्रा काढली. या यात्रेत त्यांनी गावागावात मतदारांशी संवाद साधत विजयी करण्याचे आवाहन संजोग वाघेरे यांनी केले. या प्रचार यात्रेत संजोग वाघेरे…
‘माझा भाव आला’, म्हणत आदिवासी भगिनींनी केले बारणे यांचे स्वागत कर्जतमधील प्रचार दौऱ्यात बारणे यांना मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद विकासकामे केल्याने बारणे यांनी हक्काने मागितली आदिवासींकडेही मते कर्जत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)- कर्जत तालुक्यातील प्रचार दौऱ्यात मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी कर्जत शहरापासून अगदी दुर्गम भागातील आदिवासी वाड्या-वस्त्यांपर्यंत मतदारांशी संपर्क साधला. ‘माझा भाव आला’ असं म्हणत स्वतःच्या हातांनी बनवलेला रान फुलांचा गुच्छ देत आदिवासी भगिनी त्यांचे स्वागत केले. विकास कामे केल्यामुळे बारणे यांनी आदिवासी बांधवांकडेही हक्काने मागितली. खासदार बारणे यांनी कर्जत तालुक्यातील पळसदरी, भिसेगाव, चारफाटा, श्रीराम पूल, दहिवली, खांडपे, कोंदिवडे, चोचीवाडी, बीड,…
– देव-देश अन् धर्माभिमान जागृत ठेवा, महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्रीराम जन्मभूमी अयोध्या येथे प्रभू श्रीराम मंदिराचे स्वप्न ५०० वर्षांनी पूर्ण झाले. या मंदिराचे राष्ट्रार्पण आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले. यानिमित्त देशभरामध्ये उत्सव साजरा करण्यात आला. देव-देश अन् धर्माभिमान जागृत करण्याचे काम मोदी सरकारने केले आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिर उभारणी, जम्मू-कश्मिरमधील ३७०…
पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – “कलाकार हा ‘श्री’रंगाचा खरा पुजारी असतो!” असे गौरवोद्गार ज्येष्ठ शिल्पकार सी. आर. होनकळस यांनी क्लब हाऊस, अक्षयनगर, फेज – १, डीपी रोड, विशालनगर, पिंपळे निलख येथे काढले. चित्रकार अजितकुमार जमदाडे यांच्या दोन दिवसीय हस्ताक्षर आणि पेंटिंग्ज प्रदर्शनाचे उद्घाटन करताना होनकळस बोलत होते. विनाशुल्क असलेल्या या प्रदर्शनाचा परिसरातील नागरिकांनी लाभ घेतला. सी. आर. होनकळस पुढे म्हणाले की, “सुंदर हस्ताक्षर हे सकारात्मक स्वभावाचे आणि उन्नतीचे प्रतीक असते. रंगांना जाती, धर्मांचे, वर्णांचे बंधन नसते. रंगांना ‘श्री’रंग करण्याचे सामर्थ्य कलाकारात असते. कलाकाराचे हात प्रार्थनेसाठी जोडलेल्या हातांप्रमाणेच पवित्र अन् पुण्यवान असतात!” पिंपरी येथे बालपण व्यतीत करून शिक्षण घेतलेल्या अजितकुमार जमदाडे…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्राची शेती-माती- संस्कृती आणि शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा खेळ बैलगाडा शर्यत बंदी उठवण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुती सरकारने सकारात्मक पुढाकार घेतला. बंदी उठवली आणि कायदा पारित केला. त्यामुळे पुणे जिल्ह्यासह ग्रामीण महराष्ट्रात बैलगाडा शर्यती सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला. सर्वोच्च न्यायालयात हा लढा यशस्वी झाला. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप व मित्र पक्ष महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गतवेळी झालेल्या निवडणुकीत भोसरी विधानसभा मतदार संघातून ३७ हजाराहून अधिक…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नुकत्याच झालेल्या फिरोडिया करंडक स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या (पीसीसीओई) आर्ट सर्कल संघाने चार पारितोषिके पटकावत उल्लेखनीय यश मिळवले. प्रसिद्ध संगीतकार अजय अतुल यांच्या हस्ते पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. आर्ट सर्कल संघाने स्पेशल इफेक्ट्स, इंस्ट्रुमेंट प्ले – मेलोडिका, वाद्य वाजवणे – काँगो, फ्रीस्टाइल नृत्य या चार प्रकारात प्रथम क्रमांक पटकावला. प्रा. श्रीयश शिंदे आर्ट सर्कल प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कशौनीश बोरकर, कृष्णा कलासपूरकर, सोहम ब्राह्मणकर, निधी वर्तक, शंतनु सोनार, आशुतोष ताकपिरे, प्रणम्या राजीवन, तन्वी शिंपी, श्रृष्टी सरोदे, आर्या दाभोलकर, प्रफुल्ल गुंजाळ, केदार फुल्सवांगे, आर्या देशपांडे,…
पनवेलमध्ये माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मतदारांना आवाहन पनवेल (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला आहे. विद्यमान खासदारांच्या निष्क्रियपणाबद्दल नाराजीचा सूर हा यत्र तत्र सर्वत्र असा उमटत आहे. आता हवा खासदार नवा! अशी जनभावना मावळ लोकसभा मतदारसंघात उमटत आहे. याचा प्रत्यय मंगळवारी (दि.७) पनवेलमध्ये आला. शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी यांनी मॉर्निंग वॉक करत मतदारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या समोरील मशालीचे बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, असे विनंती यावेळी मतदारांना केली. मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये १८९ पनवेल…
उरुळी कांचन , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महायुतीचे अधिकृत उमेदवार उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत उरुळी कांचन येथे जाहीर सभा झाली. या सभेला नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, विकासाचे प्रश्न मार्गी लावायचे असतील तर आपल्याला शिवाजीराव आढळराव पाटील यांना विजयी करावे. समोरचा उमेदवार हा कुठलेही प्रश्न मार्गी लावू शकला नाही, त्यांना त्यांची जागा दाखवून द्या. सत्तेतून प्रश्न मार्गी लागतात म्हणून आम्ही सरकारमध्ये गेलोआहोत. मी कामाचा माणूस आहे. एक घाव दोन तुकडे करणारा व्यक्ती आहे. उरळी कांचन करांनो समोरच्या व्यक्तींला खासदार की मध्ये काहिच रस नाही. त्यामुळे आपल्यासाठी कामाची…
चऱ्होली, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड शहर भाजप सरचिटणीस शैला मोळक यांच्या नेतृवाखाली शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील चऱ्होली येथे प्रचाराचा धुराळा उडविला . यावेळी मंडल अध्यक्ष संतोष तापकीर, सुवर्णा बुर्डे, सुधीर काळजे , भाऊ रासकर , रामदास काळजे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.प्रचारादरम्यान विकास कामाची माहिती नागरिकांच्या घरी भेट देत संवाद साधला.
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची महासभा बुधवारी (दि. 8) सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरदचंद्र पवार यांची तोफ धडाडणार आहे. या सभेची जोरदार तयारी सुरु असून महाविकास आघाडीच्या या महासभेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा पक्ष चोरून, बाळासाहेब ठाकरेंचे नाव चोरून आणि पारंपारिक निशाणीवर दावा सांगून गद्दारी केलेल्यांना त्यांची योग्य जागा दाखविण्यासाठी महाविकास आघाडीने संजोग वाघेरे पाटील यांच्या स्वरूपामध्ये एक प्रामाणिक, सजग आणि जनमानसातील प्रश्नांची जाण…
