- ताज्या घडामोडी
- पिंपरी चिंचवड
- देहू
- आळंदी
- पुणे
- महाराष्ट्र
- देश – विदेश
- राजकारण
- क्राईम
- Dr.D.Y. Patil College of Engineering Akurdi Pune
- डिजिटल आवृत्ती – जाहिरात
- मनोरंजन
- शिक्षण
- सांस्कृतिक
- जाहिरात विभाग
- आरोग्य
- धार्मिक
- आरोग्य
- क्रीडा
- नवरात्री विशेष
- व्हिडिओ
Subscribe to Updates
Get the latest creative news from FooBar about art, design and business.
Author: maharashtrabreakingnews.com
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उद्योग, उर्जा व कामगार विभागाअंतर्गत पुणे जिल्ह्यात येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने व दुकान मालक, व्यवस्थापनांनी कार्यरत अधिकारी व कर्मचाऱ्यांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या निवडणूकीमध्ये मतदानाचा हक्क बजाविण्यासाठी येत्या १३ मे रोजी भरपगारी सुट्टी द्यावी, असे निर्देश पुणे विभागाचे कामगार उपायुक्त अभय गीते यांनी दिले आहेत. सर्व आस्थापना, कारखाने व दुकाने उदा. खाजगी कंपन्यामधील आस्थापना, दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, अन्य गृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, खरेदी केंद्रे , मॉल्स, किरकोळ विक्रेते आदी ठिकाणी कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी किंवा अपवादात्मक परिस्थितीत त्यांना पूर्ण दिवस…
रायगड , (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) -33 मावळ लोकसभा मतदारसंघात क्षेत्रातील मतदार यादीत नाव असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे यासाठी सोमवार 13 मे 2024 रोजी लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांनी दिले आहेत. जिल्हातील 33 मावळ लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्प्यात सोमवार 13 मे रोजी मतदान होणार आहे . या मतदार संघांच्या मतदार यादीत समाविष्ट असलेल्या प्रत्येक मतदाराला मतदान करता यावे, यासाठी अशा सर्व मतदारांना लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 च्या कलम 135 ब नुसार भरपगारी रजा देय आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी सर्व…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने भंडारा डोंगरावरील जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या चरणी रास भरुन आंब्यांचा महानैवेद्य दाखविण्यात आला. पूजा, आरती करून आपल्या आमराईतील आंबे गाभाऱ्यात आकर्षकपणे मांडण्यात आले. तसेच मंदिरात फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. अशा प्रसन्न वातावरणात अक्षयतृतीयेच्या निमित्ताने संत तुकोबाचरणी सेवा अर्पण करण्यात आली. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष अरुण पवार, धारूरचे सरपंच बालाजी पवार, भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष ह.भ. प. बाळासाहेब काशीद, ह. भ. प. जगन्नाथ नाटक पाटील, ह. भ. प. जोपाशेठ पवार, ह.भ.प. ढमाले मामा, संजीव पवार, ह.भ. प. अनिल कारके, ह.…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – माझी साथ सोडली, त्याच्याशी मला काही देणे-घेणे नाही. त्यामुळे खोटा-नोटा प्रचार व अफवांवर विश्वास ठेवू नका, या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांना चांगलेच फटकारले. मागील निवडणुकीत श्रीरंग बारणे आणि आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो असलो तरी, आता राजकीय परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आता माझा शंभर टक्के पाठिंबा बारणे यांनाच आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचारासाठी पिंपरी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या…
कासारवाडी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – .कासारवाडी येथील जैन स्थानकाजवळील पगारिया सभागृहात बरसा दाता प पु गौतममुनिजी म सा आणि प्रखर व्याख्याता प पू चेतनमुनिजी म सा यांच्या मंगलमय सानिध्यात आठ वर्षीतप तपस्वींचा सन्मान समारंभ शानदार सोहळ्यात संपन्न झाला . दोन्ही मुनिंनी वर्षीतप या पवित्र तपाचे महत्त्व विशद केले आणि प्रथम तीर्थंकर आदिनाथ भगवान यांच्या 400 दिवसाच्या तपश्चर्येचा पारणा राजा श्रेयांस कुमार यांनी ईक्षु रसाच्या माध्यमातून केला ही वर्षतप पारण्याची पार्श्वभुमी त्यांनी सांगून या साधनेचे महत्त्व विशद केले . यावेळी वर्षीतप तपस्वी श्रीमती मोतीबाई लुंकड चिंचवड स्टेशन (२६ वे वर्षतप,), सुमनजी गुगळे , सुनीताजी चोरडिया, लताबाई टाटिया, मंगलजी देसरडा, पुष्पाजी शिंगवी,…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात तसेच मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.