Author: maharashtrabreakingnews.com

पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  कशिश आयोजित आणि हिंदोळा प्रस्तुत ‘तू अन् मी – एक सुरेल प्रवास’ या अनवट, अप्रचलित किंवा काहीशा विस्मरणात गेलेल्या परंतु अवीट गोडीच्या अभिजात नव्या-जुन्या तसेच मराठी-हिंदी गीते आणि गझलांच्या नावीन्यपूर्ण मैफलीने रसिकांना मंत्रमुग्ध केले. कॅप्टन कदम सभागृह, पेठ क्रमांक २५, निगडी प्राधिकरण येथे रविवार, दिनांक २६ मे २०२४ ची सायंकाळ कुमार करंदीकर आणि श्रुती करंदीकर या दांपत्याच्या सुरेल आवाजातील सादरीकरणाने रसिकांसाठी अविस्मरणीय ठरली. ज्येष्ठ गझल गायिका डॉ. शशिकला शिरगोपीकर, ज्येष्ठ संगीतकार मधू जोशी, सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा बिबीकर यांच्या प्रमुख उपस्थितीसह विविध क्षेत्रांतील मान्यवर संगीतप्रेमींनी या मैफलीचा श्रवणानंद घेतला. “ओंजळीत स्वर तुझेच…” या कविवर्य विंदा करंदीकर…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल स्वराज्य स्थापना आणि स्वराज्याच्या कारभारात ज्या घराण्यांचा महत्वाचा सहभाग होता. त्या घराण्यांच्या वंशजांचा सन्मान चिंचवड देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांचे शिवराज्याभिषेक विषयावर व्याख्यान झाले. श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिर पटांगणात रविवारी (दि. 26) झालेल्या कार्यक्रमासाठी मुख्य विश्वस्त मंदार देव महाराज, विश्वस्त जितेंद्र देव, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे आदी उपस्थित होते. सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज श्रीनिवास इंदलकर, सरदार कान्होजी जेधे यांचे वंशज इंद्रजित जेधे, सरदार येसाजी कंक यांचे वंशज रवी कंक, सरदार पिलाजी…

Read More

चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – विकास शिक्षण मंडळ संचालित श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयाचा याही वर्षी 100 % निकाल लागला. तब्बल 51 विद्यार्थ्यांनी 90 % पेक्षा अधिक गुण प्राप्त केले. प्रथम 5 गुणवंत विद्यार्थी 1) चौधरी समीक्षा वसंत.. 98.60% 2) चि. भुजबळ कार्तिक नंदकुमार.. 96.80% 3) कु .इनामदार जिया समीर.. 96.40% 4) चि .पांचाळ सुमित अशोक ..96.20% 5) चि.मोरे राजदीप विलास..95.80 % 5) कु गुरव श्रेया सदानंद… 95.80% सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संस्थेच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष  जगदीश  जाधव, सचिव  संजयभाऊ जाधव, संचालक, विजय जाधव  यांनी अभिनंदन केले. विद्यालयाचे प्राचार्य बाळाराम पाटील, प्राथ मुख्याध्यापक  साहेबराव देवरे, पर्यवेक्षक दत्तात्रय भालेराव,…

Read More

पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल 95.81 टक्के एवढा लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा निकालात 1.98 टक्क्याने वाढ झालेली आहे. यंदाही निकालात मुलांपेक्षा मुली अव्वल ठरल्या आहेत. पुणे, नागपुर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत १ ते २६ मार्च २०२४ या कालावधीत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी सुमारे १६ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यंदा प्रथमच मे महिन्यातच दहावीचा निकाल जाहीर होत आहे. यापूर्वी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात…

