Author: maharashtrabreakingnews.com

निळ्या आणि लाल पूररेषांमुळे बांधकामांच्या अडचणी सोडवण्यासाठी आमदार शंकर जगताप यांच्याकडून केलेल्या पाठपुराव्याला यश पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – निळ्या आणि लाल पूररेषेसंदर्भात केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.  पुणे आणि पिंपरी चिंचवडसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नद्यांलगतच्या निळ्या व लाल  पुररेषेचे नव्याने पुनर्वेक्षण करण्यासाठी शासनाकडून नियमावली तयार करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी सरकारने पिंपरी चिंचवडसह १२ सदस्यांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे अशी माहिती आमदार शंकर जगताप यांनी दिली. दरम्यान गठीत केलेली समिती पुढील दोन महिन्यात शासनाला अहवाल सादर आहे. पिंपरी चिंचवडसह राज्यात प्रमुख शहरांमध्ये नद्यालगतच्या निळ्या आणि लाल पूररेषेसंदर्भातले प्रश्न प्रलंबित आहेत.  यामुळे नागरिकांना अडचणी…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ‘सारथी’ (SARATHI – System for Assistance to Residents and Tourists through Helpline Information) पोर्टल व मोबाईल अॅप गेल्या दोन महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेतील विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक श्री. विनोद जयवंत नढे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तात्काळ कार्यवाहीची मागणी केली आहे. ‘सारथी’ ही प्रणाली नागरिकांना महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित माहिती मिळविणे, तक्रारी नोंदविणे व त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी उपयुक्त माध्यम मानली जात होती. स्मार्ट सिटीच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जाणारी ही सेवा अचानकपणे बंद पडल्याने नागरिकांच्या तक्रारी प्रलंबित राहण्याची शक्यता व्यक्त…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नढे नगर, काळेवाडी परिसरात आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली. परिसरातून जात असताना एका मुस्लिम बांधवाच्या स्कुटीने अचानक पेट घेतल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, उपस्थित असलेल्या चिरंजीव प्रणेश सुभाष भोसले यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य मोठा अनर्थ टाळला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्कुटी अचानक धूर सोडू लागली आणि क्षणार्धात तिला आग लागली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ होती. आग वाढत गेल्यास गाडीचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशा गंभीर परिस्थितीत प्रणेश भोसले यांनी धाडस दाखवत तत्परतेने प्रयत्न केले. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि परिस्थिती…

Read More

पिंपरी, ( महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पिंपरी चिंचवड शहर जिल्ह्याच्या वतीने शहराध्यक्ष  कुणाल वाव्हाळकर आणि उपाध्यक्ष  धर्मपाल तांतरपाळे यांच्या नगरसेवकपदी निवड झाल्याबद्दल भव्य सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले. युवक शहराध्यक्ष डॉ. धम्मरत्न गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. कार्यक्रमात पक्षाच्या युवक आघाडीची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली तसेच काही युवकांचा पक्षात प्रवेश करण्यात आला. नव्या पदाधिकाऱ्यांमध्ये भारत खरात यांची युवक कार्याध्यक्षपदी, सिद्धांत जगताप व क्रांतिदीप जाधव यांची युवक उपाध्यक्षपदी, राहुल नितनवरे यांची युवक सरचिटणीसपदी, दिलीप मोरे यांची संपर्क प्रमुखपदी आणि निखिल केरणाले यांची संघटन सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. नवनियुक्त सर्व युवक पदाधिकाऱ्यांचे स्वागत…

Read More

औंध,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सामर्थ्य फाउंडेशन यांच्या वतीने बौद्धिक दिव्यांग विशेष मुलांच्या पुनर्वसन व विकासासाठी ‘सारथी संसाधन मेळावा’चे आयोजन बालकल्याण संस्था येथे करण्यात आले. या उपक्रमात एकूण १०६ बौद्धिक दिव्यांग मुलांनी सहभाग नोंदवला. मेळाव्यात बालरोगतज्ञ, विशेष शिक्षक, व्यवसायोपचार तज्ञ, भौतिकोपचार तज्ञ, नेत्रचिकित्सक, दंतचिकित्सक तसेच विविध डॉक्टर्स व थेरपिस्ट यांच्यासह २५ पेक्षा अधिक तज्ञांनी मार्गदर्शन केले. शासकीय योजना, विशेष आधार कार्ड आदी सेवांची माहितीही पालकांना देण्यात आली. एकाच छताखाली सर्व आवश्यक सेवा उपलब्ध झाल्यामुळे सहभागी कुटुंबांमध्ये समाधानाचे वातावरण होते. या उपक्रमासाठी ICDS, DEIC औंध सिविल हॉस्पिटल, महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे, सप्तश्री फाउंडेशन व बालकल्याण संस्था यांचे विशेष सहकार्य…