दीपक सिंगला यांच्या नियंत्रणाखाली कार्यक्षेत्रात मतदार जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. पिंपरी विधानसभा कार्यालयाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना यादव यांच्या सूचनेनुसार पिंपरी ते शिवाजीनगर कोर्ट या स्थानकांदरम्यान काल मेट्रोतून प्रवास करत मतदान जनजागृती करण्यात आली. यावेळी मेट्रो व्यवस्थापनाचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी स्वतः मेट्रोनी प्रवास केला आणि प्रवाशांना “मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य असून लोकशाही बळकट करण्यासाठी शहरातील प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवावा आणि लोकशाही महोत्सवात…
– दापोडीतील सभेत महाविकास आघाडीच्या विजयाचा निर्धार दापोडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – देश संविधानावर चालतो. त्याच संविधानाने पंतप्रधानांना खुर्चीवर बसवले आहे. परंतु, भाजपला याचा विसर पडलेला आहे. संविधान वाचविण्यासाठी आणि देशातील लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी मतदारांनी मावळ लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या मशाल चिन्हासमोरील बटण दाबून त्यांना विजयी करा, अशी विनंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख अॅड. सचिन भोसले यांनी केली. दापोडी येथे मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारार्थ गुरुवारी आयोजित सभेत ते बोलत होते. या वेळी स्वराज इंडियाचे नेते मानव कांबळे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रोमी…
कामशेत, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरीत आमदाराच्या मुलीच्या स्वागत समारंभात माझं लक्ष नसताना विरोधी आघाडीच्या उमेदवाराने पाय पकडून, माझे आशीर्वाद घेतल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करण्याची ‘बनवाबनवी’ केली. अशी बनवाबनवी व नौटंकी चालणार नाही, असा थेट इशारा दिला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (गुरुवारी) दिला. मावळात धनुष्यबाणाचेच काम करायचे ही आपली स्पष्ट भूमिका असताना कोणी गडबड करताना दिसले, तर त्या कार्यकर्त्याचे कामच करून टाकीन, या शब्दांत अजितदादांनी सज्जड दमही भरला. मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी- मनसे- आरपीआय- रासप- मित्रपक्ष महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी कामशेत येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.…
– भाजपा आमदार महेश लांडगे यांचे शिरुर मतदार संघात आवाहन – धर्माभिमानी, शिव-भंभूप्रेमी नागरिकांनी महायुतीला मतदान करा पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे बलिदान स्थळ मौजे तुळापूर आणि समाधीस्थळ वढू (बु.) विकासासाठी महायुती सरकारने ३९७ कोटी रुपयांच्या विकास आराखड्याला मंजुरी दिली. त्याचे काम प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशाचा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा आणि संवर्धन करण्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील केंद्र व राज्य सरकारने घेतली आहे. त्यामुळे या निवडणुकीत महायुतीला साथ देऊया, असे आवाहन भाजपा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पार्टी- शिवसेना- राष्ट्रवादी- आरपीआय- रासप…
पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कर्मवीर भाऊराव पाटील हे समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापन केली.ते ज्योतिबा फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्वाचे सदस्य होते.त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढयात हि सहभाग होता. भाऊरावांनी कमवा व शिका हि संकल्पना राबऊन गरीब विद्यार्थाना रोजगार व शिक्षण उपलब्ध करून दिले. केले.भाऊराव पाटील यांना अस्पृश्यतेबद्दल प्रचंड चीड होती. भाऊराव पाटील यांच्यावर शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्यांचा प्रभाव होता. महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर हि पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले. पुणे विद्यापीठाने त्यांना…