Read More

इंटरनॅशनल हॉकर्स डे उत्साहात साजरा. पिंपरी ,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – नॅशनल होकर फेडरेशन,महाराष्ट्र हॉकर्स फेडरेशन, महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे आज देशभरात विविध राज्यात आणि महाराष्ट्रातल्या विविध महानगरपालिका क्षेत्रामध्ये हॉकर्स डे अर्थात फेरीवाला दिवस एकमेकाला मिठाई भरवून शुभेच्छा देत उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र फेरीवाला क्रांती महासंघातर्फे पिंपरी चिंचवड व पुणे शहरातील एकूण २८ ठिकाणी शुभेच्छा व कायद्याबाबत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, कार्याध्यक्ष राजू बिराजदार, इरफान चौधरी,प्रभाग अध्यक्ष बालाजी लोखंडे,संभाजी, वाघमारे,किरण साडेकर, सुरेश देडे, राजू पठाण,नितिन सुरवसे,अंबालाल सुखवाल,हरी भोई,सागर बोराडे, दादा भानवसे, युनूस पटवेकर,लक्ष्मण मिटकरी,पांडूरंग भोसले,जलाउद्दीन गोलंदाज, प्राविण लोढे, आत्माराम वडदरे,शंकर पवार, मनोज खंडागळे, बालाजी बिजगरे,…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – दरवर्षीप्रमाणे पिंपरी चिंचवड या औद्योगिक नगरीमध्ये आषाढीवारी पालखी सोहळ्याचे आगमन होत आहे. दरवर्षीप्रमाणे देण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता महापालिकेच्या वतीने घेण्यात येणार असून इतर आस्थापनांसोबत समन्वय साधून उत्तम सोयीसुविधा देण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन आयुक्त शेखर सिंह यांनी केले. तसेच सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे सूक्ष्म नियोजन करावे आणि आराखडा तयार करून पालखी मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गावर देण्यात येणाऱ्या सुविधांसाठी आराखडा तयार करावा, अशा सूचनाही दिल्या. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज  आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या आषाढीवारी  पालखी सोहळा सन २०२४ च्या अनुषंगाने महापालिकेच्या  वतीने  वारकऱ्यांसाठी पुरविण्यात येणाऱ्या  विविध…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सुभेदार रामजी आंबेडकर वाचनालय कार्यकारी संस्था नवी सांगवी पुणे यांच्यावतीने भगवान गौतम बुद्ध जयंती विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुनी तथागत गौतम बुद्ध यांच्या 2568 व्या जयंती निमित्त परिवर्तनवादि, विज्ञावादी, व समतेचा विचार पेरणाऱ्या सम्राट अशोक, महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, अहिल्या देवी होळकर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संयुक्त जयंती महोत्सवातून विनम्र अभिवादन करण्यात आले. विविध क्षेत्रातील मान्यवर सन्मानितांच्या गौरव सोहळ्यातून  अरुण पवार (वृक्षमित्र) विनायक बडदे, (सर्पमित्र) यशोधरा नितनवरे, संतराम निकाळजे, विजय चौधरी, शिवानंद तालीकोटी यांचा भारतीय संविधानाची उद्देशिका भेट देऊन सन्मान करण्याल…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)  – पुण्यातील उद्योग पती विशाल अग्रवाल यांच्या अल्पवयीन मुलाने शनिवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास पोर्षे कारनेबाईकला धडक दिली. या धडकेत 2 जणांचा मृत्यू झाला.  पुणे अपघात प्रकरणी जलदगतीने न्याय होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र प्रदेशचे उपाध्यक्ष ॲड संदीप चिंचवडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व  दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे विनंती केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,पुणे येथील झालेल्या अपघातातील दोन्ही मुलांच्या कुटुंबीयांना शासनाकडून भरपाई द्यावी.आरोपी बिल्डर व त्यांच्या पुत्रावर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी. महाराष्ट्रातील जनता या प्रकरणी हळहळ व्यक्त करत आहे हे आपण सर्वांनी सामाजिक माध्यमे न्यूज चॅनल वर पाहिले आहे.यासाठी पोलिसानी तपासात कसल्याही प्रकारच्या…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कृष्णा चौक नवी सांगवी येथील खड्ड्याचे काम पावसाळ्यापूर्वी करा, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे मेघराज लोखंडे यांनी ह क्षेत्रीय कार्यालय उपअभियंता स्थापत्य 6यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्मार्ट सिटी अंतर्गत महानगरपालिकेने रस्त्याचे काम केले. पण कृष्णा चौक नवी सांगवी पाटील प्लाझा,बारामती ॲग्रो चिकनच्या दुकानासमोर समोर मोठा खड्डा असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. पावसाळ्यामध्ये त्या खड्ड्यात पाणी भरून दोन दुचाकी सवार मुलांचा अपघात त्या ठिकाणी झालेला असून आपत्कालीन अपघात होण्याची दाट शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. या संदर्भात नागरीकांच्या काही तक्रारी देखील येत असल्याचे…

Read More

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) साते, वडगांव मावळ येथील पिंपरी चिंचवड विद्यापीठातील (पीसीयु) स्कूल ऑफ सायन्सेसने राष्ट्रीय स्तरावर आयएपीईएन इंडिया असोसिएशन फॉर पॅरेंटरल ॲण्ड पॅरेंटरल न्यूट्रिशन बरोबर नुकताच शैक्षणिक सामंजस्य करार केला. या करारामुळे आहारशास्त्र आणि क्लिनिकल सायकोलॉजी या क्षेत्रांमध्ये शिक्षण, संशोधन आणि व्यावहारिक उपयोगात प्रगती करण्यासाठी पीसीयुच्या विद्यार्थ्यांना लाभ होईल. यावेळी आयएपीईएनचे डॉ. मानसी पाटील, डॉ.शिल्पा वर्मा, दत्ता पटेल, डॉ. पी.सी. विजयकुमार, पीसीईटीचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रभारी कुलगुरू डॉ. मणिमाला पुरी, प्र-कुलगुरू‌ डॉ. सुदीप थेपडे आदी उपस्थित होते. पीसीयुच्या स्कूल ऑफ सायन्सेसला पोषण, आहारशास्त्र, क्लिनिकल सायकॉलॉजी आणि संबंधित प्रकल्पांमधील अग्रगण्य प्रमाणपत्र…

Read More