Read More

कासारवाडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कासारवाडी येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तसेच जैन भवन योजना जैन कॉन्फरन्स, नवी दिल्ली,, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटी, महर्षि आऩद सेवा प्रतिष्ठान या संस्थांचे अध्यक्ष तसेच तसेच रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी चे संस्थापक अध्यक्ष डॉ अशोककुमार पगारिया यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त कासारवाडी येथील जैन स्थानकात नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले सदर शिबिरामध्ये डॉ एस एस पारख भोसरी, यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिरात एकूण 142 रुग्णांची मोफत नेत्र तपासणी करण्यात आली आणि 107 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. या शिबिरासाठी महर्षि आनंद सेवा प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष संदीप फुलफगर सचिव प्रणित बागमार यांनी विशेष परिश्रम घेतले‌…

Read More

शिर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास महासंघ यांच्या तिर्थ शिर्डी येथे आयोजित राज्यव्यापी अधिवेशनात महत्त्वपूर्ण पदनियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. ही निवड लक्ष्मणराव झणझणे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास संघ यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते करण्यात आली. श्री यादव त्यांच्या सामाजिक व संघटनात्मक कार्यातील सक्रिय सहभाग, कायदेशीर जाण आणि प्रशासकीय समन्वय क्षमतेच्या आधारे त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच पिंपरी-चिंचवड पुणे अध्यक्षपदी श्री सचिन कदम यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कौशल्य विकास उपक्रमांना अधिक गती मिळेल, असा विश्वास अधिवेशनात व्यक्त करण्यात आला. दरम्यान, संजय पाटील यांची पुणे विभाग सचिव पदी सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांच्या अनुभवाचा लाभ…

Read More

देहूगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची जर्मनीतील विठ्ठल धाम येथे उभारण्यात आलेल्या भगवान विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठापना होणार असून, त्या मूर्तीचे देहू देवस्थान संस्थानच्या वतीने विधिवत पूजन करण्यात आले. देहूतून जर्मनीपर्यंत विठ्ठलनामाचा गजर पोहोचणार असून, संत परंपरेचा संदेश आता सातासमुद्रापारही जाणार आहे. देहूत भक्तिमय वातावरण शुक्रवारी दुपारी तीन वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात हा सोहळा पार पडला. या वेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. उपस्थित वारकरी, भाविक आणि विश्वस्तांच्या डोळ्यांत भक्तीचे अश्रू, तर ओठांवर विठ्ठलनामाचा जयघोष होता. हा सोहळा केवळ संस्थानपुरता मर्यादित नसून, प्रत्येक मराठी मनाचा आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा अभिमानाचा…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा व्हावा, या उद्देशाने शहरातील तीन महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १४ रोजी पासून पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट मेट्रो स्थानकांवरील नवीन प्रवेशद्वारे प्रवाशांच्या सेवेसाठी खुली करण्यात येणार आहेत. महामेट्रोकडून या तिन्ही स्थानकांवर भुयारी मार्गाच्या माध्यमातून प्रवेशद्वारांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यास मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना वर्दळीचे मुख्य रस्ते ओलांडण्याची गरज कमी होणार असून, सुरक्षिततेत वाढ होईल. तसेच वेळ आणि श्रमाची बचत होणार आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक येथे प्रवेशद्वार क्रमांक ५ एसटी…

Read More

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – श्री केदारेश्वर मंदिर ट्रस्टच्या वतीने निगडी प्राधिकरणातील श्री केदारेश्वर मंदिर प्रांगण, पेठ क्रमांक २४, लोकमान्य हॉस्पिटलच्या मागे रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ०७:१५ वाजता गंगाआरती आणि रात्री ठीक ०८:०० वाजता गंगाकलश स्नान या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी हिंदूंचे पवित्र तीर्थक्षेत्र काशी विश्वेश्वर येथील विद्वान पंडित – महाराजांची विशेष उपस्थिती राहील. याशिवाय महाशिवरात्री २०२६ या महोत्सवात रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी पहाटे पाच वाजेपासून सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी पहाटे पाच वाजेपर्यंतच्या चोवीस तासांच्या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांचा तपशील खालीलप्रमाणे :- पहाटे ०५:३० वाजता रुद्राभिषेक, सकाळी ०७:३०…

Read More